वाडे येथील सन २००४, २००५ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर.२० वर्षांनी भरली शाळा.
भडगाव प्रतिनिधी :—
तालुक्यातील वाडे येथील दहावीच्या बॅचचे सन २००४, २००५ च्या विदयार्थ्यांचे गेट-टुगेदरचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र नागद वडगाव या ठिकाणी आनंदात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या बॅचला शिकविणारे गुरुवर्य माजी प्राचार्य व्ही.पी.पाखले हे होते. प्रमुख अतिथी गुरुवर्य एस.बी.मोरे , एन.सी.माळी ,श्री.ए.सी.अहिरराव, युवराज भोसले , आर.व्ही.वाबळे, आर.जे.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय गुरुवर्य आर.एस.महाजन यांच्या प्रतिमा पुजनाने झाला.
या कार्यक्रमात या बॅचच्या जवळ जवळ ४५ मुला मुलींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात गुरुवर्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. आर.व्ही.वाबळे, व्ही.पी.पाखले आदिंनी अनमोल मार्गदर्शनही केले. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपला दिवंगत मित्र स्वर्गीय लक्ष्मण किसन डोभाळ याच्या मुलीच्या सुकन्या खात्यामध्ये जवळपास ५१ हजार रुपये मदत गोळा केली. तसेच या कामी व्हि. पी.पाखले यांनी ५ हजार रुपये, युवराज भोसले यांनी ११०० रुपये मदत केली.सर्वांनी एकत्रित एकमेकांच्या सुखदुःखामध्ये कायम एकमेकांच्या पाठीशी उभा राहण्याचे ठरविले. यातुनच मैत्रीचे नाते घट्ट होईल असा ठाम विश्वास या बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.विविध आठवणी, गमती जमती,प्रसंगांवर चर्चा केली.कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बोधिराज वाडेकर,विकी पाटील यांनी केले. आभार रामकृष्ण महाजन यांनी मानले. कार्यक्रम आनंदात पार पडला. शाळेतील बालमिञांच्या एकमेकांच्या आठवणींना उजाळा मिळाला. गमती जमती सांगत हास्याचे फवारे उडाल्याचे दिसुन आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.