आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून युवकांचा मोठा प्रतिसाद कुरंगी बांबरुड गटातील शेकडो युवकांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश.!!!

0 394

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून युवकांचा मोठा प्रतिसाद कुरंगी बांबरुड गटातील शेकडो युवकांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून कुरंगी-बांबरुड गटातील शेकडो युवकांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. हा भव्य प्रवेश सोहळा राणीच्या बांबरुड येथील नर्मदा अग्रो नांद्रा येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमामध्ये गोकुळ दारकुंडे,  (राणीच्या बांबरुड), गौरव पाटील (आसनखेडा) आणि अविनाश कोळी (उपसरपंच, कुरंगी) उपस्थित होते. नांद्रा येथून राहुल पाटील यांच्या पुढाकारातून युवकांनी उत्साहाने शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.

कार्यक्रमात उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे जि.प.सदस्य पदम बापू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी नव्या सदस्यांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना पुष्पगुच्छ व भगवा झेंडा देऊन सत्कार केला. स्थानिक नेत्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, शेती आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात ऐतिहासिक कामे केली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि युवक वर्ग त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवत आहे.”

गोकुळ दारकुंडे यांनी सांगितले, “आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या नव्या लाटेने आमच्या भागात आशेचा किरण निर्माण केला आहे. आम्ही त्यांच्यासोबत राहून गावोगावी शिवसेनेचा झेंडा फडकवणार आहोत.”

या प्रवेशामुळे कुरंगी-बांबरुड परिसरात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट झाली आहे. आगामी काळात हा उत्साही युवक वर्ग आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील विकासाची नवी पर्वनी उभी करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी नव्या कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी एकदिलाने आणि संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!