भडगाव तालुक्यातील कोठली येथील शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
भडगांव प्रतिनिधी :-
तालुक्यातील कोठली येथील शहीद जवान प्रवीण पाटील (वय ३०) वर्ष हे गेल्या आठवड्यात सुट्टी संपवून पुन्हा सीआरपीएफ १३७ बटालियन उधमपूर येथे गेले असता दि. १८ रोजी कर्तव्यावर असताना गोळी लागून ते शहीद झाले होते.
कोठली गावात दि. २० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जवानाचे पार्थीव पोहताच सजविलेल्या वाहनावरुन गावातुन वाजत गाजत भारत मातेच्या घोषणा देत गावातुन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी नागरीक, महिला, तरुण मंडळी,आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते. या शहिद जवानावर कोठली फाट्यावर जळगाव नांदगाव हायवे जे ७५३ लगत असणाऱ्या शेतात सकाळी ११ वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यंसस्कार करण्यात आले.
यावेळी शहिद जवानाला त्यांचा लहान भाऊ सागर पाटील व मुलगा समर्थ पाटील (वय ५) या चिमुकल्या बालकाच्या हस्ते अग्नीडाग देण्यात आला. अंतयात्रेस नागरीक, महिला, तरुण मंडळी, माध्यमिक विदयालयाचे विदयार्थी, विदयार्थीनी, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, वि.का.सो, दुध सोसायटी आदि संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, आजी, माजी सैनिक संघटना पदाधिकारी आदिंची मोठया संख्येने उपस्थिती होती. भारत मातेच्या घोषणांनी संपुर्ण परीसर दुमदुमला होता.
जवानाचे पार्थिव घरी आल्यानंतर आई, वडील, पत्नी, भाऊ, काका, काकु यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करीत एकच टाहो फोडला. यावेळी पोलीस मुख्यालय जळगाव यांनी शहीद जवानास त्यांच्या राहते घरी सलामी दिली. तेथुन सजविलेल्या वाहनावरुन या शहिद जवानाची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. गावात शहिद जवानाचे डीजीटल बॅनर झळकत होते. गावात व स्टँड परीसरात रस्त्यांवर रांगोळया काढण्यात आल्या होत्या. यावेळी मिरवणुकीत १०० मिटरचा तिंरगा गावातील तरुणांनी हातात घेतला होता. डीजेवर देशभक्ती गितांनी परीसर दुमदुमला होता.
यात ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘तेरा जलवा जलवा’, ‘घर कब आओगे’, ‘भारत माता की जय’ या देशभक्तीपर गितांनी परीसर दुमदुमला होता. त्यानंतर जळगाव नांदगाव मनमाड हायवे वर असणारे शेतात कोठली फाट्यावर या शहिद जवानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जळगाव मुख्यालयचे १२ पोलीस गार्ड, सीआरपीएफचे १०२ आर.ए.एफ.चे १५ गार्ड, आदिंनी जवानाला मानवंदना दिली.
यावेळी आमदार किशोर पाटील, भाजपा पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, स्व.बापूजी फाउंडेशनचे अध्यक्ष लखीचंद पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजीव पाटील, शहराध्यक्ष दिलीप शेंडे, निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी, माजी नगरसेविका योजना पाटील, भैय्यासाहेब पाटील, शिंदे शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, दक्षता व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, ग.स.चे.माजी अध्यक्ष विलास नेरकर, हर्षल पाटील, अशोक परदेशी, मानवराज प्रतिष्ठानचे निलेश मालपुरे, भडगाव पोलीस स्टेशनचे १५ पोलीस कर्मचारी, १५ होमगार्ड, जळगाव मुख्यालयाचे सलामी गार्ड १२ कर्मचारी, ञिदल सैनिक संघटनेचे महाराष्टृ आजी माजी सैनिक भडगाव, पाचोरा चाळीसगाव परिवार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, जिल्हा सैनिक बोर्डाचे अध्यक्ष रतिलाल महाजन, १०२ आरएएफ कमांडर, १३७ सीआरपीएफ बटालियन, नातेवाईक मंडळी, ग्रामस्थ, महीला, तरुण मंडळी, आजी, माजी सैनिक मोठया संख्येने सहभागी होते. तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ ही हजर होते.