भाजपची मोठी कारवाई: पक्षाविरोधात काम करणाऱ्या 11 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

25

भाजपची मोठी कारवाई: पक्षाविरोधात काम करणाऱ्या 11 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपने पक्षाविरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर कठोर पावले उचलली आहेत. अकोला जिल्ह्यात पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषद सदस्यासह 11 लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील (Kishore Mangte Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराविरोधात या नेत्यांनी काम केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पक्षाची निवडणूक कामगिरी प्रभावित झाली, ज्यावरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना कळवण्यात आली असून पुढील निवडणुकांमध्ये पक्षशिस्त पाळण्यासाठी हा इशारा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निलंबित व्यक्तींची नावे:

 

प्रकाश आतकड (जिल्हा परिषद सदस्य)

राजेश उर्फ विष्णू येऊल (पंचायत समिती सदस्य)

मंगेश चिखले (माजी नगरसेवक)

प्रा. राजेंद्र पुंडकर (किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष)

विशाल गणगणे (ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष)

अरविंद लांडे (माजी तालुकाध्यक्ष)

राजेश पाचडे (माजी तालुका सरचिटणीस)

विष्णू बोडखे (ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य)

सुनील गिरी (माजी तालुका सरचिटणीस)

नीलेश तिवारी (युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस)

चंचल पितांबरवाले (माजी युवती प्रमुख, अकोला ग्रामीण)

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा