कजगाव ता.भडगाव येथे पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात चोरी, भाविकांमध्ये संताप.!!!
(अमीन पिंजारी)भडगाव ता. प्रतिनिधी :-
कजगाव ता.भडगाव येथील कजगाव वाडे मार्गावरील मनमाड कंपनी भागातील पुरातन मनकामेश्र्वर महादेव मंदिरात दि.२२ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करत मंदिरातील तांबे पितळ च्या ७० ते ८० हजार रुपये किंमतीच्या वस्तु लांबविल्या. तोंडावर आलेल्या महाशिवरात्री च्या अगोदर झालेल्या चोरी मुळे शिवभक्तात संतापाची लाट उसळली असुन गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी महाशिवरात्री च्या अगोदर या चोरीचा तपास लावावा अशी अपेक्षा शिवभक्तांनी व्यक्त केली आहे. चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.
कजगाव वाडे मार्गावरील संजय चिला पाटील यांच्या शेतातील (जिन)भागातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात दि.२२ च्या रात्री अज्ञात चोरटयांनी मंदिरातील तांबे पितळ यांचे विविध वस्तु अंदाजे ७० ते ८० हजार रुपये किंमतीच्या लांबविल्या. याचं मंदिरात या अगोदर देखील तीन ते चार वेळेस चोऱ्या झाल्या आहेत मात्र एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याने पोलीस खात्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तोंडावर आलेल्या महाशिवरात्री पर्वाच्या तीन दिवस अगोदर महादेव मंदिरात चोरी केल्याने शिवभक्तातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असुन गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.