वाचन संकल्प महाराष्ट्राचा” ह्या उपक्रमामुळे श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात उत्साही वातावरण

0 64

वाचन संकल्प महाराष्ट्राचा” ह्या उपक्रमामुळे श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात उत्साही वातावरण

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम मुंबई येथील श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. इंग्रजी नूतन वर्षाची सुरूवात ही विद्यार्थिंनीना ग्रंथालयाच्या दिशेने नेणारी आहे, ह्यापेक्षा दुसरा आनंद कोणताही नाही, असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी मांडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे विशेष आभार व कौतुक केले. महाविद्यालयातील ‘जी ओ शाह ग्रंथालया’च्या ग्रंथापाल अश्विनी प्रभू ह्यांच्या मार्गदर्शनाने २९ डिंसेबर २०२४ रोजी ग्रंथालयातील परिसर शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिंनींच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला. ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुस्तक प्रदर्शन भरवून त्यातील प्रेरणादायी पुस्तकांतून विशेष कार्य करणाऱ्या महंतांची ओळख विद्यार्थिंनीना करून दिली. १ ते ७ जानेवारीपर्यंत महाविद्यालयातील सर्व विभागांच्या सहकार्याने उत्कृष्ट व प्रेरणादायी साहित्य तसेच कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्र-आत्मचरित्र, प्रवासवर्णन इ. पुस्तकांचे वाचन व त्यावर आधारित गटचर्चा करण्यात आल्या, जेणेकरून विद्यार्थिंनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. पुढील दिवसांमध्ये वाचन कौशल्यावर आधारित कादंबरीचे अभिवाचन, लेखक-वाचक संवाद भेट, पुस्तक परीक्षण स्पर्धा असे उपक्रम रावबिण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!