पिंपळगाव येथे भाजपातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मोठ्या उत्साहात प्रवेश.!!!
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील उपस्थित
पिंपळगाव येथे भाजपातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मोठ्या उत्साहात प्रवेश.!!!
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील उपस्थित
पाचोरा प्रतिनिधी :-
आज हरेश्वर पिंपळगाव (ता. पाचोरा) येथे भव्य आणि उत्साहवर्धक वातावरणात माजी सरपंच अशोक पाटील, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष परेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात शिवसेनेची जनाधारातील भूमिका, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनसेवेचा मार्ग याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “शिवसेना ही केवळ पक्ष नाही तर जनतेची भावना आहे. या पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान, जबाबदारी आणि संधी मिळते.”
कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकी संघचे चेअरमन नरेंद्र पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत व पदमसिंग पाटील, शिवसेना नेते गोरख तात्या, शालीकग्राम मालकर, अरुण पाटील, रवी गीते, भगवान पाटील, संतोष पाटील, दीपक दादा, प्रविण ब्राह्मणे, वाघ गुरुजी, आर. आर. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहुल नाना, तसेच शिवसेना कार्यकर्ते मिलिंद तात्या, कोमल आबा, रणजित तात्या, संतोष भाऊ, सतीश भाऊ, शकुर भाऊ, राकेश पाटील, प्रितेष जैन, पवन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून शिवसेनेच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त केली. उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहाने घोषणाबाजी करत या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.