शौचाला गेली महिला, मागोमाग दीरही गेला वहिनीला त्या अवस्थेत पाहताच बेशुद्ध
लखनऊ :
उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला शौचाला जाते सांगून एकटीच घराबाहेर पडली. बऱ्याच वेळानंतर तिचा दिरही तिच्या मागोमाग गेला. दिराने वहिनीला अशा अवस्थेत पाहिलं की तो पुरता हादरला.
वहिनीला पाहताच दिर बेशुद्ध झाला. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लाहसी गावात राहणारी ही 35 वर्षांची महिला. मीना कुमारी असं तिचं नाव. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आपण शौचालायला जात आहे, असं मुलांना सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाला पण ती काही परत आली नाही. शेवटी तिचा दिर आणि तिची मुलं तिला शोधायला गेली. पण तिला पाहून सगळे घाबरले.
शनिवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास मीना दिसली ती शेतात. पण ती जिवंत नव्हती. तर शेतात तिचा रक्ताने माखलेला मृतदेह होता. बाजूलाच प्लॅस्टिकचा डबा पडला होता. वहिनीला अशा अवस्थेत पाहून दिर रडू लागला. वहिनी वहिनी मोठमोठ्याने ओरडू लागा. त्याचा आवाज ऐकून इतर ग्रामस्थ तिथं जमा झाले.
तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळे तिची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृताच्या दिराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास केला. त्यांच्याकडे अनेक महत्त्वाचे सुगावा लागल्याचा पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे. सीओ जगत कनोजिया म्हणाले की, कुटुंबाकडून कोणावरही आरोप करण्यात आलेले नाहीत.
शनिवारी सायंकाळी महिलेची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
महिलेच्या पतीने तीन वर्षांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली. महिलेला 3 मुलं. 17 वर्षांचा मोठा मुलगा पंजाबमध्ये राहतो, तिथंच काम करतो. 12 वर्षांची मुलगी शिवानी आईला घर आणि शेतीच्या कामात मदत करते. 10 वर्षांचा नाईक हा मुलगा पाचवीत शिकतो. कुटुंब वेगळं झाल्यानंतर या कुटुंबाला साडेतीन बिघा जमीन मिळाली आहे. या जमिनीवर शेती करून ही महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.
