जळगावसामाजिक

खाटीक कुटुंबाच्या दुःखात मनियार बिरादरी धावून आली; मानवतेचे दर्शन.!!!

खाटीक कुटुंबाच्या दुःखात मनियार बिरादरी धावून आली; मानवतेचे दर्शन.!!!

जळगाव प्रतिनिधी :-

गेंदालाल मिल परिसरात राहणारे नासीर रशीद खाटीक यांच्या घरी नुकतीच झालेल्या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशा कठीण प्रसंगी धर्म, जात व बिरादरीच्या सीमा ओलांडत मनियार बिरादरी मानवतेचा आधार घेऊन या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावली.

आज दैनिकात प्रसिद्ध झालेली बातमी वाचताच जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता आपल्या सहकाऱ्यांसह थेट पीडित कुटुंबाच्या घरी भेट दिली. यावेळी युसुफ आमद, जुलकर नैन, रऊफ टेलर, अख्तर शेख, आवेश मनियार, नबील शेख, अल्ताफ शेख हे उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष फारुख शेख यांनी नासीर खाटीक व त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत त्यांना मानसिक धीर दिला. मनियार बिरादरीतर्फे तात्काळ ₹5,500 रुपयांची रोख आर्थिक मदत देण्यात आली. तसेच त्यांच्या मुलीच्या येणाऱ्या विवाहासाठी आवश्यक संपूर्ण स्वयंपाकघरातील साहित्य देण्याचे आश्वासन देत मानवतेचे उदाहरण समाजासमोर ठेवले.

या मदतीमुळे खाटीक कुटुंबाला केवळ आर्थिक आधारच मिळाला नाही, तर मानसिक बळही मिळाले. संकटाच्या काळात समाजाने साथ दिल्यास कोणतेही दुःख हलके होते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मनियार बिरादरीच्या या संवेदनशील व सामाजिक जबाबदारीने परिपूर्ण भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ही घटना समाजात बंधुतेचा, एकोप्याचा व मानवतेचा संदेश देणारी प्रेरणादायी मिसाल ठरत आहे.

 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!