क्राईमजळगाव

दोन तासांत उकलला चोरीचा तपास, ११ बॅटऱ्या चोरीप्रकरणी दोघे अटकेत.!!!

दोन तासांत उकलला चोरीचा तपास, ११ बॅटऱ्या चोरीप्रकरणी दोघे अटकेत.!!!

भडगाव पोलीसांनी दोन तासातच तपास चक्रे फिरवत आवळ्ल्या दोघांच्या मुसक्या 

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील शेतीच्या मालाची वाहतूक करणारे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे रात्रीच्या वेळी ग्रीन पार्क कॉलनीमध्ये उभी असताना ग्रीन पार्क मधीलच दोन चोरट्यानीं तब्बल अकरा वाहनांच्या मोठ्या बॅटरीका चोरल्याची घटना भडगाव शहरात दि.२१रोजी मध्यरात्री घडली आहे.याबाबत भडगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून मालवाहतूक गाडी धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत त्वरित भडगाव पोलिस पो.कॉ.प्रविण परदेशी,अमजद पठाण यांनी दोन तासातच दोघंही आरोपींनी मोठया शिताफीने पकडुन जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी-नासिर खान रशिद खान (वय ५२) धंदा-ड्रायव्हर रा. ग्रीन पार्क कॉलनी भडगाव त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रीन पार्क कॉलनी येथे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे दि.२१रोजी रात्री लावलेले होते. यावेळी मध्यरात्री कॉलनीतील दोन चोरटयांनी लबाडीच्या इराद्याने आयशर गाडी व ट्रॅक्टर नऊ गाड्यांमधील मधील वेगवेगळ्या एक्साईड कंपनीची अकरा बॅटरी

एकूण ५३,००० रु किमतीच्या

चोरुन नेल्या.या बाबत सकाळी भडगाव पोलीस स्टेशनला या सर्व वाहनांच्या मालकांनी एकच गर्दी केली होती.यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पो.कॉ.प्रवीण परदेशी व अमजद पठाण यांनी सदर तपास चक्र फिरवत दोन तासातच आरोपींना तात्काळ जेरबंद बंद केले.या बाबत फिर्यादी-नासिर खान रशिद खान (वय ५२) धंदा-ड्रायव्हर रा. ग्रीन पार्क कॉलनी भडगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) समीर शेख (ऊर्फ मुन्ना) २) शोएब शेख दोन्हीही रा.ग्रीन पार्क कॉलनी भडगाव या दोघांविरुद्ध विरुध्द भडगांव पोलीस स्टेशन गु.र.न.२३५/२०२५. भा.न्या.स.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रदिप चौधरी हे करीत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!