गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूची चोरी करून वाहतूक,भातखंडे येथून एक ट्रॅक्टर जप्त भडगांव महसुल प्रशासनाची कारवाई.!!!
गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूची चोरी करून वाहतूक,भातखंडे येथून एक ट्रॅक्टर जप्त भडगांव महसुल प्रशासनाची कारवाई.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
गिरड भातखंडे येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळु चोरी करून वाहतुक करीत असतांना एक विना नंबरचे निळ्या रंगाचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर महसुल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी जप्त केले आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की भडगाव तालुक्यातील भातखंडे व गिरड येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज संध्याकाळी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून वाळूने भरलेले एक निळ्या रंगाचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर जप्त करून भडगांव तहसिल आवारात लावण्यात आले आहे.
हि कारवाई तहसिलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी दिनेश येंडे ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे गुढे,पाशा हलकारे, समाधान हुल्लुळे,विवेक महाजन,गितेश महाजन, योगेश पाटील,वाहन चालक लोकेश वाघ यांच्या पथकानी कारवाई केली.याबाबत सदर ट्रॅक्टर वाहना वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असे भडगांव तहसिलदार शितल सोलाट यांनी सांगितले