वाडे येथील चिमुकल्यांची शैक्षणिक सहल संपन्न.!!!
प्रेक्षणिक स्थळांचा घेतले दर्शन.
भडगाव वार्ताहर —
तालुक्यातील वाडे येथील,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच एक दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली. या सहलीत विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातील वणी सप्तशृंगी गड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच नाशिक शहरातील विविध प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घेतले.
या शैक्षणिक सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना धार्मिक, सांस्कृतिक व भौगोलिक वारशाची प्रत्यक्ष माहिती मिळावी हा होता. सप्तशृंगी गडावर विद्यार्थ्यांनी देवीच्या दर्शनासह डोंगररांगांचे नैसर्गिक सौंदर्य अनुभवले. दिंडोरी येथील स्वामी समर्थ मंदिरात आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेत विद्यार्थ्यांना भक्ती व सदाचाराचे महत्त्व सांगण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेताना त्या स्थळाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व शिक्षकांनी समजावून सांगितले.
संपुर्ण सहल शिस्तबद्ध, सुरक्षित व आनंददायी वातावरणात पार पडली. सहलीचे नियोजन शाळेतील शिक्षकवृंदांनी केले आहे. पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातुन ज्ञान मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
सहलीमुळे विद्यार्थ्यांना धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष माहिती मिळाली. सहल सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सहलीचे प्रमुख सचिन वाघ होते. शाळेच्या या उपक्रमाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.
सर्व विद्यार्थ्यांना संध्याकाळच्या जेवणाचा सर्व खर्च गावातील वि.का.सोसायटी माजी चेअरमन देविदास सहादु महाजन यांचे भाचे हर्षल सोनवणे कॉन्ट्रॅक्टर मालेगावकर त्यांनी स्वतःहून निस्वार्थ भावाने दिला. यांचे शाळेच्या वतीने आभार मानले आहेत.



