Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 102

कजगावं येथे जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे गणतंत्र दिवस उत्सवात साजरा करण्यात आला

0

कजगावं येथे जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे गणतंत्र दिवस उत्सवात साजरा करण्यात आला

 

कजगाव प्रतिनिधी अमीन पिंजारी

भडगाव तालुक्यातील कजगाव  येथे जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे गणतंत्र दिवस उत्सवात साजरा करण्यात आला कजगाव येथील माजी ऊप सरपंच हाजी शफी इस्माईल मन्यार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली , जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी

 

कजगाव येथील पत्रकार तथा समाजसेवक आमिन पिंजारी यांच्याकडून मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तथा मौलाना शेख शफिक , व कजगाव येथील सरपंच रघुनाथ महाजन ग्रामपंचायत सदस्य सादिक मन्यार, समता परिषदचे तालुका अध्यक्ष भानुदास महाजन, मांगीलाल मोरे, दिनेश टेलर, इसाक शेख, अनवर बागवान, अमीन शहा, अनवर मन्यार, आरिफ मण्यार , आनिस मनियार वसीम खाटीक, व गावातील आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,

प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात भडगावच्या उर्दू बॉईज व कन्या शाळांनी केला धम्माल.!!!

0
प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात भडगावच्या उर्दू बॉईज व कन्या शाळांनी केला धम्माल.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

जि.प उर्दू बॉईज आणि कन्या शाळा नं १, भडगाव यांनी संयुक्तपणे साजरा केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.विविध रंगारंग कार्यक्रमांनी सजलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले होते. लूकमान सिद्दिकी सरांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, मा. नगरसेवक मनोहर चौधरी,गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील,केंद्र प्रमुख खलील सर,भडगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे,

 

शामशोद्दीन शेख,सामाजिक कार्यकर्ते इमरान अली सय्यद,हाजी जाकीर कुरेशी,मौलाना अशरफ साहब, डॉ. अफरोज, डॉ. अरशद मन्यार,अँग्लो उर्दू हायस्कुल चे मुख्यध्यापक मिर्झा नाजीम सर,पत्रकार राजू शेख, जावेद शेख, अबरार मिर्झा, सल्लाउद्दीन शेख यांची उपस्थिती होती.तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जि.प.उर्दू बॉईजचे मुख्याध्यापक जाहिद बेग सर, जि.प उर्दू कन्या नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक नईम शेख सर, हुजूर सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजीर मुजावर, यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन अश्फाक सर यांनी केले

महाराष्ट्र पोलीस दलाला 43 राष्ट्रपती पदकं जाहीर; IG सुनिल फुलारींसह 4 अधिकारी ठरले विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी.!!!

0

महाराष्ट्र पोलीस दलाला 43 राष्ट्रपती पदकं जाहीर; IG सुनिल फुलारींसह 4 अधिकारी ठरले विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी.!!!

 

प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण (एचजी अँड सीडी) आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 942 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.

 

यापैकी पोलीस सेवेत महाराष्ट्रातील एकूण 43 पोलीस या पदकांचे मानकरी ठरले असून त्यात चौघांना विशिष्ट सेवा पदकं (PSM) तर 39 जणांना गुणवत्तापूर्ण सेवा पदकं (MSM) घोषित झाली आहेत.

 

यामध्ये कोल्‍हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह महाराष्‍ट्रातील चार वरिष्‍ठ पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्‍ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे तर याव्यतिरिक्क उपअधीक्षक सुनिल तांबे यांच्यासह 39 पोलीस अधिकार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

 

विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी (PSM – PRESIDENT’S MEDAL FOR DISTINGUISHED SERVICE ) :

 

1. डॉ. रविंदर कुमार झिले सिंग सिंगल, अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र

 

2. दत्तात्रय राजाराम कराळे, महानिरीक्षक, महाराष्ट्र

 

3. सुनील बळीरामजी फुलारी, महानिरीक्षक, महाराष्ट्र

 

4. रामचंद्र बाबू केंडे, कमांडंट, महाराष्ट्र

 

गुणवत्तर सेवेसाठी पदक (MSM-MEDAL FOR MERITORIOUS SERVICE)

 

1. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक, महाराष्ट्र

 

2. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक, महाराष्ट्र

 

3. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक, महाराष्ट्र

 

4. चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक, महाराष्ट्र

 

5. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र

 

6. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र

 

7. सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र

 

8. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

 

9. धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

 

10. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक, महाराष्ट्र

 

11. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक, महाराष्ट्र

 

12. रोशन रघुनाथ यादव, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र

 

13. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र

 

14. अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

 

15. नजीर नासीर शेख, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

16. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

17. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

18. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

19. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

20. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

21. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक, महाराष्ट्र

 

22. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

23. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

24.दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

25. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

26. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

27. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

28. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

29. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

30. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

31. सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

32. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

33. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

 

34. संजय भास्करराव चोबे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

 

35. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

36. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

 

37. रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

 

38. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

 

39. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

 

शौर्य पदके (पोलीस सेवा-78 आणि अग्निशमन सेवा-17)

 

जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी, गुन्हेगारांना अटक करताना, संबंधित अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचा योग्य विचार करून जोखीम मोजली जाते आणि त्या आधारावर असामान्य शौर्य आणि शौर्य पदके (जीएम) प्रदान केली जातात. 95 शौर्य पुरस्कारांपैकी नक्षलवाद प्रभावित भागातील 28 कर्मचारी, जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील 28 कर्मचारी, ईशान्येकडील राज्यांतील 03 कर्मचारी आणि इतर प्रदेशातील 36 कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी सन्मानित केले जात आहे.

 

शौर्य पदक (GM) :- 95 शौर्य पदकांपैकी 78 पोलीस कर्मचारी आणि 17 अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना शौर्य पदके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

 

सेवा पदके : सेवेतील विशेष विशिष्ट कार्यासाठी राष्ट्रपती पदक (PSM) तर साधनसंपत्ती आणि कर्तव्यनिष्ठेने केलेल्या विशिष्ट सेवेसाठी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) प्रदान केले जाते. सेवेतील विशेष विशिष्ट कार्यासाठी देण्यात आलेल्या 101 राष्ट्रपती पदकांपैकी (PSM) 85 पोलीस सेवेला, 05 अग्निशमन सेवेला, 07 नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेला आणि 04 सुधारात्मक सेवेला देण्यात आले आहेत. यावर्षी देण्यात आलेल्या 746 गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकांपैकी (MSM) 634 पोलीस सेवेला, 37 अग्निशमन सेवेला, 39 नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेला आणि 36 सुधारात्मक सेवेला देण्यात आले आहेत.

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम!! दरमहा मिळतील 9,250 रुपये; जाणून घ्या माहिती

0

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम!! दरमहा मिळतील 9,250 रुपये; जाणून घ्या माहिती

 

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) ही गुंतवणूकदारांसाठी एक विश्वसनीय आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे. त्यामुळे या स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे.

आज आपण याच स्कीमविषयी जाणून घेणार आहोत.

आकर्षक व्याजदर आणि ठेवीची मर्यादा

सध्या POMIS योजनेवर 7.4% वार्षिक व्याजदर मिळत आहे. या योजनेत व्यक्तिगत खात्यासाठी जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत तर संयुक्त खात्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची मर्यादा आहे. संयुक्त खात्यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज धारकांमध्ये समान प्रमाणात विभागले जाते.

खाते उघडण्याचे नियम

ही योजना कोणत्याही प्रौढ व्यक्तीसाठी खुली असून जॉइंट खातेही उघडता येते. पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने खाते उघडू शकतात. तसेच, 10 वर्षे पूर्ण झालेली मुले स्वतःच्या नावाने गुंतवणूक करू शकतात. खाते उघडण्यासाठी किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. त्यानंतर 1,000 रुपयांच्या पटीत रक्कम वाढवता येते.

 

या योजनेत वार्षिक मिळणारे व्याज 12 हप्त्यांमध्ये विभागले जाते आणि दर महिन्याला खात्यात जमा होते. जर व्याज दरमहा काढले नाही तर ते पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा राहते आणि पुढील व्याजासोबत जोडले जाते. त्यामुळे ही योजना नियमित उत्पन्नासाठी उत्तम पर्याय ठरत आहे.

 

मॅच्युरिटी कालावधी

POMIS योजनेची मुदत 5 वर्षे आहे. या योजनेत मुदत संपल्यानंतर नव्याने गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. मुदत संपल्यावर व्याजदर नव्या नियमांनुसार ठरवला जातो.

 

मासिक उत्पन्न किती मिळू शकते?

जर कोणी 15 लाख रुपयांची संयुक्त गुंतवणूक केली तर त्याला वार्षिक 1,11,000 रुपये व्याज मिळते. जे महिन्याला 9,250 रुपयांच्या हप्त्यांमध्ये उपलब्ध होते. तर 9 लाख रुपयांच्या वैयक्तिक गुंतवणुकीवर वार्षिक 66,600 रुपये मिळतात. जे महिन्याला 5,550 रुपयांप्रमाणे वितरित होते.

देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट 2.0 कार्यशाळा संपन्न.!!!

0

देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट 2.0 कार्यशाळा संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत स्कूल कनेक्ट २.० संपर्क अभियान कार्यशाळा संपन्न झाली.

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून करण्यात सुरू झाली आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि आमुलाग्र व्यापक बदल होत असताना त्याविषयी जनजागृती आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची गरज लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबतच्या सकारात्मक बाबी पोहोचविण्यासाठी शासन निर्णयान्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० स्कूल कनेक्ट २.० संपर्क अभियान कार्यशाळा राबविण्यात आली. आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय, लाडकूबाई कनिष्ठ महाविद्यालय आणि अंग्लो उर्दू हायस्कूलच्या नववी तेे बारावी पर्यंतच्या १४४ विद्यार्थ्यांनी आणि १२ शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.

भारताला जागतिक ज्ञान महाशक्ती बनविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलेले आहे, ते सांगण्यात आले. या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांची अद्वितीय क्षमता वाढविणे, पाठ्यक्रमाची लवचिकता, तर्कशील विचारशक्ती, बहुभाषिकता, रोजगार क्षमता यांमधील दुवा आणि समावेशिता यांवर भर देण्यात आलेला आहे, असे प्रतिपादन करण्यात आले. नवीन शिक्षण प्रणाली ५+३+३+४ ची प्रणाली सविस्तर समजावून सांगण्यात आली. या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश, वैशिष्ट्ये, फायदे, श्रेयांक पद्धती, तीन व चार वर्षीय पदवी शिक्षण क्रम, मुख्य व गौण पदवी, शैक्षणिक श्रेय संरचना, मुख्य व गौण विषयांची जनरल, जनरल इलेक्ट्रिव व ओपन इलेक्टिव्ह विषयांची संकल्पना, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम व कौशल्यवर्धित रोजगाराच्या संधी, क्षमता विकास विषय, भारतीय ज्ञान प्रणाली, शाश्वत संस्कृतीसाठी मूल्याधिष्ठित शिक्षण, इंटर्नशिप, प्रकल्प व सह अभ्यासक्रम यांची उद्दिष्टे आणि फायदे यावर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाने उपलब्ध केलेली साथी अर्थसाह्य योजना, शिष्यवृत्तीचे विविध प्रकार, ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेले विविध पोर्टल यांचीही माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेला संसाधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ. एस. डी. भैसे आणि डॉ. डी. ए. मस्की यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. डी. ए. मस्की यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी केले. डॉ. बी. एस. भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या जादुई डोळ्यांनी घायाळ करणाऱ्या मोनालिसाला मिळाली मोठी ऑफर; लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

0

आपल्या जादुई डोळ्यांनी घायाळ करणाऱ्या मोनालिसाला मिळाली मोठी ऑफर; लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

 

महाकुंभमेळ्यात सर्वांना वेड लावणाऱ्या मोनालिसाला मोठी ऑफर मिळाली आहे. चित्रपट निर्माते सनोज मिश्राने तिला त्यांच्या आगामी चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपूर’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची ऑफर दिली.

विशेष म्हणजे मोनालिसाने ही ऑफर स्विकारली आहे.

 

आपल्या जादुई डोळ्यांनी घायाळ करणारी मोनालिसा ही मुळची इंदूरची आहे. कुंभमेळ्यात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती. सुंदर डोळे, सावळा रंग, नजरेत ठामपणा आणि त्या सावळ्या रंगावर चमकणारी तेजस्वी सुंदरता पाहून लोक भारवले. दरम्यान, आता ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

 

‘द डायरी ऑफ मणिपूर’ चित्रपट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात मोनालिसा ही एका निवृत्त आर्मी ऑफिसरच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ईशान्य भारतात होणार आहे.

 

शूटिंगपूर्वी मोनालिसाला तीन महिने मुंबईत अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सनोज मिश्रा यांनी एका वृत्तसंस्थेवर मोनालिसाचा मुलाखत पाहिली. त्यानंतर तिच्या शोधात ते कुंभमेळ्यात पोहचले. त्यावेळी तिच्या कुटुंबातील व्यक्तींची मिश्रा यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान मोबाईलवरुन मोनालिसा आणि तिच्या वडिलांशी संवाद साधला.

 

सनोज मिश्राच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात काम मिळण्याची ऑफर ऐकून मोनालिसा आणि तिचे कुटुंबीय खूप आनंदी झाले. त्यांच्या मते, या चित्रपटात काम मिळाल्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबातील गरिबी संपून आर्थिक स्थिती चांगली होईल. मोनालिसाची आजीने या ऑफरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘नातीची अनेक वर्षांची इच्छा चित्रपटात काम मिळाल्याने पूर्ण होईल.’ अशी मोनालिसाची आजी म्हणाली.

 

महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आलेल्या इंदूरमधील या तरूणीचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. व्हायरल झाल्यानंतर कुंभमेळ्यात येणारा जो तो भाविक तिच्यासोबत सेल्फी काढू लागला. अनेक युट्युबर्स व्हिडीओ बनवण्यासाठी येऊ लागले. यासर्वाचा परिणाम तिच्या व्यवसायावर झाला. लोकांच्या गर्दीमुळं तिला तिचे काम करता आले नाही. त्यामुळं तिच्यावर माघारी परतण्याची वेळ आली. इंदूर झुसी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या तिच्या कुटुंबाकडे मोनालिसा परत आली. मोनालिसाचे कुटुंब येथे बांधलेल्या झोपडपट्टीत राहते.

आज जळगाव येथे राष्टीृय चर्मकार महासंघाची बैठक.!!!

0

आज जळगाव येथे राष्टीृय चर्मकार महासंघाची बैठक.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

राष्ट्रीय चर्मकार महासंघ जळगाव जिल्हा यांच्या वतीने जिल्हयातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, नोकरदार आघाडी, युवक आघाडी व जेष्ठ कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष समाजभुषण भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय प्रवक्ता समाजभुषण पांडुरंग बाविस्कर यांच्या उपस्थितीत जिल्हा बैठक आज दि. २५ रोजी शनिवारी आयोजीत करण्यात आली आहे. ही बैठक जळगाव येथील शानबाग सभागृह , एम. जे. काॅलेज चौफुली येथे दुपारी १ वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा पदाधिकार्यांमार्फत करण्यात आले आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात संत रोहिदास महाराज जयंती उत्सव आयोजित करणे.

जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार व खासदार यांच्या सत्कार करण्याबाबत विचारविनिमय करणे.

जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व शाखा अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणी ची निवड करणे.

जिल्ह्यातील विविध आघाडीच्या नियुक्ती करणे.

समाजातील विविध स्तरावरील गुणवंताच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करणे.

समाजातील सरकारी, निम सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार आयोजित करणे.

गाळन. ता. पाचोरा येथील चर्मकार समाजातील गरीब शेतकरी कुटुंबा वर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या जाहीर निषेध नोंदवणे.

अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर विचारविनिमय करणे.

बैठकीस उपस्थित राहण्याचे आव्हान समाजाचे जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे यांनी केले आहे.

गिरणानदी पात्रातून अवैध वाळु चोरी बाबत वडजी ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण तुर्तास स्थगित.!!!

0

गिरणानदी पात्रातून अवैध वाळु चोरी बाबत वडजी ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण तुर्तास स्थगित.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

ता.24: वडजी (ता.भडगाव) ग्रामपंचायत सदस्यांनी गिरणा नदि पात्रातुन होत असलेल्या अवैध वाळू उपसा संदर्भात उपोषणासणास बसण्याचा इशारा दिला होता.आंदोलनाची दखल घेत तहसीलदार शितल सोलाट यांनी दोन वेळेस वडजी गावात बैठका घेतल्या. तर वडजी गावाच्या हद्दीतून होणारी वाळू चोरीला 4-5 दिवसापासून अटकाव केल्याने 26 जानेवारी ला करण्यात येणारे उपोषण करू नये अशी विनंती तहसीलदारांनी केली. मात्र तुर्तास उपोषण मागे घेत असलो तरी पुन्हा उपसा सुरू झाल्यास यापेक्षा अधिक जोमाने आंदोलन करू असे ग्रामस्थांनी सांगीतले.

 

वडजी गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या गिरणा नदि पात्रातुन मोठ्याप्रणात अवैध रित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे या ठीकाणी असलेल्या वडजी, रोकडाफार्म, वडगाव-नालबंदि, रूपनगर-पळासखेडे, महींदळे या गावाच्या पाणी पुरवठा योजनाच्या विहरींना धोका निर्माण झाला आहे. तर शेतीसाठी असलेल्या विहीरींना फटका बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पत्रकार सुधाकर पाटील, वडजीचे उपसरपंच दिनेश परदेशी, माजी उपसरपंच स्वदेश पाटील यांनी

तहसीलदार शितल सोलाट यांना निवेदन देऊन वडजी हद्दीतून होणारा वाळू उपसा न थांबल्यास 26 जानेवारी पासून गिरणा नदि पात्रात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.

 

तहसीलदारांनी दोनदा बैठक

 

निवेदनाची दखल घेत तहसीलदार शितल सोलाट यांनी त्याच दिवशी वडजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन वाळूचोरी संदर्भात सरपंचांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. तर काल (ता.23) रोजी पुन्हा ग्रामस्थांच्या उपस्थित मारोती मंदिरावर बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगतीले की,वडजी गावातुन होणाऱ्या वाळूचोरी संदर्भात प्रशासनाने कठोर पाऊले उचलले आहेत. याठिकाणची वाळूचोरी गेल्या आठवड्यापासून थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर याठिकाणी गस्ती पथकाची नियुक्ती केलेली आहे. येथून वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासन पुर्णपणे कटिबध्द असल्याचे तहसीलदार शितल सोलाट यांनी सांगीतले. त्यामुळे ग्रामस्थांनी 26 जानेवारीपासून उपोषणाला बसू नये अशी विनंती केली. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, मंडलाधिकारी श्रीमती सोनवणे, तलाठी संजय सोनवणे, सरपंच मनिषा गायकवाड, माजी सभापती अभिमन पाटील, मगन पाटील, ग्रामविकास अधिकारी ए.जे.पाटील आदि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार शितल सोलाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के याच्यासह ग्रामस्थांनी गिरणा नदि पात्राची पाहणी केली. तेथे ज्या ठीकाणी रस्ता आहे तेथे खड्डा करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.

 

चौकट

.तर पुन्हा आंदोलन

 

“महसुल प्रशासनाने वडजी येथील तुर्तास वाळूचोरी थांबविली. त्यामुळे आम्ही 26 जानेवारी पासूनचे उपोषण स्थगित करत आहोत. मात्र पुन्हा वाळूचोरी झाल्यास आंदोलन करू असे ग्रामस्थांच्या वतीने सुधाकर पाटील यांनी सांगीतले. गिरणा नदिवर आमच्या गावाची शेती पर्यायाने अर्थकारण अवलंबून आहे. अशीच वाळूचोरी सुरू राहील्यास पाण्याचे संकट उभे राहू शकते. त्यामुळे ग्रामस्थांचा वाळूचोरीला विरोध आहे.

 

प्रतिक्रीया

आमच्या गावातुन अवैध वाळू वाहतुक तुर्तास बंद झाली आहे. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहोत. मात्र पुन्हा वाळू चोरी सुरू झाल्यास उपोषण कींवा जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅगंमार्च काढू.– सुधाकर पाटील सामाजिक कार्यकर्ते 

 

भडगाव नगर परीषदेच्या महीला कर्मचार्यांचा जिल्हा क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक.!!!

0

भडगाव नगर परीषदेच्या महीला कर्मचार्यांचा जिल्हा क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग क्रीडा धोरण अंतर्गत नाशिक विभाग स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील क्रीडा भवन व सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्याच्या वतीने भडगाव नगरपरिषद महिला रस्सीखेच संघाने नाशिक जिल्हा संघाला पराभूत करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर समूह गायन स्पर्धेत भडगाव नगर परिषदेने प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरावर आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्ये आपला सहभाग निश्चित केला आहे. तरी या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांचे मार्गदर्शन तसेच नगरपरिषदेमधील कर निरीक्षक भारती निकुंभ, शहर अभियंता अपूर्वा आगळे,स्वच्छता निरीक्षक निशा लोट कार्यालय अधीक्षक पंकज सूर्यवंशी, पाणी पुरवठा अभियंता गणेश लाड, राहुल साळुंके, छोटू वैद्य, स्वप्नील सोळंके, आशुतोष राजपूत यांचा सहभाग दिसून आला.

महिला रस्सीखेच विजयी संघ —

भारती राजेश रील , अलका राजू गोयर , लक्ष्मी सोमनाथ कंडारे , शालू सुरज सिरसे, पूजा सुनील कंडारे, वंदना नरेश टाक, लक्ष्मी भगवान कंडारे, भारती नितीन सिरसे. यांचा समावेश आहे.

गोळाफेक विजेता —

आकाश गुजराथी,

समूह गायन विजेता संघ

नितीन पवार,

किशोर पाटील,

सुरेश पाटील ,

श्रीराम वाघ ,

अविनाश पवार,

श्रावण पवार,

संदीप पवार ,

दिलीप कोळी आदिंचा समावेश आहे. या यशस्वी खेळाडुंचा भडगाव शहरासह तालुक्यातील नागरीकांतुन अभिनंदन होत आहे.

शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू.!!!

0

शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू.!!!

 

पाचोरा प्रतिनिधी :-

आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील शेतकरी असलेले रामा बळीराम ढमाले (पाटील) वय 47 यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती घेतली असता रामा ढमाले हे त्यांच्या पत्नी,मुलगा सोबत त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये काम करत असताना काहीतरी चावल्या सारखे जानवल्याने त्यानी

 

त्यांची पत्नी यास संगितले व त्यानी जवळचे नातेवाईक असलेले श्रीराम ढमाले यांच्या मदतीने घरच्या मंडळींना सोबत घेऊन उपचारासाठी घेऊन येत असतांना यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,आई,दोन मुले व एक सुन असा यांचा परिवार होता. खेडगाव नंदीचे परिसरातील दमाले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

error: Content is protected !!