गिरणा नदी पात्रातुन अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना १ डंपर जप्त;भडगांव पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे यांची कारवाई.!!!

पाचोरा तालुक्यातील दोन संशयित आरोपी विरोधात भडगांव पोलिसात वाळु चोरीचा गुन्हा दाखल

0 1,058

गिरणा नदी पात्रातुन अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना १ डंपर जप्त;भडगांव पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे यांची कारवाई.!!!!

पाचोरा तालुक्यातील दोन संशयित आरोपी विरोधात भडगांव पोलिसात वाळु चोरीचा गुन्हा दाखल

 

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्याला वरदान ठरलेल्या गिरणा माई चे वस्त्रहरण करून अवैध वाळू चोरी करून वाहतूक सुरूच असली तरी आता महसुल प्रशासना पाठोपाठ भडगांव पोलिस प्रशासन ही आता कारवाईला सामोरे जात असल्याचे दिसून येत आहे.याबाबत दि.११ मार्चच्या मध्यरात्री गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे व कर्मचारी यांनी भडगांव- पाचोरा रोड वरील ग्रामीण रुग्णालया समोर अवैध वाळू वाहतूक करीत असतांना एक टाटा कंपनीचे निळ्या पांढऱ्या रंगाचे वाळुने भरलेले डंपर जप्त करीत

हे डंपर भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आले आहे.

याबाबत पाचोरा तालुक्यातील दोन सशंयित आरोपी विरोधात भडगांव पोलिस स्टेशनला अवैध वाळु चोरिचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.११ मार्च रोजीच्या मध्यरात्री २ः४० वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे,रामचंद्र काळे, भगवान नरवाडे,महेश पाटील हे रात्री गस्तीवर असताना भडगांव- पाचोरा रोडवरील ग्रामीण रुग्णालया समोर रोडवर डंपर क्रमांक -एमएच- २० ईजी – ८८५८ वरील ड्राइव्हर अशोक नामदेव गायकवाड रा.सारोळा ता. पाचोरा हा त्याच्या ताब्यातील डंपर मध्ये विनापरवाना अंदाजे ४ ब्रास वाळुची चोरटी वाहतुक करतांना मिळून आला तर त्यास पोलिसांनी विचारणा केली असता त्यानी त्याच्या ताब्यातील डंपर मालक आदेश चौधरी रा.बाहेरपुरा ता.पाचोरा याचे असल्याचे सांगितले.

 

याबाबत फिर्यादी- सुशिल राजेंद्र सोनवणे पोलिस उपनिरीक्षक भडगांव पो.स्टे यांच्या फिर्यादीवरून १) सशंयित आरोपी ड्राइव्हर अशोक नामदेव गायकवाड रा.सारोळा ता.पाचोरा

२)डंपर मालक आदेश चौधरी रा.बाहेरपुरा ता.पाचोरा यांच्या विरुद्ध भडगांव पोलिससांत गुरंन८१/२०२५भा.न्या. संहिता २०२३ कलम ३०३(२),३(५)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण १० लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन याबाबतचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रदिप चौधरी हे करीत आहेत

या कारवाई बाबत सर्वत्र कौतुक करण्यात येत असुन अशीच कारवाई सतत सुरू ठेवून भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा