जळगावमहाराष्ट्रराजकीय

भडगाव येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.!!!

भडगाव येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.!!!

शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात प्रतिमेचे विधिवत पूजन, शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

भडगाव  प्रतिनिधी :-

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी शिवतीर्थ शिवसेना कार्यालय, भडगाव येथे त्यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक जीवनावर त्यांनी उमटवलेल्या ठसठशीत ठशाचा आढावा घेतला. स्व. बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नसून, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आयुष्यभर लढा देणारे निर्भीड नेतृत्व होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला राजकारणात स्थान मिळवून दिले. मराठी माणसाच्या हक्कासाठी त्यांनी उभा केलेला लढा, हिंदुत्वाची भूमिका, अन्यायाविरोधातील आक्रमक आवाज आणि निर्भीड लेखणी आजही समाजाला दिशा देणारी आहे. त्यांच्या विचारांमुळेच शिवसेना ही केवळ राजकीय संघटना न राहता एक जनआंदोलन बनली, असे उपस्थित वक्त्यांनी सांगितले.

या जयंती कार्यक्रमास भडगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राजू जीभू, स्व. बापूजी फाउंडेशनचे संचालक तथा गटनेते लखिचंद भाऊ पाटील, जहागीर मालचे, शहरप्रमुख आबा चौधरी, शहरप्रमुख बबलू देवरे, अतुल परदेशी, शशीकांत येवले, जग्गू भोई, देवा अहिरे, विशाल पाटील, रावसाहेब पाटील, डॉ. विजयकुमार देशमुख, दुर्गेश वाघ, महेंद्र ततार, निलेश महाजन, राजू अहिरे, सुरेंद्र मोरे, सागर परदेशी, राहुल माळी, मंदार कासार, विनोद मोरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजच्या राजकीय परिस्थितीत अधिकच महत्त्वाचे ठरत आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे, अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणे आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी संघटना असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकावर आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालण्याचा, शिवसेना अधिक मजबूत करण्याचा तसेच समाजहितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प केला. जयंतीनिमित्त कार्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण असून, कार्यक्रम शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!