जळगावमहाराष्ट्रसामाजिक

जम्मू काश्मीर पहलगाम भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व कारवाईची मागणी.!!!

जम्मू काश्मीर पहलगाम भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व कारवाईची मागणी.!!!

मुस्लिम एकता संघटनेची मागणी

जम्मू काश्मीर च्या पहलगामच्या खोऱ्यातील रिसॉर्ट मध्ये ४० पर्यटकांच्या गटावर दिनांक २२ एप्रिल रोजी दोन/ तीन अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून त्यात २६ पर्यटकांचा मृत्यू तर २० हून अधिक जखमी झाले त्या घटनेचा जळगाव जिल्हा एकता संघटना तर्फे तीव्र निषेध करण्यात आला.

 

सदर घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना ईश्वर चीर शांती देवो व जखमी रुग्णांना लवकरात लवकर बरे करो तसेच

मृत परिवारांच्या दुखात सुद्धा आणि सहभागी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 

हा भ्याड हल्ला करणारी दहशतवादी संघटना टी आर एफ चा सुद्धा तीव्र शब्दात निषेध करून त्याच्यावर अत्यंत कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

माननीय अप्पर जिल्हाधिकारी अंकुश किनोटे यांच्या हस्ते सदरचे निवेदन महामय राष्ट्रपती यांना सादर करण्यात आले.

 

*एकता संघटनेचे शिष्टमंडळात यांचा होता समावेश*

फारुक शेख,सय्यद चांद, भुसावळ चे साबीर शेख, शेंदुर्णीचे अशपाक भागवत व रेहान शेख, मझर पठाण, मतीन पटेल,अनिस शहा

अन्वर सिकलगर , आरिफ देशमुख, बाबा देशमुख,युसुफ पठाण, सलीम इनामदार,अमजद पठाण,कासिम उमर, मुजाहिद खान, सईद शेख, इम्रान शेख,

नजमुद्दीन शेख,आरिफ अजमल , आदींचा समावेश होता

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!