क्राईमजळगावमहाराष्ट्र

पाचोरा तालुक्यात विवाहित महिलेला धमकावून लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

पाचोरा तालुक्यात विवाहित महिलेला धमकावून लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

पाचोरा प्रतिनिधी :-

 

पाचोरा तालुक्यातील एका २३ वर्षीय विवाहित महिलेला धमकी देत तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित व्यक्तीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कु-हाड तांडा परिसरातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने पीडित महिलेला तिच्या अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेबाबत भीती दाखवून मानसिक दबावाखाली ठेवले. या दबावाखाली दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १ वाजता संबंधित व्यक्तीने महिलेला पाचोरा शहरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत नमूद आहे.

 

यानंतरही संबंधित व्यक्तीने महिलेला सातत्याने धमकावत समाजात बदनामी करण्याची तसेच मुलीच्या जीवाला धोका पोहोचवण्याची भीती दाखवली. या कारणामुळे दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी पीडितेला अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले, तेथे पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा क्रमांक ४४/२०२६ अन्वये संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(२)(m), ११५(२), ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा तपास पाचोरा पोलीस करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!