Home Blog Page 8

मताधिक्यांचा पाऊस, विजयांचा इतिहास : भडगाववर शिवसेनेचा भगवा शिक्का.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने अभूतपूर्व यश मिळवत नगरराजकारणावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना नामोहरम केले आहे. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये मिळालेल्या विक्रमात्मक मताधिक्यामुळे हे उमेदवार शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

प्रभाग क्रमांक ३ अ : सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम

या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान प्रभाग क्रमांक ३ अ मधील शिवसेनेच्या उमेदवार आसिम भाऊ मिर्झा यांच्या मातोश्री सौ. मिर्झा अनजुमपरवीन हकीमबेग यांनी पटकावला आहे.

त्यांना तब्बल १७८५ मते मिळाली असून भाजपाच्या उमेदवार पठाण बिबाबी अमानुल्लाखान यांना केवळ ५३१ मते मिळाली.

यामुळे अनजुमपरवीन मिर्झा यांनी १२५४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम नोंदवला आहे.

प्रभाग क्रमांक ७ ब : शिवसेनेचा प्रचंड जनाधार

प्रभाग क्रमांक ७ ब मधून शिवसेनेचे शेख खलील शेख अजिज यांनी १६०३ मते मिळवत विजय मिळवला. भाजपाचे बेग न्यामतबेग हुकूमत यांना केवळ ४६१ मते मिळाली.या लढतीत ११४२ मतांचे प्रचंड मताधिक्य मिळवत शेख खलील यांनी शिवसेनेचा मजबूत जनाधार स्पष्ट केला.

प्रभाग क्रमांक ३ ब : हजाराहून अधिक मतांचे वर्चस्व

इतर मोठ्या फरकाने विजयी उमेदवार

प्रभाग ९ अ : भोसले विजयकुमार रायभान (शिवसेना) – १५०५ मते, फरक १०५३

प्रभाग क्रमांक ३ ब मधून शिवसेनेचे सय्यद इम्रानअली शहादतअली यांनी १६६८ मते मिळवली, तर भाजपाचे पठाण शेरखान मजिदखान यांना ६३६ मते मिळाली.

याठिकाणी १०३२ मतांच्या फरकाने शिवसेनेचा विजय झाला.

प्रभाग ६ ब : पाटील लखीचंद प्रकाश (शिवसेना) – १३९१ मते, फरक ६३४

प्रभाग ५ ब : परदेशी अतुलसिंह भिकनसिंह (शिवसेना) – ११९६ मते, फरक २३०

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरही मोठा फरक

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या रेखाताई प्रदीप मालचे यांनी भाजपाच्या सुशीलाबाई पाटील यांचा १५११ मतांनी पराभव करत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हा विजयही शहराच्या राजकारणात मैलाचा दगड मानला जात आहे.

जनतेचा स्पष्ट कौल

या निवडणुकीतील मोठ्या मताधिक्यांचे निकाल पाहता भडगाव शहरातील जनतेने विकास, स्थैर्य व नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेला स्पष्ट कौल दिल्याचे चित्र आहे.

नगरपरिषदेतील बहुसंख्य जागांवर मिळालेला विजय आणि काही प्रभागांतील विक्रमी मताधिक्य यामुळे आगामी काळात शिवसेनेचे स्थान अधिक बळकट होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय; रेखाताई मालचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी तर भाजपाच्या सुशीलाबाई पाटील पराभुत.!!!

भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय; रेखाताई मालचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी तर भाजपाच्या सुशीलाबाई पाटील पराभुत.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला असून शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रेखाताई प्रदीप मालचे यांनी १२ हजार ९५५ मतांचे आघाडीचे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. रेखाताई मालचे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुशीलाबाई शांताराम पाटील यांचा १ हजार ५११ मतांनी पराभव केला. रेखाताई मालचे यांना एकूण १२,९५५ मते, तर सुशीलाबाई पाटील यांना ११,४४४ मते मिळाली. या विजयामुळे भडगाव नगरपरिषदेत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला असून सेनेचे नेतृत्व अधिक भक्कम झाले आहे.

नगरसेवक निवडणुकीतही शिवसेनेने बहुसंख्य जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण १२ प्रभागांतील २४ नगरसेवक पदाकरिता शिवसेनेने १९ नगरसेवक तर भाजपा ने ४ नगरसेवक व यामध्ये प्रभाग क्रमांक सात अ मधून अपक्ष उमेदवार यांनी आपली बाजी लावली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

याबाबत प्रभाग निहाय निवडुन आलेले विजयी व पराभुत उमेदवार

प्रभाग क्रमांक १अ मधून भिल अंजना हिंम्मत भाजपा ८८६ मते (विजयी), मालचे लताबाई अजय अपक्ष २२९ मते (पराभूत) रंजना रविंद्र सोनवणे शिवसेना ८७७ मते (पराभूत)

प्रभाग क्रमांक १ ब मधून नरवाडे शिवसेना ६९४ मते (पराभूत) पाटील जितेंद्र विठ्ठल भाजपा ७४९ मते (विजयी) पाटील सुशिलाबाई भगवान अपक्ष ५६५ (पराभूत)

प्रभाग क्रमांक दोन अ मधून देशमुख विजयकुमार नानासाहेब शिवसेना १३१४ मते (विजयी) पाटील मीनाक्षीबाई नारायण भाजपा ६१३ मते (पराभूत) शिरसाठ महेश राजेंद्र अपक्ष १८ (पराभूत)

प्रभाग क्रमांक दोन ब मधून पठाण खालेदाबी नसीर खान भाजपा ५३० मते (पराभूत) मोरे चैताली जगन्नाथ अपक्ष ६४६ मते (पराभूत) वाघ रंजनाबाई अनिल शिवसेना ७४४ मते (विजयी)

प्रभाग क्रमांक तीन अ मधून पठाण बिबाबी अमानुल्लाखान भाजपा ५३१ मते(पराभूत) मिर्झा अनजुमपरवीन हकीमबेग शिवसेना १७८५ मते (विजयी) तर नोटा ४४ मते

प्रभाग क्रमांक तीन ब मधून पठाण शेरखान मजिदखान भाजपा ६३६ मते (पराभूत) सय्यद इम्रानअली शहादतअली शिवसेना १६६८ (विजयी) नोटा ५६ मते

प्रभाग क्रमांक चार अ मधून देशमुख करुणाबाई सुनिल शिवसेना १०६१ मते (विजयी) पवार पुष्पांजली प्रशांत भाजपा ९६३ मते (पराभूत) नोटा २८ मते

प्रभाग क्रमांक चार ब मधून चोरडिया सचिन विनोदकुमार भाजपा ११४२ मते (विजयी) ततार महेंद्र वसंत शिवसेना ८९० मते (पराभूत) नोटा २० मते

प्रभाग क्रमांक पाच अ मधून पाटील कविता सोमनाथ भाजपा १०७९ मते (पराभूत) पाटील किरण अतुल शिवसेना १०९१ मते (विजयी) नोटा ११ मते

प्रभाग क्रमांक पाच ब मधून परदेशी अतुलसिंह भिकनसिंह शिवसेना ११९६ मते (विजयी) पवार जितेंद्र भास्करराव भाजपा ९६६ मते (पराभूत) नोटा १९ मते

प्रभाग क्रमांक सहा अ मधून पाटील आशाबाई रंगनाथ भाजपा ९१९ मते (पराभूत) येवले योगिता शशिकांत शिवसेना १२५४ मते (विजयी) नोटा १९ मते

प्रभाग क्रमांक सहा ब मधून पाटील प्रशांत पांडुरंग भाजपा ७५७ मते (पराभूत) पाटील लखीचंद प्रकाश १३९१ मते (विजयी) नोटा ४४ मते

प्रभाग क्रमांक सात अ मधून परदेशी निता गणेश शिवसेना १०४९ मते (पराभूत)

फकीर नगमाबी अलीमशाह अपक्ष १२४१ मते (विजयी)

सूर्यवंशी दिपाली नरेंद्रसिंग भाजपा ४२९ मते (पराभूत ) नोटा २० मते

प्रभाग क्रमांक सात ब खान सलीमाबी शब्बीर रा. काँ. पा. ३७४ मते (पराभूत) थोरात अमोल सुरेश उ. बा. ठा. २१२ मते (पराभूत) धोबी भरत किसन अपक्ष ४६ मते (पराभूत) बेग न्यामतबेग हुकूमत भाजपा ४६१ मते (पराभूत) शेख खलील शेख अजिज शिवसेना १६०३ मते (विजयी) नोटा ४३ मते

प्रभाग क्रमांक आठ अ मधून डॉ. पाटील पूनम प्रशांत भाजपा १२८७ मते (पराभूत) पाटील समीक्षा लखीचंद शिवसेना १३०१ मते (विजयी) नोटा २७ मते

प्रभाग क्रमांक आठ ब मधून

ॲड. पाटील अमोल नाना भाजपा १५२३ मते (विजयी) डॉ. पाटील प्रमोद हेमराज शिवसेना ९०२ मते (पराभूत) वाडेकर भूषण प्रकाश उ.ठा.बा. १७१ मते (पराभूत) नोटा १९ मते

प्रभाग क्रमांक नऊ अ मधून पाटील शेखर दिनानाथ भाजपा ४५२ मते (पराभूत) भोसले विजयकुमार रायभान शिवसेना १५०५ मते (विजयी) महाजन उज्वल अनिल रा. काॅ.पा. ७६ मते (पराभूत) नोटा १४ मते

प्रभाग क्रमांक नऊ ब मधून पाटील योजना दत्तात्रय भाजपा ८५८ मते (पराभूत) पाटील वैशाली विशाल शिवसेना ११६३ मते (विजयी) नोटा २६ मते

प्रभाग क्रमांक दहा अ मधून पाटील प्रवीण वसंत भाजपा ५८३ मते (पराभूत) पाटील राजेंद्र महादू शिवसेना १०६५ मते (विजयी) पाटील विठ्ठल कौतिक अपक्ष ४६ मते (पराभूत) नोटा १७ मते

प्रभाग क्रमांक दहा ब मधून पाटील ज्योती जितेंद्र शिवसेना ९९१ मते (विजयी) पाटील हर्षा विठ्ठल उ.बा.ठा.१६० मते (पराभूत) बोरसे कुसुम सुभाष भाजपा ३३६ मते (पराभूत) शेख शहनाजबी अनिस अपक्ष १८४ मते (पराभूत) सेय्यद शकील इब्राहिम अपक्ष २८ मते (पराभूत) नोटा १२ मते

प्रभाग क्रमांक अकरा अ मधून अहिरे अविनाश पुंडलिक अपक्ष ६७८ मते (पराभूत) अहिरे देवाजी बापू शिवसेना ९३६ मते (विजयी) वाघ योगिता अनिल भाजपा ६८९ मते (पराभूत)मोरे सुरेंद्र चंद्रराव उ.बा.ठा. १९ मते (पराभूत) नोटा १५ मते

प्रभाग क्रमांक अकरा ब मधून भोई कल्पनाबाई जगन शिवसेना १२०१ मते (विजयी) भोई पुष्पाबाई अशोक अपक्ष ५१ मते (पराभूत) पाटील मीनाक्षी भूषण भाजपा १०३३ मते (पराभूत) नोटा ५२ मते

प्रभाग क्रमांक बारा अ मधून ठाकरे राहुल राजेंद्र शिवसेना १०७० मते (विजयी) मालचे रितेश राजेश अपक्ष ८२ मते (पराभूत) सोनवणे रवींद्र शांताराम भाजपा ९१८ मते (पराभूत) नोटा ३७ मते

प्रभाग क्रमांक बारा ब मधून अहिरे कमलबाई पुंडलिक अपक्ष ५३ मते (पराभूत) पठाण रुखसरबी शाहरुखखान भाजपा ८०५ मते (पराभूत) बाविस्कर मनीषा हिरामण रा. काँ. पा. ११७ मते (पराभूत) महाजन वैशाली संतोष शिवसेना १०७० मते (विजयी) नोटा ६२ मते.

भडगाव नगरपरिषद निवडणूक  प्रभाग क्रमांक ३ वर शिवसेनेचा झेंडा, दोन्ही उमेदवार दणदणीत विजयी.!!!

भडगाव नगरपरिषद निवडणूक  प्रभाग क्रमांक ३ वर शिवसेनेचा झेंडा, दोन्ही उमेदवार दणदणीत विजयी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या प्रभागातून शिवसेनेच्या मिर्झा अंजुम परविन हकीमबेग यांनी १७८५ मतांनी स्पष्ट विजय मिळवला, तर सय्यद इमरान अली शहादतअली यांनी १६६८ मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.

या निकालामुळे संपूर्ण प्रभागात शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निकाल जाहीर होताच ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला. प्रभागातील नागरिकांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांनी मतदारांचे आभार मानले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच इतर मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या विजयामुळे भडगाव नगरपरिषदेत शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक व लोकाभिमुख निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

नर्सरीतील चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी भडगाव शंभर टक्के बंद शहरातील व्यवहार ठप्प.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

नर्सरीत शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकल्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज भडगाव शहरात सर्वपक्षीय वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाले होते.

दिनांक 16 रोजी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे कोल्हा नाल्याच्या पाण्यात पडून नर्सरीत शिकणाऱ्या अंश सागर तहसिलदार वय-३वर्ष ६ महिने व मयांक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ वय- ४ वर्ष २ महिने या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ व दोषींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण भडगाव शहरात स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद पाळण्यात आला.

सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी संकुले, बसस्टँड परिसर, बडे सर कॉम्प्लेक्स, नवकार प्लाझा, चाळीसगाव रस्ता, पाचोरा रस्ता, पेठ भागातील लहान-मोठी दुकाने पूर्णतः बंद होती. खासगी कार्यालये, शाळा व महाविद्यालयांवरही बंदचा परिणाम दिसून आला. रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.

या बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा तैनात बंदोबस्त होता. बंद काळात कुठेही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, सदर घटनेतील आठ ते दहा आरोपी अद्याप फरार असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, शाळेचे संचालक मंडळ बखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज दुपारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार शितल सोलाट व पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना देण्यात आले

एकूणच, चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी भडगाव शहराने दाखवलेली एकजूट लक्षवेधी ठरली असून बंद शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पडल्याचे चित्र दिसून आले.

कौशल्यातून उद्योजकतेकडे वाटचाल : माटुंग्यात विद्यार्थिनींसाठी ‘उद्योजक मेळावा’

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर, श्रीमती मनिबेन एम. पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयातील बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग तसेच ‘दे आसरा’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माटुंगा येथील विसनजी रावजी ऑडिटोरियममध्ये ‘उद्योजक मेळावा’ या लघुउद्योजक प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास विविध क्षेत्रांतील उद्योजक, प्राध्यापकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील कला शाखा प्रमुख डॉ. सरिता कासरलकर यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करत स्वयं-लघुउद्योजकतेकडे कसे वळावे, याविषयी आपले विचार मांडले. तसेच त्यांनी सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यानंतर महाविद्यालयाच्यावतीने प्रमुख अतिथी ‘दे आसरा’ फाउंडेशनचे सहसंस्थापक व मानसशास्त्रज्ञ डॉ. आनंद गोडसे आणि अजय कौटिकवार, तसेच सन्माननीय अतिथी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत, जिल्हा कौशल्य अधिकारी विद्या शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करून यथोचित सन्मान करण्यात आला.

 

प्रास्ताविकात सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी कौशल्य विकास, उद्योजकता आणि रोजगार निर्मितीमध्ये शासनाची भूमिका स्पष्ट करत या उपक्रमामागील उद्देश विषद केला व प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. आनंद गोडसे यांनी स्व-कौशल्याचे यशस्वी उद्योजकतेमध्ये रूपांतर करताना मानसिक व शारीरिक क्षमतांचा विकास कसा करावा, तसेच व्यवसाय वृद्धीसाठी प्रभावी नेटवर्किंगचे महत्त्व काय आहे, याविषयी सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अजय कौटिकवार यांनी सोशल मीडिया मार्केटिंगच्या प्रभावी वापरातून व्यवसाय कसा विस्तारता येतो, याबाबत विविध उदाहरणांसह माहिती देत नवउद्योजक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

 

या उपक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधवी पवार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले, तर आभार प्रदर्शन बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स विभागाचे समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांनी केले. या उद्योजक मेळाव्यात १० महिला उद्योजिका, २५ उद्योजक तसेच १६० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन कौशल्याधारित व्यवसायाच्या संधींबाबत नवी दिशा मिळाली असून, कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

निवडणूक आयोगाचा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा,निधी वितरणासाठी मिळाला ग्रीन सिग्नल ,खात्यात केव्हा जमा होणार पैसे.?

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात एकूण तीन टप्प्यात होणार आहेत. दोन डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली.

मात्र काही कारणास्तव राज्यातील काही जागांवरील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या निवडणुकाचे मतदान आता उद्या अर्थातच वीस डिसेंबर रोजी घेतले जाणार आहे. शिवाय राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

यामुळे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता सुरू आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असतानाच आता लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

खरे तर स्थानिकच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत. दरम्यान आता याच संदर्भात एक नवे अपडेट हाती आल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. विशेष बाब अशी की यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे आणि लवकरच हा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे.

खरे तर आचारसंहिता सुरू असल्याने निधी वितरणासाठी अडचणी येणार अशी शक्यता होती. मात्र निवडणूक आयोगाकडून लाडक्या बहिणींना हफ्ता वितरित करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वितरणासाठी मंजुरी दिली असल्याची एक बातमी प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या अहवालातून समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने दिली मोठी माहिती

राज्य निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजना आधीपासूनच सुरू असल्याने या योजनेच्या निधी वितरणास आचारसंहितेचा अडसर येत नसल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती समोर आली आहे. योजना नवीन नाही , योजना जुनी आहे म्हणूनच योजनेच्या निधी वितरणावर आचारसंहितेमुळे कोणताही प्रतिबंध लावता येऊ शकत नाही असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या निधी वितरणाबाबत निवडणूक आयोगाला अजून विचारण्यात आलेली नाही. राज्य शासनाने निधी वितरणासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितलेली नाही.

मात्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत योजनेच्या हप्त्याच्या वितरणाशी आचारसंहितेचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता सोबतच दिला जाऊ शकतो अशा चर्चांनी आता जोर पकडला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार महापालिका निवडणूकांच्या चार ते पाच दिवस आधी लाडक्या बहिणींना सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्रित रित्या दिले जाऊ शकतात.

दुसरीकडे लाडक्या बहिणींना केवायसी बंधनकारक करण्यात आली असून केवायसी प्रक्रियेतून जवळपास 40 ते 50 लाख लाभार्थी वगळले जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे. केवायसी साठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. यामुळे या मुदतीत महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

रासायनिक खतांची बेकायदेशीर वाहतूक उघड२५ टन युरिया जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा

 

 

भडगाव | प्रतिनिधी

भडगाव येथून रासायनिक खतांची बेकायदेशीर वाहतूक करून ती काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा प्रकार कृषी विभागाच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. या कारवाईत इफको कंपनीचा २५ टन युरिया जप्त करण्यात आला असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा स्तरीय भरारी पथकाला भडगाव येथून खतांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भडगाव येथून संशयित ट्रकचा पाठलाग करण्यात आला. सदर ट्रक चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळील साईनाथ भारत पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी अडविण्यात आला.

तपासणीदरम्यान ट्रकमध्ये इफको कंपनीचा युरिया खताच्या ४५ किलो वजनाच्या ५५० बॅगा आढळून आल्या. सदर खताची एकूण किंमत सुमारे १ लाख ४६ हजार ३०० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. ट्रक चालकाकडे सदर मालाबाबत कोणतेही बिल, डिलिव्हरी चलन अथवा परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीत ट्रक चालकाने आपले नाव नाजीम रहीम शिसगर (वय ४३, रा. हनुमान नगर, ता. चांदवड, जि. नाशिक) असल्याचे सांगून सदर खत भडगाव येथील स्वामी ऍग्रो या कृषी सेवा केंद्रातून भरल्याचे कबूल केले.

या प्रकरणी ट्रक चालकासह स्वामी ऍग्रो सेवा केंद्राचा मालक व एका अज्ञात इसमाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल भडगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा करीत आहेत.

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २१ डिसेंबर रोजी मतमोजणी, प्रशासन सज्ज.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण नगरपरिषद क्षेत्रातील सर्व १२ प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण ४३ मतदान केंद्रांवर सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार या निवडणुकीची मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे. मतमोजणीचे काम भडगाव तालुका क्रीडा संकुल, पाचोरा रोड, भडगाव येथे होणार असून, याठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सर्व तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.

मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण ६० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले असून, मतदान यंत्रावरील मतमोजणीसाठी ६ टेबल आणि पोस्टल मतदानासाठी स्वतंत्र १ टेबल अशा एकूण ७ टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया साधारण ७ ते ८ फेऱ्यांमध्ये पार पडणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे २ ते ३ प्रभागांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन व पोलीस विभागाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तालुका क्रीडा संकुल परिसरात पोलीस बंदोबस्त, प्रवेश नियंत्रण, वाहतूक नियमन तसेच सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केवळ अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक आयोगाने दिलेल्या पासधारकांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.

भडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागले असून, मतमोजणीनंतर नगरपरिषदेतील सत्तासमीकरण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असून, २१ डिसेंबर रोजी भडगाव नगरपरिषदेला नवे नेतृत्व मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

महानगरपालिका निवडणुका २०२६ : ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ‘नोटा’चा इशारा.!!!

महानगरपालिका निवडणुका २०२६ : ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ‘नोटा’चा इशारा.!!!

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील मुंबईसह सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होत असून, या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ठाम भूमिका मांडली. लाखो ज्येष्ठ नागरिकांचे “सिल्व्हर व्हॉइसेस” ऐकले गेले पाहिजेत, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा अर्थपूर्ण सहभाग सुनिश्चित केला गेला पाहिजे, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक हे केवळ लाभार्थी नसून सुमारे २५ टक्के मतदानसंख्या असलेला एक महत्त्वाचा मतदारवर्ग असल्याने, त्यांच्या मागण्या दुर्लक्षित राहिल्यास आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘नोटा’ या लोकशाही पर्यायाचा वापर करण्याचा इशाराही संयुक्त कृती समितीने दिला. “ज्येष्ठांना दया नव्हे, तर सन्मान हवा,” असे ठाम मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

२०१२ पासून कार्यरत असलेल्या संयुक्त कृती समितीच्या मंचामध्ये २८ ज्येष्ठ नागरिक संघटना, स्वयंसेवी संस्था, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांची सनद (चार्टर ऑफ डिमांड्स) सादर करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात सध्या सुमारे १.५ कोटी ज्येष्ठ नागरिक असून ते राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ११.७ टक्के आहेत. मुंबईत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे १५ लाख असून, २०३१ पर्यंत ती जवळपास २४ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने २०१३ साली जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणाचा उद्देश ‘वय-मैत्रीपूर्ण मुंबई’ निर्माण करणे हा होता. या धोरणांतर्गत डे-केअर सेंटर्स, नाना–नानी उद्याने, ज्येष्ठांसाठी विशेष रुग्णालय सुविधा, वैद्यकीय हेल्पलाईन तसेच रॅम्प्स व हॅण्डरेल्ससह सुलभ सार्वजनिक पायाभूत सुविधांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, पुरेशा निधीअभावी आणि स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणेच्या अभावामुळे या धोरणाची अंमलबजावणी अपुरी आणि संथ राहिल्याची तीव्र खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

पत्रकार परिषदेत बोलताना मुंबईच्या माजी महापौर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी स्पष्ट केले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित होणारे मनोरंजनात्मक व विरंगुळ्याचे उपक्रम उपयुक्त असले तरी त्यांच्या आरोग्यसेवा, रुग्णालयांतील स्वतंत्र सुविधा, डे-केअर सेंटर्स, नाना–नानी उद्याने, थेरपी आणि काळजी सेवा या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नाही. मुंबईसारख्या महानगरात १५ लाख ज्येष्ठ नागरिक असताना या सुविधा अत्यंत अपुऱ्या असून, त्या तातडीने आणि मोठ्या प्रमाणावर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

संयुक्त कृती समितीच्या सनदीनुसार महानगरपालिका अर्थसंकल्पातील किमान १० टक्के निधी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राखीव ठेवावा, प्रत्येक प्रभागात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक अधिकारी नेमावा, तसेच ‘वय-मैत्रीपूर्ण मुंबई’साठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा आणि स्वतंत्र अर्थसंकल्प तातडीने स्थापन करावा, अशी ठोस मागणी करण्यात आली. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी ज्येष्ठ नागरिकांची सनद त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात औपचारिकरीत्या समाविष्ट करून कालबद्ध व मोजता येण्याजोग्या कृतींची हमी द्यावी, असेही आवाहन करण्यात आले. मागील निवडणुकांमध्ये ‘नोटा’च्या वाढलेल्या प्रमाणाचा उल्लेख करत, आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन सोफिया महाविद्यालयाच्या प्रा. अनघा तेंडुलकर यांनी केले, तर शैलेश मिश्रा यांनी आभार प्रदर्शन केले. विचारमंचावर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर, प्रकाश बोरगांवकर, विजय औंधे, डॉ. रेखा भटखंडे आणि शैलेश मिश्रा उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, सुरक्षितता, सहभाग आणि स्वावलंबन मिळाले पाहिजे, हा ठाम संदेश या पत्रकार परिषदेतून देण्यात आला.

अलसूफ्फा फाउंडेशनतर्फे जारगावच्या नवनिर्वाचित सरपंच दानिश बागवान यांचा पाचोरा येथे सत्कार

 

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी निवड झाल्याबद्दल दानिश मुख्तार बागवान यांचा अलसूफ्फा फाउंडेशनच्या वतीने पाचोरा येथे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सामाजिक सलोखा, विकासात्मक दृष्टीकोन आणि लोकाभिमुख कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दानिश बागवान यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी अलसूफ्फा फाउंडेशनचे अध्यक्ष मुस्लिम भाई बागवान होते. कार्यक्रमास जारगाव ग्रामपंचायतीचे सदस्य इस्राईल बागवान, राजू शेख, रज्जू बागवान, अकबर बिल्डर, हमीद शाह तसेच नवनिर्वाचित सरपंच दानिश बागवान यांचे वडील मुख्तार गनी बागवान यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक रहीम बागवान यांनी नवनिर्वाचित सरपंचाने सर्व समाजघटकांना सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मोहसीन खान सर यांनी ग्रामविकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असून दानिश बागवान यांच्या नेतृत्वाखाली जारगाव ग्रामपंचायत निश्चितच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास तसलीम बागवान, हाजी सलीम बागवान, वसीम यासीन बागवान, नईम हाजी सलीम बागवान, माजी नगरसेवक अय्युब बागवान, बागवान जमात अध्यक्ष शकुर बागवान, ॲड. वसीम बागवान, इमाद बागवान, शकील बरफवाला, अज्जू भाई खान, शाकीर बागवान, रफीक शब्बीर बागवान, अक्रम कुरेशी, अमीन बागवान, अनस बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फहीम सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक रहीम बागवान यांनी मानले. सदर कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात उत्साहात पार पडला.

error: Content is protected !!