भडगाव येथे नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांची भेट अन चर्चा.नागरीकांनी दिले निवेदन.!!!
भडगाव येथे नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांची भेट अन चर्चा.नागरीकांनी दिले निवेदन.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
नाशिक पदविधर विधान परीषद मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात दि. २२ रोजी रविवारी दुपारी ३ वाजता भेट दिली. विविध संघटांसह नागरीकांमार्फत आमदार सत्यजीत तांबे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. व सविस्तर चर्चा विनीमय करण्यात आली. आमदार सत्यजीत तांबे यांनी आपण आपल्या मागण्यांनुसार पुरेपुर प्रयत्न करुन प्रश्न मार्गी लावण्याचा शासन दरबारी प्रयत्न करु असे सांगीतले.
यावेळी भडगाव शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी नगर सेविका योजना पाटील, भारतीय कांग्रेसचे सेवादलाचे जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, काॅंग्रेसचे भडगाव शहराध्यक्ष दिलीप शेंडे, राष्टृवादी अजीत पवार गटाचे भडगाव तालुकाध्यक्ष अनिल पाटील, भडगाव वकील संघाचे तालुकाध्यक्ष अॅड. बी. आर. पाटील, व्हाईस आॅफ मिडीया पञकार संघाचे भडगाव अध्यक्ष तथा वाडे येथील नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, तांदुळवाडी विदयालयाचे मुख्याध्यापक स्वप्नील निकम, वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. निलेश तिवारी, पेंडगाव धोंडु पाटील पहीलवान, भडगाव वकील संघाचे सचीव अॅड. भरत ठाकरे, साहेबराव पाटील, भुषण पवार, प्रतिक पाटील यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरीक, तरुण मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांचा सत्कार भडगाव शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, राष्टृवादी अजीत पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनील पाटील, माजी नगर सेविका योजना पाटील, वकील संघामार्फत अॅड. निलेश तिवारी, अॅड. बी. आर.पाटील, अॅड. भरत ठाकरे,तसेच अॅड. अंबादास गिरी पाचोरा ,काॅग्रेस पक्षाकडुन संजीव पाटील, दिलीप शेंडे, पोलीस भर्तीचे निवेदन देणार्या भुषण पवार यांचेसह तरुणांमार्फत करण्यात आले.
तसेच यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात महाराष्टृ पोलीस शिपाई सन २०२५, २०२६ साठी भरती प्रक्रीया सुरु करण्याबाबत शहरातील असंख्य तरुणांनी निवेदन दिले.
तसेच एस. आर. पी. एफ. जी. आर. प्रतिक्षा यादी लवकरात लवकर स्पष्ट करावी या मागणीचे निवेदन शेख शब्बीर यांनी दिले.
तसेच भडगाव येथील माहेरवाशीण शारदा उर्फ पुजा माळी हिचा अमानुषपणे छळ करुन खुन केला. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. ही केस धुळे जिल्हयातील न्यायालयात न चालवता ती जळगाव येथील फास्टृॅक न्यायालयात वर्ग करण्यात यावी. या केसचा तपास पोलीस दलातील पोलीस अधिकारी दर्जाच्या महिला अधिकारीकडे वर्ग करण्यात यावा. या मागणीचे निवेदन या मयत महिलेच्या कुटुंबामार्फत साहेबराव महाजन यांचेसह परीवारामार्फत देण्यात आले.
तसेच यावेळी वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. बी. आर. पाटील यांनी भारतीय न्याय संहीता या पुस्तकांची मागणी वकील संघामार्फत मांडली. यावर आपण सर्व वकील बार संघांना भारतीय न्याय संहीता पुस्तक देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आश्वासन दिले.
तसेच भडगाव नगर परीषद संचलीत अभ्यासीके करीता विविध उपयोगी साहित्य खरेदीकरीता अनुदान मंजुर होणेबाबत भडगाव नगर परीषदेचे मागणीचे पञ यावेळी लिपीक नितीन पाटील यांनी आमदार सत्यजीत तांबे यांना दिले. तसेच पञकार अशोक परदेशी यांनीही विविध मागण्या मांडुन सविस्तर चर्चा केली.
तसेच भडगाव येथील पञकार स्व. सुनिल कासार यांचे दुखद निधन झाल्याने आमदार सत्यजीत तांबे यांनी शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी कासार कुटुंबियांची प्रत्यक्षात जाऊन घरी भेट घेतली. व परीवाराचे सांत्वन केले. कुटुंबियांना भविष्यात योग्य ती मदत करु असे आश्वासन आमदार सत्यजीत तांबे यांनी दिले.
तसेच पञकार शिवदास महाजन व पञकार सागर महाजन , विवेक पवार , भुषण पवार यांच्यासह मिञ परीवारिमार्फत आमदार सत्यजीत तांबे यांचा सत्कार करण्यात आला.