आपला जिल्हामहाराष्ट्रशासकीय

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.!!!

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.!!!

पुणे प्रतिनिधी:-

दि. २६ जानेवारी २०२६ –पुणे येथील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आज देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ९.१५ वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजित अनंतराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. जितेंद्र डुडी (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त श्री. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.), पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड श्री. विनयकुमार चोबे, तसेच पुणे शहर व ग्रामीण भागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्यात पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोलीस पथसंचलन व सन्मान वितरण

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित भव्य पोलीस पथसंचलनात राज्य राखीव पोलीस बल, पुणे शहर व ग्रामीण पोलीस दल, पिंपरी-चिंचवड पोलीस, वाहतूक शाखा, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, मोटरसायकल रायडर, ११२ आपत्कालीन सेवा वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आदी पथकांचा समावेश होता.

उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके व गौरव पुरस्कार मा. ना. श्री. अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सहभाग

यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पथसंचलनात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त व कर्तव्यभावना रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अंमलदार दत्तात्रय निकम, सचिन देवडे व आकाशवाणी पुणे येथील श्रीमती शिल्पा देशपांडे यांनी केले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!