Wednesday, January 21, 2026
Google search engine
Home Blog Page 110

मोठी बातमी! जमीन नोंदणीसंदर्भात 4 नवीन नियम तयार; 1जानेवारी पासून होणार लागू

0

मोठी बातमी! जमीन नोंदणीसंदर्भात 4 नवीन नियम तयार; 1 जानेवारीपासून होणार लागू

मुंबई :-

2025 पासून भारतात जमीन नोंदणी आणि मालमत्तेशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता वाढवणे, करचोरी रोखणे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुरक्षित करणे हा या नवीन नियमांचा मुख्य उद्देश आहे.

हे बदल केवळ जमीनदार आणि खरेदीदारांसाठीच महत्त्वाचे नाहीत, तर भाडेकरू आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्ससाठीही हे बदल महत्त्वाचे आहेत.

या नवीन नियमांमुळे एकीकडे नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि जलद होणार आहे, तर दुसरीकडे बनावट नोंदी आणि जमिनीचे वादही थांबणार आहेत. मग आता या नवीन नियमांचा सामान्य लोकांवर आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर कसा परिणाम होईल हे समजून घेऊ.

आधार कार्ड अनिवार्य

2025 पासून जमिनीच्या नोंदणीसाठी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक होणार आहे. बनावट नोंदणी रोखण्यासाठी हा नियम आणण्यात आला आहे. यामुळे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता वाढेल आणि फसवणुकीच्या घटना कमी होतील.

आधार लिंकिंगचे फायदे काय होणार.?

बनावट कागदपत्रांवर बंदी येणार

मालमत्तेच्या मालकीची सहज पडताळणी होणार

बेनामी गुणधर्मांवर नियंत्रण मिळणार

कर चोरी कमी होणार

हा नियम जमीन मालक आणि खरेदीदारांची ओळख सुनिश्चित करेल, ज्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे वाद टाळता येतील.

ऑनलाइन नोंदणी केली जाणार

नवीन नियमांनुसार, संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाणार. यासाठी, एक विशेष पोर्टल सुरू केले जाईल, जेथे लोक त्यांचे कागदपत्रे अपलोड करू शकतील आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

ई-स्टॅम्पिंगचा उपयोग होणार

2025 पासून स्टॅम्प पेपरऐवजी इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पचा वापर केला जाईल. हे प्रक्रिया जलद आणि सुरक्षित करेल. ई-स्टॅम्पिंगमुळे स्टॅम्प पेपरच्या बनावटगिरीला आळा बसण्यास मदत होईल.

डिजिटल स्वाक्षरी वापरली जाणार

नवीन नियमांनुसार रजिस्ट्रार डिजिटल स्वाक्षरी वापरतील. हे केवळ प्रक्रिया जलद करणार नाही, परंतु कागदपत्रांची सत्यता देखील सुनिश्चित करेल.

डिजिटल स्वाक्षरीचे फायदे

उच्च सुरक्षा

जलद प्रक्रिया

दूरस्थ प्रमाणीकरण वैशिष्ट्य

पेपरलेस पद्धत

डिजिटल स्वाक्षरीमुळे, कागदपत्रांमध्ये कोणताही बदल किंवा छेडछाड होण्याची शक्यता नसणार.

 

भाजपची मोठी कारवाई: पक्षाविरोधात काम करणाऱ्या 11 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

0

भाजपची मोठी कारवाई: पक्षाविरोधात काम करणाऱ्या 11 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपने पक्षाविरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर कठोर पावले उचलली आहेत. अकोला जिल्ह्यात पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषद सदस्यासह 11 लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील (Kishore Mangte Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराविरोधात या नेत्यांनी काम केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पक्षाची निवडणूक कामगिरी प्रभावित झाली, ज्यावरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना कळवण्यात आली असून पुढील निवडणुकांमध्ये पक्षशिस्त पाळण्यासाठी हा इशारा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निलंबित व्यक्तींची नावे:

 

प्रकाश आतकड (जिल्हा परिषद सदस्य)

राजेश उर्फ विष्णू येऊल (पंचायत समिती सदस्य)

मंगेश चिखले (माजी नगरसेवक)

प्रा. राजेंद्र पुंडकर (किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष)

विशाल गणगणे (ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष)

अरविंद लांडे (माजी तालुकाध्यक्ष)

राजेश पाचडे (माजी तालुका सरचिटणीस)

विष्णू बोडखे (ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य)

सुनील गिरी (माजी तालुका सरचिटणीस)

नीलेश तिवारी (युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस)

चंचल पितांबरवाले (माजी युवती प्रमुख, अकोला ग्रामीण)

म्हणून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत Condom आणि ORS वाटले; पुण्यातील पबचा धक्कादायक खुलासा.!!!

0

म्हणून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत Condom आणि ORS वाटले; पुण्यातील पबचा धक्कादायक खुलासा.!!!

पुणे

राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात एका पबच्या निमंत्रण पत्रिकेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीच्या निमंत्रणासाठी निमंत्रण पत्रिकेसोबत चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीटे देण्यात आले आहे.या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे. यानंतर पबने याबाबत खुलासा केला आहे.

पुण्यात नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पब कडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पब ने केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

“पुण्यातील मुंढवा या रेस्टॉरंट पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे,” असे या पत्रात लिहले आहे. “अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे,” असं सुद्धा या पत्रात नमूद आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, सरकारनं घेतला मोठा निर्णय.?

0

लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, सरकारनं घेतला मोठा निर्णय.?

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा लाभ महिलांना मिळण्यास सुरूवात झाली आहे. पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रूपये पाठवण्यात येत आहेत.

लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडताना दिसत आहे. त्यामुळे सरकारकडून शासकीय खर्चांना खात्री लावण्यात येत आहे.

नुकतेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडले. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं रंगरंगोटी किंवा सुशोभीकरणासाठी काही खर्च करण्यात येतो. हा खर्च सरकारनं 55 टक्क्यांनी कमी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री निवास असलेल्या रामगिरी बंगल्यावर 34.71 लाख, मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रवीभवन येथील बंगल्यांवर 1.03 कोटी, नागभवन 8.40 आणि उपमुख्यमंत्री निवास असलेल्या देवगिरी बंगल्यावर 38.41 लाख खर्च करण्यात आला. जुने हैदराबाद हाऊस 33.05 लाख, नवीन हैदराबाद हाऊस 20.08 आणि आमदार निवासला 38.79 लाख रूपये करण्यात आलेल्या खर्चाचाही समावेश आहे.

2021-22 आणि 2022-23 च्या तुलनेत यंदाच्या हिवाळी अधिवेशनात 55 टक्के कमी खर्च करण्यात आला आहे. ऊर्जा विभाग, समाजकल्याण विभाग, क्रीडा विभागाच्या वाजवी खर्चांनाही कात्री लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासह रंगरंगोटी आणि सरकारची कार्यक्रमांच्या खर्चातही कपात होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारवर तब्बल 9 लाख कोटींच्या आसपास कर्ज आहे. त्यातच ‘लाडकी बहीण योजने’मुळे 40 हजार कोटींचा भार पडू शकतो. त्यामुळे सरकारकडून काटकसर करण्यात येत आहे.

वाडे येथील सन २००४, २००५ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर.२० वर्षांनी भरली शाळा.

0

वाडे येथील सन २००४, २००५ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर.२० वर्षांनी भरली शाळा.

भडगाव  प्रतिनिधी :—

तालुक्यातील वाडे येथील दहावीच्या बॅचचे सन २००४, २००५ च्या विदयार्थ्यांचे गेट-टुगेदरचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र नागद वडगाव या ठिकाणी आनंदात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या बॅचला शिकविणारे गुरुवर्य माजी प्राचार्य व्ही.पी.पाखले हे होते. प्रमुख अतिथी गुरुवर्य एस.बी.मोरे , एन.सी.माळी ,श्री.ए.सी.अहिरराव, युवराज भोसले , आर.व्ही.वाबळे, आर.जे.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय गुरुवर्य आर.एस.महाजन यांच्या प्रतिमा पुजनाने झाला.

या कार्यक्रमात या बॅचच्या जवळ जवळ ४५ मुला मुलींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात गुरुवर्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. आर.व्ही.वाबळे, व्ही.पी.पाखले आदिंनी अनमोल मार्गदर्शनही केले. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपला दिवंगत मित्र स्वर्गीय लक्ष्मण किसन डोभाळ याच्या मुलीच्या सुकन्या खात्यामध्ये जवळपास ५१ हजार रुपये मदत गोळा केली. तसेच या कामी व्हि. पी.पाखले यांनी ५ हजार रुपये, युवराज भोसले यांनी ११०० रुपये मदत केली.सर्वांनी एकत्रित एकमेकांच्या सुखदुःखामध्ये कायम एकमेकांच्या पाठीशी उभा राहण्याचे ठरविले. यातुनच मैत्रीचे नाते घट्ट होईल असा ठाम विश्वास या बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.विविध आठवणी, गमती जमती,प्रसंगांवर चर्चा केली.कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बोधिराज वाडेकर,विकी पाटील यांनी केले. आभार रामकृष्ण महाजन यांनी मानले. कार्यक्रम आनंदात पार पडला. शाळेतील बालमिञांच्या एकमेकांच्या आठवणींना उजाळा मिळाला. गमती जमती सांगत हास्याचे फवारे उडाल्याचे दिसुन आले.

 

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे “पुरुष” या नाटकाचा प्रयोग रद्द.रंगभूमीवरील दुर्मिळ घटना.!!!

0

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे “पुरुष” या नाटकाचा प्रयोग रद्द.रंगभूमीवरील दुर्मिळ घटना.!!!

पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : जयवंत दळवी यांच्या ४० वर्ष जुन्या कलाकृतीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या पुरूष या नाटकाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, प्रयोग सुरू असताना शरद पोंक्षे अचानक त्यांच्या ओळी विसरले आणि त्यांना त्यांचे संवाद आठवले नाहीत.

नाटक सुरळीत सुरू असताना एका महत्त्वाच्या प्रसंगात पोंक्षे हरवल्यासारखे दिसले आणि संभ्रमात प्रेक्षकांकडे बघत राहिले. त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली, “रसिक प्रेक्षकहो, मी पूर्ण ब्लँक झालोय, मला काहीही आठवत नाहीये, २ मिनिटं थांबू का?, अशी त्यांनी विचारणा केली.

प्रेक्षकांनी त्यांना होकार दिला आणि रंगमंचावरील दिवे बंद झाले. पोंक्षे विंगेत गेले, २ मिनिटांऐवजी ५ मिनिटं झाली, १०-१५ मिनिटं झाली. मग दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी स्टेजवर येऊन सांगितलं की, आम्ही प्रयत्न करतोय, हळूहळू थोडं-थोडं आठवतंय पण अजून थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल तेव्हा मध्यंतर आताच जाहीर करतो.

त्यानंतर ३० मिनिटांच्या मध्यांतरानंतर, दिवे परत लागले आणि पोंक्षे रंगमंचावर परत आले, फक्त प्रयोग रद्द होत असल्याची घोषणा करण्यासाठी.

“असं ४० वर्षात पहिल्यांदाच घडत आहे. मी तुमची माफी मागतो, तुमचे पैसे परत केले जातील” असे सांगत पोंक्षे यांनी उपस्थितांची माफी मागितली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि समजूतदारपणाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.

“पुरुष” या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे यांच्याही नाटकात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर शरद पोंक्षे या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. पोंक्षे विस्मरणावर मात करून लवकरच रंगभूमीवर पुन्हा काम सुरू करतील अशी खात्री त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

सर रतन टाटा यांनी केले दैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य – नितीन कोलगे

0

सर रतन टाटा यांनी केले दैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य – नितीन कोलगे

रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त रुग्ण आणि नातेवाईकांना अन्नदान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : निष्ठावान निरलस सेवाभावी उद्योगपती सर रतन नवल टाटा यांची स्मृती चिरंतन जागविण्यासाठी दक्षिण मुंबई कॅटरिंग संघातर्फे टाटा यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे रोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान कार्यक्रम परळच्या श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे घेण्यात आला. त्याप्रसंगी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त हेमंत सामंत, वृषाली सामंत, प्रमोद सावंत, दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे अध्यक्ष नितीन कोलगे, हिंदू राष्ट्र सेना मुंबईचे अध्यक्ष प्रकाश सावंत, खाकी वर्दीतले कनवाळू विकास शेळके, शिवशंकर बामले, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ रामपुरकर, विजय केदासे, विजय रायमाने, गीता दळवी, अविनाश सावंत, सुधीर हेगिष्टे तसेच राजेश मासावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बंधुभावाने केलेल्या सेवेपेक्षा आत्मभावाने केलेली सेवा ही सर्वोत्तम असते. नेमकी हीच सर्वोत्तम सेवा ‘श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट’ करत असते. ‘रुग्ण सेवा’ हीच धर्मशाळेची ओळख आहे के ई एम, वाडिया, तसेच कर्करोगासाठी नामांकित असलेले टाटा रुग्णालयच नव्हे तर त्या परिसरातील रस्त्यांवरही ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी देशभरातून आलेल्या कर्करोगाग्रस्त व्यक्‍तींची अवस्था जीवाला अस्वस्थ करून जाते. या रुग्णांना मुंबईच्या रस्त्यांवर राहून टाटा इस्पितळात उपचार करावे लागतात. राहाणे, खाणे, इस्पितळात जाणेयेणे, औषधोपचार यावर अफाट आणि क्षमतेपलीकडे खर्च होतो. खर्चाच्या डोंगरात कुटुंबे उद्ध्वस्त होतात. अक्षरशः रस्त्यावर येतात. टाटा इस्पितळाच्या आजूबाजूला कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांचे काळजीने सुकलेले नातेवाईक ऊन-वारा-पावसात रस्त्यावर पथारी टाकलेले दिसतात. या सर्वांची सोय करता येणे शक्य नाहीच. पण या पार्श्‍वभूमीवर ‘श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट’ काम करत आहे. असे ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त हेमंत सामंत म्हणाले.

सर रतन टाटा यांनी दैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य केले. त्यांच्या कार्याचा किंचितसा अंश करण्याची आम्हांला संधी लाभली हे आमचे भाग्य आहे. साधू आणि देव ओळखण्याचा एक संतविचार आपल्याकडे आहे तो म्हणजे- जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा। ते दैवत्व आणि साधूपण ‘श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट’ च्या सेवाकार्यात आणि विचारांत वसले आहे, असे उद्गार दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे अध्यक्ष नितीन कोलगे यांनी काढले.

कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यानिमित्ताने सुग्रास जेवणाचा ‘स्वाद’ घेता आला. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष नितीन कोलगे, संतोष शेट्ये, राजू शिंदे, दिपक मोरे, विलास कासार, संतोष कोटकर, विनायक मुंज यांच्यासह “दक्षिण मुंबई कॅटरिंग संघ”च्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

मंत्री धनंजय मुंडेंचे निकटचे संबंध असलेले वाल्मिक कराड आहेत तरी कोण?

0

मंत्री धनंजय मुंडेंचे निकटचे संबंध असलेले वाल्मिक कराड आहेत तरी कोण.?

बीड

हत्या प्रकरणावरून चांगलेच वातावरण तापले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणात बीडसह राज्यभरात रोष व्यक्त केला आहे.

या प्रकरणातील आरोप देखील अद्याप मूळ आरोपी अटक करण्यात आलेली नाही आहे. या प्रकरणात सतत वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव ऐकला मिळत आहे. काल बीड मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात विविध पक्षाचे नेते सामील होते. या मोर्च्यात आरोपींना अटक करा, वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी घेरले आहे. तसेच या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्किम कराड हा देखील फरार असल्यामुळे तसेच त्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटचे संबंध असल्यामुळे महायुती सरकारवर निशाणा साधला जात आहे. मात्र हे वाल्मिक कराड आहे तरी कोण.?

वाल्मिक कराडला वाल्मिक अण्णा म्हणून बीड तालुक्यामध्ये ओळखले जाते. वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष माझी गटनेते आहे. नाथं प्रतिष्ठानचे सदस्य व लाडकी बहीण योजनेचे तालुका स्तरावरील समितीचे सदस्य अथवा अध्यक्ष जिल्हा स्थायी समिती सदस्य आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मंत्री धनंजय मुंडे यांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जाते. गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी कराडने सांभाळली आहे.

 

मात्र वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांच पानदेखील हातत नाही, हे विधान स्वतः पंकजा मुंडे यांनी एका भाषणात केले होते. भाजप आमदार सुरेश धसही जाहीरपणे बोलले आहेत गोपीनाथ मुंडेंनी घरकामासाठी ठेवलेला मुलगा अशी कराडांची ओळख होती. वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत होता असं म्हटलं जातं. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे दोघे चांगले मित्र होते, जेव्हा धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेपासून दूर झाले तेव्हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेसोबत आला. त्यानंतर धनंजय मुंडेंचे सर्व आर्थिक व्यवहार आणि मोठे कार्यक्रम घेण्याची जबाबदारी वाल्मिक कराड पार पाडत होता.

 

धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे कराड जिल्हा चालवायचा धनंजय मुंडे पालकमंत्री असताना दरारा होता. विशेष म्हणजे, यापूर्वीही वाल्मिक कराड याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. कराड याचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत, ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणनिस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरदचंद्र पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे आता केज पोलीस ठाण्यात कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौचाला गेली महिला, मागोमाग दीरही गेला; वहिनीला त्या अवस्थेत पाहताच बेशुद्ध

0

शौचाला गेली महिला, मागोमाग दीरही गेला वहिनीला त्या अवस्थेत पाहताच बेशुद्ध

लखनऊ :

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला शौचाला जाते सांगून एकटीच घराबाहेर पडली. बऱ्याच वेळानंतर तिचा दिरही तिच्या मागोमाग गेला. दिराने वहिनीला अशा अवस्थेत पाहिलं की तो पुरता हादरला.

वहिनीला पाहताच दिर बेशुद्ध झाला. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

लाहसी गावात राहणारी ही 35 वर्षांची महिला. मीना कुमारी असं तिचं नाव. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आपण शौचालायला जात आहे, असं मुलांना सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाला पण ती काही परत आली नाही. शेवटी तिचा दिर आणि तिची मुलं तिला शोधायला गेली. पण तिला पाहून सगळे घाबरले.

 

शनिवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास मीना दिसली ती शेतात. पण ती जिवंत नव्हती. तर शेतात तिचा रक्ताने माखलेला मृतदेह होता. बाजूलाच प्लॅस्टिकचा डबा पडला होता. वहिनीला अशा अवस्थेत पाहून दिर रडू लागला. वहिनी वहिनी मोठमोठ्याने ओरडू लागा. त्याचा आवाज ऐकून इतर ग्रामस्थ तिथं जमा झाले.

 

तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळे तिची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृताच्या दिराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास केला. त्यांच्याकडे अनेक महत्त्वाचे सुगावा लागल्याचा पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे. सीओ जगत कनोजिया म्हणाले की, कुटुंबाकडून कोणावरही आरोप करण्यात आलेले नाहीत.

 

शनिवारी सायंकाळी महिलेची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

 

महिलेच्या पतीने तीन वर्षांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली. महिलेला 3 मुलं. 17 वर्षांचा मोठा मुलगा पंजाबमध्ये राहतो, तिथंच काम करतो. 12 वर्षांची मुलगी शिवानी आईला घर आणि शेतीच्या कामात मदत करते. 10 वर्षांचा नाईक हा मुलगा पाचवीत शिकतो. कुटुंब वेगळं झाल्यानंतर या कुटुंबाला साडेतीन बिघा जमीन मिळाली आहे. या जमिनीवर शेती करून ही महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.

तुझ्या भिशीने कर्जबाजारी झालो’, सोलापूरच्या मास्तराने पत्नीची गळा घोटला.!!!

0

तुझ्या भिशीने कर्जबाजारी झालो’, सोलापूरच्या मास्तराने पत्नीची गळा घोटला.!!!

सोलापूर प्रतिनिधी :-

पत्नीच्या भिशीमुळे कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरच्या बार्शीमध्ये घडला आहे. तसंच या व्यक्तीने स्वत:च्या मुलावरही हल्ला केला आहे.

या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझ्या भिशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे, असं म्हणत खासगी शिकवणी घेणाऱ्या पतीने पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसवून शेतात नेलं.

शेतात नेल्यानंतर पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळला आणि चाकू, दगडाने मारहाण करून हत्या केली. यानंतर त्याने स्वत:च्या मुलावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या नागोबाचीवाडी शिवारात ही घटना घडली आहे.

मनिषा अनंत साळुंखे असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. तर तेजस अनंत साळुंखे हा त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी अनंत रामचंद्र साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. समर्थ अनंत साळुंखे याने याबाबत तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.

error: Content is protected !!