पारोळा पालिकेवर अतिक्रमणधारकांच्या मोर्चा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.!!!

पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – गेल्या ४०-५० वर्षापासून भुईकोट किल्ल्याच्या खंदकाबाहेर सुदर्शन नगर सह तब्बल १६७ व्यापारी
वास्तव्यास आहेत.सदर सुदर्शन नगर भागातील रहिवाशी यांना पालिकेकडून सर्व सुविधा आज देखील मिळत आहे.तसेच व्यापाऱ्यांकडून देखील पालिकेकडून वार्षिक कर वसूल केला जात आहे.असे असताना देखील तारीख ४ जानेवारी रोजी
पालिकेच्या नगररचना विभागाकडून खंदका बाहेरील अतिक्रमित बांधकाम काढण्यासंदर्भात व्यापारी व रहिवासी धारकांना नोटीस मिळाल्याने ते भयभीत झाले आहेत.सुदर्शन नगर भागातील व व्यापारांचे व्यावसायिक दुकाने जैसे थे राहू द्यावेत या मागणीसाठी आज शुक्रवारी
शिवतीर्थ व बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत
रहिवाशी धारकांसह व्यापाऱ्यांनी कजगाव नाका ते पालिका पर्यंत जन आक्रोश मोर्चा काढून मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण यांना विविध मागण्यां संदर्भात निवेदन दिले.
यावेळी अतिक्रमितांनी मोर्चात घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले.व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने बंद ठेवली होती.
मोर्चेत कामगारांचा ही पाठिंबा होता.सुदर्शन नगर भागातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांसह
शेकडो महिलांचा सहभाग होता. दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनिल पवार,पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह वसावे,गोपनीय शाखेचे महेश पाटील,किशोर भोई,
गृहरक्षक दल यांनी सहकार्य केले.
राज्य शासनाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय तारीख २२ जानेवारी २०२५ नुसार गड किल्ल्यावरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे.तथापि विषयांकित अतिक्रमण हे गड किल्ले या क्षेत्रातील नाही.भुईकोट
किल्ल्याच्या खंदका बाहेरील भागात रस्त्यालगत सदर दुकाने आहेत.त्यामुळे याबाबत पालिकेकडून कारवाई करणे उचित राहणार नाही.असे व्यापाऱ्यांनी निवेदनातून सांगितले तर सुदर्शन नगर भागातील रहिवासी धारक यांनी धरणगाव येथील विधीतज्ञ
यांच्यासोबत पालिकेला गेल्या अनेक वर्षापासून रहिवाशी धारक असताना देखील आमच्यावर अन्याय होत असल्याचे सांगून सदर कारवाईबाबत पालिकेने वरिष्ठांच्या मदतीने स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे.
रहिवाशांसह व्यापाऱ्यांचा जीव टांगणीला-
भुईकोट किल्ल्याच्या खंदकाबाहेरील अतिक्रमित व्यापाऱ्यांसह सुदर्शन नगर भागातील रहिवासी धारकांना
पालिकेकडून गेल्या ४ जानेवारी रोजी अतिक्रमण संदर्भात नोटीसा बजावल्याने व्यापाऱ्यांसह रहिवासी धारकांचा जीव टांगणीला आला आहे. दुकानाच्या व्यवसायावर अनेकांचे कुटुंब अवलंबून असून आज तब्बल १६७ व्यावसायिक दुकानात जवळजवळ हजारो कामगारांचा पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यातच गेल्या अनेक वर्षापासून रहिवाशी म्हणून असलेले सुदर्शन नगर भागातील नागरिक व महिलांची
भयावह स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे सदर अतिक्रमित विषयाबाबत पालिकेकडून योग्य ती भूमिका घेतली जावी अशा मागणीचे निवेदन प्रशासक तथा मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना देण्यात आले.
रहिवाशी,व्यापाऱ्यांचे म्हणणे वरिष्ठांना कळवु – किशोर चव्हाण
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे रहिवाशी धारक व व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.आजच्या मागणीचे निवेदन आपण वरिष्ठांकडे पाठवून वरिष्ठांच्या योग्य त्या सूचनेनुसार पुढील
अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण यांनी सांगितले.