नुतन लोणपिराचे विकासो चेअरमन पदि सोमनाथ पाटील यांची बिनविरोध निवड.
पञकार अशोकबापु परदेशी यांनी केला सत्कार.
नुतन लोणपिराचे विकासो चेअरमन पदि सोमनाथ पाटील यांची बिनविरोध निवड.
पञकार अशोकबापु परदेशी यांनी केला सत्कार.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील लोणपिराचे येथील नुतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि सोमनाथ भालचंद्र पाटील ( बोदर्डे ) यांची दि. १७ रोजी गुरुवारी सकाळी १२ वाजता सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. दिपक शालीग्राम पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी ही निवड घेण्यात आली. यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन सोमनाथ पाटील यांचा उपस्थित संचालक मंडळामार्फत पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पञकार अशोकबापु परदेशी यांनीही शाल, पुष्पगुच्छ देऊन सोमनाथ पाटील यांचा सत्कार केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन भडगाव सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी अविनाश पाटील यांनी कामकाज पाहीले. त्यांना कार्यालयाचे प्रेमसिंग पाटील , संस्थेचे सचीव संजय पाटील यांनी सहकार्य केले.
यावेळी मावळते चेअरमन दिपक शालीग्राम पाटील, व्हाईस चेअरमन विठ्ठल सोनजी पाटील, भिमराव ओंकार पाटील, रायचंद शामसिंग परदेशी, प्रभाकर पंडीत पाटील, वसंत गंगाराम पाटील, पंढरीनाथ हिलाल पाटील, भाऊसाहेब एकनाथ पाटील, प्रदिप माधवराव पाटील, सुरेश बुधा खैरनार, सरस्वताबाई ओंकार पाटील, अरुणा शंकर पाटील आदि संचालक तसेच विजय पाटील, वाल्मीक पाटील, सरदार परदेशी, रमेश पाटील, सुरेश पाटील, शंकर पाटील, विकी पाटील, चंद्रशेखर पाटील, चंद्रकांत पाटील, सुनिल पाटील, अनिल पाटील, माजी चेअरमन भिला पाटील, संजय पाटील, पञकार अशोक परदेशी यांचेसह नागरीक उपस्थित होते.