भडगाव येथील वरिष्ठ महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्धाटन संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि सौ. र.ना.देशमुख कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज भडगाव येथे महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा उद्धाटन कार्यक्रम कबचौउमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील यांचे हस्ते संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड सर, उपप्राचार्य प्रा.डॉ.दिपक मराठे सर,विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ. संजय भैसे सर,विद्यार्थी कल्याण सहअधिकारी प्रा.डॉ. चित्रा पाटील मॅडम,विद्यार्थी कल्याण सहअधिकारी प्रा.डॉ. देवेंद्र मस्की सर, सायबर साक्षरता विषयातील वक्त्या भडगाव पो.स्टे. च्या महिला पोलीस काँस्टेबल श्रीमती सोनी सपकाळे मॅडम, श्रीमती शमिका पठाण मॅडम हे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ॲड. अमोल पाटील यांनी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी युवतींनी आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. स्पर्धायुगात आवश्यकतेनुसार विविध कौशल्य आणि ज्ञान आत्मसात करून इतरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.
सायबर सुरक्षा या विषयावर श्रीमती सोनी सपकाळे मॅडम आणि श्रीमती शमिका पठाण मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.
६ जाने. ते ११ जाने.पर्यंत चालणाऱ्या या अभियानात सायबर सुरक्षा, बँक व्यवहार साक्षरता, स्वयंरोजगाराच्या शासकीय योजना, सॉफ्ट स्किल या विषयांवर विविध वक्त्यांची मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.
अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड सर, प्रास्ताविक प्रा.डॉ. संजय भैसे सर, सूत्रसंचलन प्रा.डॉ. चित्रा पाटील मॅडम, आभारप्रदर्शन प्रा.टेमकर मॅडम यांनी केले.