भडगाव तालुक्यातील वाक येथे तलवार व कोयत्याने तीन जणांवर जीवघेणा हल्ला.!!!

0 1,588

भडगाव तालुक्यातील वाक येथे तलवार व कोयत्याने तीन जणांवर जीवघेणा हल्ला.!!!

भडगाव पोलीस स्टेशनला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल. •••

तिघां गंभीर जखमींना उपचारासाठी धुळे येथे हलवले.°°°

भडगांव प्रतिनिधी :-

तालुक्यातील वाक येथे रस्त्यावर गाडी चालवत असताना मागून जोरदार धडक दिली. व खाली उतरून पुढील गाडी चालकास व वडील व काकांना मागील गाडी मधील चार जणांनी तलवार कोयता लाकडी दांडकाने वार केला. यामध्ये एका जणांच्या डाव्या हाताच्या मनगटाची नस तोडून गंभीर जखमी केले व एकाच्या डोक्यात लाकडी दांडका हाणून गंभीर जखमी केले. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आलेले आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश सुधाकर पटील ( वय २८, धंदा. शेती, रा. वाक ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ०२/०५/२०२५ रोजी रात्री ११.३० वा.सु. मी आमचे गावातील योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतिष शालीक पाटील, अक्षय बारकू पाटील असे इंडिका व्हिस्टा गाडी क्रमांक.एम. एच.४२ ए यु ४२४९ आले. तेव्हा गाडी योगेश हा चालवत होता, योगेश याने मला त्याच्या गाडीने मला ठोस मारली. तेव्हा सदर गाडीतून वरील चारही इसम खाली उतरले. उमेश शालीक पाटील याने मला मागुन धरुन ठेवले व योगेश कैलास पाटील याने गाडीतुन तलवार काढली व माझ्या मानेवर उगारली. तेव्हा मी वार चुकवीला असता, सदर तलवारीचा वार माझ्या मानेच्या डावे बाजुस लागला. त्यानंतर त्याने पुन्हा तलवार उगारली असता डाव्या हाताने तलवार धरण्यास गेलो असता, सदर तलवारीचा वार माझ्या डाव्या हाताच्या मनगटास लागला. तेव्हा माझे काका किशोर विक्रम पाटील व माझे वडील सुधाकर विक्रम पाटील हे मला सोडविण्यास आले असता योगेश कैलास पाटील याने त्याच्या हातातील तलवारीने माझे काका किशोर पाटील यांच्या डोक्यावर वार केला.

 

त्याचवेळी उमेश शालीक पाटील याने हातात लाकडी दांडकाने मारहाण केली. सदर भांडणात सतिष शालीक पाटील व अक्षय बारकू पाटील यांनी वेळोवेळी चिथावणी देवुन म्हणायचे की, यांना सोडु नका, कापुन टाका असे बोलून सतिष पाटील व अक्षय पाटील यांनी उमेश याचे हातातील लाकडी दांडका घेवून वडीलांना व काकांना मारहाण केली होती. त्यानंतर तेथे माझे काका सर्जेराव विक्रम पाटील, माझी आई लिलाबाई सुधाकर पाटील, माझी काकू जागृती किशोर पाटील, परमेश्रर सुधाकर पाटील अशांनी आम्हाला मारहाण करणा-या लोकांच्या तावडीतून सोडवले व गाडीत बसवुन उपचारासाठी घेवुन ग्रामीण रुग्णालय येथे येत असतांना वरील लोक हे आमचे गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला. १) योगेश कैलास पाटील २) उमेश शालीक पाटील ३) सतिष शालीक पाटील ४) अक्षय बारकु पाटील सर्व रा.वाक ता.भडगाव यांच्याविरुद्ध गु.र.न.१६८/२०२५ भारतीय न्याय संहिता (बी एन एस),२०२३,११८(२) भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३,२८१(३) भारतीय न्याय सहिता (बी एन एस),२०२३,३५१(२), भारतीय न्याय संहिता (बी एन एस),२०२३,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. संजय पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा