क्राईमजळगावमहाराष्ट्र

कजगाव ता.भडगाव येथे पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात चोरी, भाविकांमध्ये संताप.!!!

कजगाव ता.भडगाव येथे पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात चोरी, भाविकांमध्ये संताप.!!!

(अमीन पिंजारी)भडगाव ता. प्रतिनिधी :-

कजगाव ता.भडगाव येथील कजगाव वाडे मार्गावरील मनमाड कंपनी भागातील पुरातन मनकामेश्र्वर महादेव मंदिरात दि.२२ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करत मंदिरातील तांबे पितळ च्या ७० ते ८० हजार रुपये किंमतीच्या वस्तु लांबविल्या. तोंडावर आलेल्या महाशिवरात्री च्या अगोदर झालेल्या चोरी  मुळे शिवभक्तात संतापाची लाट उसळली असुन गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी महाशिवरात्री च्या अगोदर या चोरीचा तपास लावावा अशी अपेक्षा शिवभक्तांनी व्यक्त केली आहे. चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.

 

कजगाव वाडे मार्गावरील संजय चिला पाटील यांच्या शेतातील (जिन)भागातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात दि.२२ च्या रात्री अज्ञात चोरटयांनी मंदिरातील तांबे पितळ यांचे विविध वस्तु अंदाजे ७० ते ८० हजार रुपये किंमतीच्या लांबविल्या. याचं मंदिरात या अगोदर देखील तीन ते चार वेळेस चोऱ्या झाल्या आहेत मात्र एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याने पोलीस खात्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तोंडावर आलेल्या महाशिवरात्री पर्वाच्या तीन दिवस अगोदर महादेव मंदिरात चोरी केल्याने शिवभक्तातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असुन गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!