ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवा; विद्यार्थिनीनां होणारा त्रास कमी करा अन्यथा ठिय्या आंदोलन बस कंट्रोलर यांना निवेदन.!!!
ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवा; विद्यार्थिनीनां होणारा त्रास कमी करा अन्यथा ठिय्या आंदोलन बस कंट्रोलर यांना निवेदन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक विद्यार्थिनींना तालुक्याच्या शाळांमध्ये पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, त्या प्रमाणात बस उपलब्ध होत नसल्याने पाचोरा वाडे व पाचोरा कोळगाव या दोन मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थिनींचा प्रवास जीवघेणा झाला आहे. या मार्गावर बस फेऱ्या वाढवाव्यात आणि विद्यार्थिनींना बसमध्ये प्रथम प्रवेश मिळावा, यासाठी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ प्रसारित आदर्श कन्या शाळा येथील संचालक व इतर पालकवर्गाने पाचोरा आगार अंतर्गत भडगाव येथे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थिनींची संख्या वाढली आहे. परंतु, बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे विद्यार्थिनींना जीवघेणा प्रवास करावा लागतो. बसमध्ये जागा नसल्यामुळे त्यांना लटकून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, या मार्गावर बसच्या फेऱ्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, विद्यार्थिनींना बसमध्ये प्रथम प्रवेश मिळावा, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या महत्वपूर्ण विषयाला मार्गी लावण्यासाठी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगावचे उपाध्यक्ष विनोद महाजन,रमेश महाजन, पत्रकार सागर महाजन,मनोज महाजन,आर. आर. जाधव सर, किशोर महाजन, प्राध्यापक रवींद्र महाजन आदी उपस्थित होते.
या निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासाची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भडगाव बस स्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या पुढील परिणाम व सर्वस्वी आपण जबाबदार राहाल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.