म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री.संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी.!!!

(सर्व विद्यार्थी व समाज घटकांनी गाडगे महाराजांचे विचार अंगीकृत करावे :सरला सावकारे)

0 19

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री.संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी.!!!

(सर्व विद्यार्थी व समाज घटकांनी गाडगे महाराजांचे विचार अंगीकृत करावे :सरला सावकारे)

भुसावळ प्रतिनिधी :-

येथील नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या, सदर प्रसंगी डॉ. प्रदीप साखरे , नाना पाटील यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. डॉ. प्रदीप साखरे , नाना पाटील यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी एस. टी. चौधरी, डॉ . प्रदीप साखरे यांनी याप्रसंगी संत गाडगे महाराज यांचे जीवन कार्य वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून दिले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षा सरला सावकारे यांनी संत गाडगेबाबा एक निरक्षर मनुष्य, रंजल्या रंजल्या लोकांनाच नाही तर पशुपक्ष्यांना आपल्या उपचार बाहुपाशात घेणारे एक महासेवक धरतीच्या लेकरांवर प्रेमाचे पांघरूण घालणारे महामानव . गाडगेबाबांनी आपल्या आई कडुन स्वच्छतेचा वसा अंगीकारला ते आधी दिवसभर गाव स्वच्छ करायचे मग भाकरी मागून खायचे आणि रात्री कीर्तन करून समाज प्रबोधन करायचे गाडगेबाबा आपल्या किर्तनातून सतत सांगत असत की, मायबापहो देव तीर्थात नाही,

 

मूर्तीत नाही, रानावनात नाही तो तुमच्या समोर दरिद्री नारायणाच्या रुपाने प्रत्यक्ष उभा आहे त्याची मनोभावे सेवा करा संत गाडगेबाबांनी दहा कलमी संदेश दिला आहे भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, बेघरांना आसरा द्या, निराश झालेल्यांना हिंमत द्या, गरीब मुला मुलींना शिक्षण द्या, अंध पंगूना औषध द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या, गरीब मुले मुली यांचे लग्न लावून द्या, बेकारांना रोजगार द्या हीच देवाची भक्ती आहे, हीच देवाची पूजा आहे हेच बाबांचे तत्वज्ञान आहे.

 

ते अंगीकृत करा असे अध्यक्ष भाषणात सांगितले संध्या धांडे, नाना पाटील, ज्योती शिरतुर,पुनम देवकर,अरुण नेटके, प्रवीण चौधरी , निलेश बोराडे,लक्ष्मण पवार, मनोज चौधरी, राजू बागुल, मंदा मोरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. नंतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी शाळा परीसर स्वच्छ केला. सूत्रसंचालन व आभार एन. एच.राठोड यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा