पाचोरा येथे अवैध गावठी पिस्तोल जप्त आरोपीला अटक.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
शहरात दिनांक २७/०२/२०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीद्वारे बातमी मिळाली की, अश्वीन उर्फ विशाल पाटील रा देशमुखवाडी पाचोरा हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल जवळ बाळगत आहे. त्याची माहीती घेता तो भारत डेअरी जवळील चौफुलीजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर भारत डेअरी चौफुलीजवळ सापळा रचला. सदर वेळी एक संशयीत इसम हा तेथे आला त्यावेळी पथकाची व पंचाची मिळालेल्या बातमीची खात्री झाल्यावर त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव अश्वीन उर्फ विशाल शंकर पाटील, वय २२, रा. देशमुखवाडी, पाचोरा ता. पाचोरा जि. जळगांव असे सांगीतले.
त्याची अंगझडती घेता त्याच्या अंगझडतीत एक गावठी बनावटीचा पिस्तोल अंदाजे २०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल विनापास परमिट शिवाय बेकायदेशीर पणे दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला म्हणुन त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द पाचोरा पोलीस स्टेशनला CCTNS NO ८८/२०२५ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस उप निरीक्षक श्री शेखर डोमाळे, लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील, राहुल महाजन, प्रमोद ठाकुर सर्व . स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केली आहे.
सदरची कारवाई ही मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कवीता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा. श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.जळगाव यांचे मागर्दशनाखाली करण्यात आली आहे.