भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील वाडे येथील श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत दि. २२ रोजी भडगाव शेतकरी सहकारी संघाचे नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र लालचंद परदेशी यांचा तसेच संस्थेचे संचिव अर्जुन पाटील यांनी २२ वर्ष चांगली सेवा बजावल्यामुळे या दोघांचा सत्कार शाल, रुमाल टोपी, पुष्पगुच्छ देऊन कजगाव वाडे जिल्हा परीषद गटाचे मा. सदस्य डाॅ. कर्तारसिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भडगाव शेतकरी सहकारी संघाचे माजी व्हाईस चेअरमन देविदास माळी, सोसायटीचे माजी चेअरमन नारायण परदेशी, संचालक डाॅ. दिवाकर पाटील, अशोक भुतेसिंग परदेशी, सुपडु मोरे, माजी उपसरपंच शामराव माळी, कैलास माळी, माजी सरपंच भारत मोरे, वामन माळी, सुभाष परदेशी, रोजगार सेवक नामदेव माळी तसेच सचिव अर्जुन पाटील, दिलीप पाटील, ज्ञानेश्वर माळी, प्रविण पाटील, दुलीचंद परदेशी आदि कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.





