
कजगाव येथे प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी.!!!
भडगाव ता प्रतिनिधी :- आमीन पिंजारी
कजगाव (ता. भडगाव) येथे देवतांचे वास्तू शिल्पकार प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवर व समाजबांधवांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधीवत पूजन करण्यात आले.
जयंतीनिमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात व वाजत-गाजत ही मिरवणूक गावातून मार्गस्थ झाली. मिरवणुकीत समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समस्त सुतार बांधव, मोरे बंधू, हिरे परिवार, महिला भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



