भडगाव शहरातील एच.बी.ए. इंग्लिश स्कूलमध्ये नुकताच पार पडलेल्या आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथील एच.बी.ए. इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
खाद्यपदार्थ:
विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.पाणीपुरी, भेळ, मिसळपाव, फ्रुटडिश, चॉकलेट सँडविच, जिलेबी रबडी, कॉर्न भेळ, व्हेज मंच्युरियन यांसारख्या पदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
मेळाव्याचे महत्त्व:
मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळाले.
पालकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यावहारिक आर्थिक गोष्टींची माहिती व्हावी, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
मेळाव्याचा आयोजन
मुख्याध्यापक मुजम्मिल शेख सर यांनी केले व
आनंद मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी
विद्या सोनजे, आझमीन शेख, तहसीन खान, मुस्कान शेख यांनी परिश्रम घेतले