जळगावसामाजिक

पाचोरा येथे परदेशी, राजपुत समाजाचा वधु, वर परिचय संमेलन उत्साहात संपन्न.!!!

३१० युवक, युवतींची अर्ज नोंदणी.

पाचोरा येथे परदेशी, राजपुत समाजाचा वधु, वर परिचय संमेलन उत्साहात संपन्न.!!!

३१० युवक, युवतींची अर्ज नोंदणी.

पाचोरा प्रतिनिधी :-

 पाचोरा येथे परदेशी राजपूत समाजाचा वधू-वर परिचय संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम नुकताच सोनाई मंगल कार्यालय पाचोरा जि. जळगाव येथे आयोजीत करण्यात आला होता. वधु वर परिचय सम्मेलन कार्यक्रमाची संकल्पना तंटामुक्ती जिल्हाध्यक्ष विनोद जोनवाल ,उपाध्यक्ष भगवान देडवाळ, परदेशी, राजपुत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी,जिल्हा सचिव विनोदसिंग परदेशी, पाचोरा तालुकाध्यक्ष इंदल गोठवाल यांनी मांडली होती.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणेश परदेशी माजी नगराध्यक्ष भडगाव हे होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह व श्री. मीनेश भगवान यांच्या प्रतिमांचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परदेशी राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी यांनी केले.याप्रसंगी परदेशी राजपूत उन्नती मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कर्तारसिंग परदेशी यांनी समाज संघटन का गरजेचे आहे हे विशद केले. डॉ. भगवानसिंग डोभाळ सिनेट सदस्य संभाजीनगर व प्रा. सुमेरसिंग राजपूत यांनी विवाह संस्था टिकवणे ही काळाची गरज आहे तसेच चांगले मेहनती,होतकरू मुले असतील तर अशा मुलांना पालकांनी आपल्या मुली द्यायला हरकत नाही हे पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार किशोर पाटील यांनी आज शेतकरी मुले कष्ट करतात तरी त्यांना मुली भेटत नाहीत ही खंत व्यक्त केली. तसेच उपस्थित सर्व पालकांना आपल्या मुलीसाठी स्थळ शोधताना प्रामाणिक ,

निर्व्यसनी व मेहनती मुलगा शोधावा असेही सांगितले. तंटामुक्ती अध्यक्ष विनोद जोनवाळ व भगवान देडवाळ यांनी समाजाला लाभ व्हावा व समाजातील तंटे सामोपचाराने मिटवले जावेत यासाठी तंटामुक्ती समितीस पाचारण करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी सुमारे ३१० युवक युवतींनी नोंदणी केलेली होती. त्यानुसार सर्व स्तरातील युवक युवतींनी याप्रसंगी आपला परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी पाचोरा तालुकाध्यक्ष इंदल गोठवाळ, चाळीसगाव अध्यक्ष भगवान महेर , भडगाव अध्यक्ष अशोक परदेशी , जामनेर अध्यक्ष अमोल कायटे, कन्नड अध्यक्ष प्रकाश चांदा,सोयगावचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल महेर, प्रताप महेर, कैलास डोभाळ, देवीलाल राजपूत व संपूर्ण पाचोरा टीम ने घेतलेली होती. याप्रसंगी शिवसेना नेते दीपक राजपूत, आण्णा काहीटे, गाळणचे सरपंच विजय परदेशी, मदन परदेशी पढावत, कैलास डोभाळ, हरी परदेशी, भरतसिंग छानवाल,भगवान लोदवाळ ,प्रकाश देटवाडे, महिपालसिंग चांदा,

भीमसिंग कहाटे, मंगलसिंग सिंगल, महेंद्र बारवाल, मदनसिंग राजपूत,परमेश्वर गोमलाडू ,शैलेंद्र राजपूत, महंत ज्ञानेश्वर माऊली, विजयसिंह परदेशी, गोविंद लुकडे, मंगल जारेवाल , इच्छाराम राजरवाल , मेहुल ताटू ,किरण चन्नावत, विजय पाकळ, जगदीश कोटवाळे, मिथुन परदेशी, प्रेम परदेशी, सुनील परदेशी, जगतसिंग राजपुत, निलेश महाजन, मोतीलाल घुशिंगे,रुमसिंग परदेशी, भिकन परदेशी, बाबाजी डेटवाडे, मोहन परदेशी ,सुभाष परदेशी,गोकुळ राजरवाल , शरद चांदा,किशोर राजपूत,कल्पना ताटू , माजी उपसरपंच उषाबाई परदेशी, कमलाबाई परदेशी, मीराबाई परदेशी डॉ.रूपाली राजपूत तसेच सर्व समाज संघटनेचे पदाधिकारी,सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व समाजाचे पदाधिकारी, समाजबांधवांनी कार्यक्रमासाठी अनमोल परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप परदेशी, विनोदसिंग परदेशी व संगीता परदेशी यांनी केले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!