कजगाव परिसरात आखाजी निमित्त जुगार अड्ड्यांची रेलचेल; लाखोंची उलाढाल, कुटुंबे आर्थिक संकटात

कजगाव परिसरात आखाजी निमित्त जुगार अड्ड्यांची रेलचेल; लाखोंची उलाढाल, कुटुंबे आर्थिक संकटात

67 / 100 SEO Score

कजगाव परिसरात आखाजी निमित्त जुगार अड्ड्यांची रेलचेल; लाखोंची उलाढाल, कुटुंबे आर्थिक संकटातकजगाव परिसरात आखाजी निमित्त जुगार अड्ड्यांची रेलचेल; लाखोंची उलाढाल, कुटुंबे आर्थिक संकटात

भडगाव ता.प्रतिनिधी अमीन पिंजारी

आखाजी (अक्षय तृतीया) सणाच्या पार्श्वभूमीवर कजगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे सुरू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गावातील काही शेतांमध्ये तसेच चौकाचौकांत उघडपणे जुगार खेळला जात असल्याचे चित्र गेल्या पंधरा दिवसांत दिसून आले. या काळात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.

विशेषतः शेतमजुरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशांची उधळपट्टी या जुगार अड्ड्यांवर केल्याचे समोर आले आहे. अक्षय तृतीया सारखा सण साजरा करण्यासाठी घरी पैसे आणण्याऐवजी अनेकजण रिकाम्या हाताने परतल्याने त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाले आहेत.

महिनाभरासाठी ठेवलेला किराणा खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी राखून ठेवलेली रक्कम आणि दैनंदिन गरजांसाठीचा पैसा जुगारात गमावल्याने अनेक कुटुंबांसमोर उर्वरित महिना कसा काढायचा हा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे आर्थिक तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जुगार अड्डे चालवणारे मात्र या काळात मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सणाच्या नावाखाली चालणारी ही अनिष्ट परंपरा अनेकांच्या आयुष्यात अंधार निर्माण करत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

यासंदर्भात स्थानिक पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून असे अवैध प्रकार बंद करावेत, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top