आरोग्यजळगावमहाराष्ट्र

प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा तर्फ “हिवताप दिन “कार्यक्रमाचे आयोजन.!!!

प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा तर्फ “हिवताप दिन “कार्यक्रमाचे आयोजन.!!!

एरंडोल प्रतिनिधी :-

तालुक्यातील कासोदा येथे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दर वर्षी २५ एप्रिल हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या वर्षी हिवताप विभागा द्वारे प्रतिज्ञा व त्यातील थीम “चला हिवतापला संपवू या: पुन्हा योगदान द्या , पूनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा”

याने सर्वांचे लक्ष वेधले होते.

कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रा द्वारे “हिवताप दिन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम राबविण्याचे ठरवले असता आरोग्य पर्यवेक्षक श्री. सतिश भंगाळे साहेब यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वेळोवेळी पाठपुरवा घेतला. यामध्ये विविध कार्यक्रम करुन हिवताप आजारा विषयी जनजागृति करण्यात आली. यामध्ये आरोग्य शिक्षण देण्यात आले तसेच कंटेनर सर्वेक्षण ,जलद ताप रुग्ण सर्वेक्षण इत्यादी कार्य करण्यात आले

श्री. मिलिंद गायकवाड (आरोग्य निरीक्षक)यांच्या मार्गदर्शनाखाली वरील विविध सर्वेक्षण व जनजागृति विविध गावांमधे करण्यात आली. याप्रसंगी डॉ. पृथ्वीराज वाघ वैद्यकीय अधिकारी , श्री. हेमंत गढरी (पी.ओ.), श्रीम. शिला मनवर (एलएचही) श्री राजेश पवार (एलएसओ)यांनी देखील वेळोवेळी सहकार्य केले.

आशा यांना बी.एस. बद्दल प्रशिक्षण दिले तसेच हिवताप विषयी माहीती देवून सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.

कासोदा प्रा. आ.केंद्र अंतर्गत येणारे उपकेंद्रा द्वारे देखील विविध कार्यक्रम राबविण्यात आले श्री. रघूनाथ पटिल श्री. दिनेश जगदाळे , श्री. अतुल सोनवणे, श्री. नितीन खैरनार, श्री. अनिल पाटिल या सर्व आरोग्य सेवक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शाळांना व भागात भेटी देऊन हिवताप विषयी माहिती दिली तसेच प्रतिज्ञा घेतली.

आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे महत्व पटवून दिले

आरोग्य शिक्षण व जलजन्य आजारा पासून बचाव कसा करावा याची महीती दिली .

श्री.आर एस पाटील (आरोग्य सेवक) व आशा यांनी मालखेडा व फरकांडे येथिल जि. प. शालेय विद्यार्थि यांना हिवताप व स्वच्छता विषयी माहीती दिली व सामुहिक प्रतिज्ञा घेतली.

श्रीम. सीमा पानपाटील व सारीका पाटिल या गटप्रवर्तक यांनी सर्व आशा यांना विविध कार्यक्रमाचे नियोजन करून त्यांना विविध गावामध्ये जाऊन हा कार्यक्रम राबविण्यास मदत केली.

हिवताप दिन यशस्वी राबविण्या करिता अधिकारी वर्ग , आरोग्य सेवक व सर्व आशा, शिक्षकवृद तसेच इतर सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!