टेकवाडे खुर्द येथील माजी पोलीस रविंद्र पाटील शेती मातीची सेवा अन भगवंताची नित्याने करताहेत भक्ती असाही आदर्श.!!!
टेकवाडे खुर्द येथील माजी पोलीस रविंद्र पाटील शेती मातीची सेवा अन भगवंताची नित्याने करताहेत भक्ती असाही आदर्श.!!!
भडगाव प्रतिनिधी :—
येथुन जवळच असलेल्या टेकवाडे खुर्द ता. चाळीसगाव येथील शेतकरी रविंद्र गोविंदा पाटील वय ५५ वर्ष यांनी केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्समध्ये ३ वर्ष नोकरी केली. पोलीसाची नोकरी सोडुन त्यांनी शेती मातेची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
दिवसभर शेतात कष्ट करुन ते चांगले उत्पन्न मिळवत संसाराचा रहाटगाडगा चालवित आहेत. एवढेच नव्हे तर ते दररोज साडेतीन वाजेच्या सुमारास झोपेतुन उठतात. अंघोळ करुन गावातील श्रीराम मंदिर व श्री. हनुमानाचे मंदिर अशा दोघा मंदिरांच्या परीसराची स्वच्छता करतात. पुजापाठ करतात. दररोज सकाळी श्रीराम मंदिरात घंटा वाजतात. व स्पिकरवर पावणेपाच ते साडेपाच पर्यंत संपुर्ण काकडा करतात. नंतर काकडा आरती म्हणतात. महादेवाची आरती म्हणतात. त्यामुळे गिरणा काठालगतच्या टेकवाडे खुर्द, बहाळ कसबे, बहाळ रथाचे या गावांमध्ये सकाळच्या प्रहरी भगवंताच्या नामस्मरणाने भक्तीमय वातावरण निर्माण होते. यामुळे सकाळी नित्याने परीसरातील भाविकांना भक्तीची गोडी लागत आहे. विशेष म्हणजे मंदिरात ते दररोज एकटेच उपस्थित असतात. अशी ही दिनचर्या त्यांची नित्याने जवळपास १६ ते १७ वर्षापासुन सुरु आहे.शेती मातेची सेवा केल्यास कष्टाचे फळ मिळतेच.
तर भगवंताची सेवा मनोभावे केली तर भक्तीमार्गातुन आत्मीक समाधान मिळते. सुखी, आरोग्यदायी जीवन जगण्याचा आनंद मिळतो. अशा या टेकवाडे खुर्द येथील रविंद्र पाटील या शेतकर्याच्या नित्यक्रमाचे , कार्याचे कौतुक होत आहे. शेती मातेची सेवा करा. भगवंताची भक्ती करा. भगवंत आपल्याला चांगलेच फळ देईल. आपली प्रगतीच होईल. असा संदेशही रविंद्र पाटील यांनी दिला आहे.
याबाबत माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे खुर्द येथील रहिवाशी आणि येथुन जवळच असलेल्या वाडे येथील माध्यमिक विदयालयाचा माजी विदयार्थी रविंद्र गोविंदा पाटील वय ५५ वर्ष यांना लहानपणापासुनच शेती मातीत काम करण्याची आवड होती. त्यांनी वाडे विदयालयात दहावीचे शिक्षण सन १९८५, १९८६ ला पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी चाळीसगाव येथील रा. स. शि. प्र. मंडळ काॅलेजमध्ये बी. ए. शिक्षण पुर्ण केले. उंच अन भरदार शरीर असा त्यांचा रुबाब होता. पोलीस भर्तीसाठी त्यांनी सराव केला. आणि रविंद्र पाटील हे १९८८ मध्ये धुळे येथे केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्समध्ये भरती झाले. त्यांनी १ वर्षासाठी कन्याकुमारीतील ( पल्लीकुरम ) येथे ट्रेनिंग पुर्ण केले. तेथुन ते पुणे येथे तळेगाव दाभाडे येथे केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्समध्ये १९८८, १९८९ मध्ये पोलीस हवालदार म्हणुन नोकरीला लागले. पोलीस हवालदाराची त्यांनी ३ वर्ष सेवा केली. माञ तेथील काहीसे वातावरण त्यांना पसंत पडले नाही. त्यात टेकवाडे खुर्द गावी बागायती शेती पाहण्यासाठी कुणी नसल्याने त्यांनी पोलीस हवालदाराच्या नोकरीला रामराम केला. आणि शेती व्यवसाय करण्यासाठी त्यांनी गावी परतीचा पल्ला गाठला. रविंद्र पाटील हे ४ भाऊ आहेत. ते टेकवाडे खुर्द येथील माजी सरपंच वाल्मिक गोविंदा पाटील यांचे लहान बंधु आहेत. हे कुटुंब कष्टाळु असुन बागायती शेतीचे चांगले उत्पन्न काढतात. रविंद्र पाटील यांचे वाटयाला ७ एकर जमिन असुन तेही केळी पिकाचे चांगले दर्जेदार उत्पन्न काढतात. शेती मातीत कष्ट करुन संसाराचा रहाटगाडगा चालवित आहेत.त्यांना शेती मातीची सेवा करण्यासोबतच लहान पणापासुन देवाची सेवा करण्याची मोठी आवड होती.
गावातील श्रीराम मंदिरात व श्री. हनुमान मंदिर परीसरात दररोज सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास झोपेतुन उठुन अंघोळ करुन या दोघ मंदिर परीसरात नियमित स्वच्छता करतात. पुजा पाठ करतात. सकाळी ४ वाजता श्रीराम मंदिरात नित्याने घंटा वाजवतात. व स्पिकरवर पावणेपाच ते साडेपाच वाजेपर्यंत संपुर्ण काकडा करतात. नंतर ते काकडा आरती, महादेवाची आरती म्हणतात. विशेष म्हणजे ते दररोज एकटेच असतात. सकाळच्या प्रहरी गिरणा नदीच्या काठी टेकवाडे खुर्द, बहाळ कसबे, बहाळ रथाचे यासह गावांना दररोज भगवंताच्या नामस्मरणाने भक्तीमय वातावरण निर्माण होते. भक्तीचा सुगंध दरवळत परीसरातील भाविकांना दररोज सकाळी नित्याने भगवंताच्या नामस्मरणाचा धार्मिकतेचा बोलबाला कानी पडत असतो. रविंद्र पाटील यांचा हा धार्मिकतेचा स्तुत्य कार्यक्रम नित्याचाच ठरत आहे. सकाळच्या प्रहरी या भगवंताच्या नामस्मरणाची परीसरातील भाविक, नागरीकांना दररोजची आतुरता असते. शेती मातीची सेवा अन भगवंताचे नामस्मरण केल्याचा आनंद अन समाधान असल्याचेही रविंद्र पाटील यांनी बोलतांना सांगीतले.