भडगाव तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींचे लोकनियुक्त सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील एकुण ४९ ग्रामपंचायतींचे लोकनियुक्त सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि. २१ रोजी सोमवारी भडगाव समिती सभागृहात पार पडला. सकाळी ११.३० वाजता भडगावचे तहसिलदार शितल सोलाट यांच्या अध्यक्षतेखाली सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे सरपंच आरक्षण करणेबाबतची सभा घेण्यात आली. या सभेला निवाशी नायब तहसिलदार सुधीर सोनवणे, संगायो तहसिलदार शितल सोलाट, भडगाव पंचायत समितीचे ए बिडीओ सुशिल सोनवणे, निवडणुक सहाय्यक पंकज भागवत, महसुल सहाय्यक भुषण मराठे यांचेसह अधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामसेवक, नागरीक उपस्थित होते.
यात एकुण ४९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण असे काढण्यात आलेले आहे.
यात अनुसुचीत जाती ६ जागा, अनुसुचीत जमाती ८ जागा, नागरीकांचा मागास प्रवर्ग १० जागा, सर्वसाधारण जागा २५ अशा एकुण ४९ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे हे आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे.
यावेळी सरपंच आरक्षण काढतांना समर्थ शरद पाटील वय ९ वर्ष रा. भडगाव या चिमुकल्या बालकाच्या हस्ते चिठया काढुन सरपंचाचे आरक्षण घोषीत करण्यात आलेले आहे.
तसेच पंचायत समिती सभागृहात दुपारी ४ वाजता एकुण २५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांपैकी एक द्धितीयांश सरपंच पदे हे महिला यांच्यासाठी आरक्षित करण्यात आली. यावेळी समर्थ शरद पाटील वय ९ वर्ष रा. भडगाव या चिमुकल्या मुलाच्या हाताने चिठ्ठया काढुन सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. पाचोरा उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांचे अध्यक्षतेखाली किढण्यात आली. यावेळी तहसिलदार शितल सोलाट, गटविकास अधिकारी के. बी. अंजने, निवाशी नायब तहसिलदार सुधीर सोनवणे,निवडणुक सहाय्यक पंकज भागवत आदि अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, नागरीक हजर होते.
भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले.यात ग्रामपंचायतीच्या गावाचे नाव, पुढे सरपंच पदाचे आरक्षण याप्रमाणे आहे.
अनुसुचीत जाती —
घुसर्डी खुर्द — महिला, मांडकी — महिला, भातखंडे बुद्रुक, जुवार्डी — महिला , आमडदे, पिंपळगाव बुद्रुक,
अनुसुचीत जमाती — पिंप्रीहाट — महिला, कजगाव — महिला, लोण प्र.ब, मळगाव — महिला, महिंदळे — महिला, शिवणी, शिंदी, गुढे.
नागरीकांचा मागास प्रवर्ग —
गिरड — महिला, अंजनविहीरे, वडगाव बुद्रूक — महिला, खेडगाव खुर्द, कोळगाव, पिचर्डे, अंतुर्ली बुद्रुक, वडजी — महिला, वाडे — महिला, बात्सर — महिला.
सर्वसाधारण ( खुला)—
पथराड — महिला, पळासखेडे — महिला,आडळसे — महिला, आंचळगाव, वडगाव नालबंदी, वलवाडी बुद्रुक, बोदर्डे, बांबरुड प्र. ब, बाळद खुर्द, भोरटेक बुद्रुक, सावदे, निंभोरा, गोंडगाव — महिला, कनाशी, तांदुळवाडी — महिला, पांढरद — महिला, लोण प्र. ऊ — महिला, वाक — महिला, बोरनार — महिला, पासर्डी — महिला, वरखेड — महिला, बांबरुड प्र. ऊ, भट्टगाव, पिंपरखेड — महिला, कोठली — महिला.