Thursday, January 22, 2026
Google search engine
Home Blog Page 106

बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.!!!

0

बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.!!!

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभ्युदयनगर येथील बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने केईएम हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, जे रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत गणराज सभागृह, इमारत क्र.१६ च्या बाजूला, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई-४०००३३, येथे आयोजित केले जाईल.

 

रक्तदान शिबिराचे उद्दिष्ट गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांकडून रक्त संकलन करणे आहे. रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, यशस्वीरित्या रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला २४ इंची ट्रॅव्हल बॅग ही आकर्षक भेट दिली जाईल. रक्तदान शिबिराचे आयोजक जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. हे शिबिर म्हणजे एका उदात्त कार्यात योगदान देण्याची आणि जीव वाचवण्याची सर्वोत्कृष्ट संधी आहे.

 

“आम्ही सर्वांना पुढे येऊन गरजूंना मदत करण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन करतो,” असे बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे प्रवक्ते म्हणाले. “प्रत्येक रक्तदान तीन जीव वाचवू शकते आणि आम्हाला आशा आहे की आमचे शिबिर लोकांना समाजाचे ऋण परतफेड करण्यास प्रेरित करेल. आम्ही सर्व रक्तदात्यांना रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आणि ते यशस्वी करण्याचे आवाहन करतो. तुमचे योगदान अनमोल जीव वाचवण्यास आणि समाजमनावर सकारात्मक परिणाम करण्यास मदत करू शकते.”

धाराशिव जिल्हयात ‘आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन संपन्न.!!!

0

धाराशिव जिल्हयात ‘आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन संपन्न.!!!

 

धाराशिव (गुरुदत्त वाकदेकर) : माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री कविता पुदाले यांच्या संकल्पनेतून ‘आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन थाटात संपन्न झाले. संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे.

 

कार्यक्रमाची सुरुवात कमल नलावडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. ग्रंथदिंडी डॉ. सुलभा देशमुख यांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन झाले. यावेळी प्राचार्य. डॉ. सुभाष राठोड, प्रा . रणजित दांगट, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. हशमबेग मिर्झा, डॉ. दयानंद भोवाळ, डॉ. तुळशिराम दबडे, डॉ. दिपक जगदाळे, अधिक्षक धनंजय पाटील, शिवाजीराव घुगे अणदूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

विद्यार्थ्यावर योग्य संस्कार होण्यासाठी प्रा. रणजित दांगट यांच्या ‘आई समजून घेताना’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी आई विषय अत्यंत अलवारपणे व जिव्हाळ्याने श्रोत्यांना समजावून सांगितला आणि असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत असे म्हणून आयोजकांना धन्यवाद दिले. या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी “आमचे महाविद्यालय नेहमीच समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मदतीला सदैव तत्पर असेल असे आश्वासन दिले.”

 

सदर कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे

कौटूंबिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या महिला सेवाव्रतींना ‘मातोश्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये डॉ. सुलभा दिलीप देशमुख, धाराशिव (माजी प्राचार्य), डॉ. रेखा अनिल ढगे, (कवयित्री) धारशिव, तृप्ती जगदिश काटकर, कोल्हापूर यांचा समावेश होता. तर सुरभी बी. के. (गीतकार) वडगांव सिध्देश्वर, धाराशिव यांना विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले.

 

सदर संमेलनात ‘आई’ विषयावर घेतलेले कवी संमेलन अतिशय रंगतदार झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजी गायकवाड होते. प्रमुख पाहूणे डॉ. रेखा ढगे आणि अरविंद हंगरगेकर होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. गायकवाड यांनी आपल्या कवितेतून आई विषय मांडला. गेल्या चार वर्षापासून चालू असलेल्या आई एक महाकाव्य व आई समजून घेतांना कार्यक्रमासाठी आयोजकांचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.

 

कविसंमेलनामध्ये डॉ. मधुकर हुजरे, धाराशिव, नागोराव सोनकुसरे, नागपुर, रुपेशकुमार जावळे, सुरभी भोजने वडगांव (सिध्देश्वर), गणेश मगर वाघोली, बाळासाहेब मगर धाराशिव, महाविद्यालयीन विद्यार्थीनी शिवानी जगताप, स्नेहल जाधव, निकिता घुगे, निकिता जाधव, प्रज्ञा सुरवसे यांनी कविता सादर केल्या.

 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. संतोष पवार आणि डॉ. सचिन देवव्दारे यांनी केले. तर आभार डॉ. तुळशिराम दबडे व डॉ. लक्ष्मण थिट्टे यांनी मानले.

 

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या कल्पक कार्यक्रमाचे आयोजन रमेशराव पुदाले, सुनील उकंडे, कविता पुदाले, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. रुपेशकुमार जावळे, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. डी. जी. जाधव, डॉ. एच. एम. मिर्झा, डॉ. पी. एस. गायकवाड, प्रा. अशिष हंगरगेकर, डॉ. संतोष पवार व सर्व सदस्य माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान, नळदुर्ग यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिध्दु सुतार, सचिदानंद घुगे, भागीनाथ बनसोड, दतात्रय कांबळे, मधुकर माने, सचिन गायकवाड, भिमराव गवारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना भेट.!!!

0

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना भेट.!!!

पुणे :-

11 जानेवारी (हिं.स.)।डी.बी.टी मार्फत अनुदानाचे वाटप करणे शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा १५००/- रुपये अनुदान दिले जाते.

 

सदरचे अनुदान तहसिल स्तरावरुन बँकेत पाठवून NEFT/RTGS व्दारे लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते. मात्र, आता थेट डीबीटीमार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत केले जाणार आहे.संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसिलकडून संबंधित बँकेत सर्व लाभाथ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात आहे. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे.

 

परंतु आता संगायो व श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटीमार्फत मिळणार आहे. त्यासाठी संगायो निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आपला मोबाईल नंबर आधाराशी संलग्न असणे आवश्यक आहे. संगायो व श्रावणबाळ योजनतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी अथवा ज्या बँकेमधून सदर योजनेचा लाभ घेत आहात त्यांचेकडे ३१ जानेवारी २०२५ अखेर पर्यंत जमा करावेत. जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी.विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी हे अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी अथवा ज्या बँकेमधून सदर योजनेचा लाभ घेत आहात तेथे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांचेकडून करण्यात येत आहे.

भडगाव येथील शाळेत डेरेदार वृक्षांची कत्तल करून बेकायदेशीर बांधकाम.?

0

भडगाव येथील शाळेत डेरेदार वृक्षांची कत्तल करून बेकायदेशीर बांधकाम.?

 

वृक्षतोड व पक्षांचे जीव घेऊन बांधकामाला चालना देणाऱ्यांवर प्रशासन कारवाई केव्हा करणार.?

 

तिस वर्षांपासून टाळू वरचे लोणी खाणारे ते दोन “आका” कोण.?

 

विशेष प्रतिनिधी (किशोर रायसाकडा ):-

भडगाव शहरातील कोठली रस्त्यावतील शाळा हि दर सहा महिन्यात कुठल्या न कुठल्या विषयात चर्चेत राहते. यातच काही दिवसापूर्वी शाळेच्या परिसरातील पाच ते सहा डेरेदार हिरवेगार निंबाच्या झाडांची मुख्याध्यापकांनी कुठलीही पूर्व परवानगी न घेता हुकूमशाही पद्धतीने झाडांची कत्तल करून डेरेदार झाडांवर निवारा करणाऱ्या हजारो पक्षांना (बगळे व त्यांची छोटी पिल्ले व झाडावरील घरट्यातले शेकडो बगळ्यांची अंडी) मारले गेले होते. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांवर व शाळेवर गुन्हा दाखल करण्या पर्यंत विषय होता. पण त्या वेळी त्या तक्रारदारांचे व वन विभागाचे तोंड बंद करून तेरी भी चूप मेरी भी चुप करून प्रकरण गोलमाल कऱण्यात आले

 

असताना याच पाच सहा डेरेदार निंबाच्या झाडांच्या जागेवर शाळा तिस वर्षांपासून हुकूमशाही चालवणाऱ्या दोन आका ,संचालक मंडल व मुख्याध्यापकांनी बेकायदा,हमकायदा याठिकाणी गेल्या काही दिवसापासून मोठे बांधकाम सुरु केले आहे. हे करतांना त्यांनी जे डेरेदार निंबाचे वृक्ष कत्तल करून एका लाकूड व्यापार्याला देऊन टाळूवरचे लोणी खाऊन अनेक पक्षांना मारून टाकत. त्या ठिकाणीं नवीन कुठलेही झाडं न लावता अनाधिकृत बेकायदा बांधकामाला सुरुवात केली. या बांधकाम करण्या मागचा उद्देश काय? तसेच शाळेत कुणाला काही माहिती पडत नाही. तिस वर्षा पासुन परीसरात अनेक बांधकामे झाली ती अधिकृत आहेतः की अनाधिकृत तसेच शाळेची मेन बिल्डिंग तीन मजली आहे. त्या किती मजल्यांची परवानगी घेतली आहे. त्या समोर सभा मंडप (स्टेज) बांधण्यात आले त्याची परवानगी घेतली आहे का?त्याचे संपूर्ण टॅक्स हा नगरपालिकेला अदा केला आहे का ? अदा केला नसेल किंवा परवानगी घेतली नसेल तर प्रशासनाने या अवैध बांधकामावर करवाई करावी. व तिस वर्षांपासून हुकूमशाही पद्धतीने संस्था चालवणाऱ्या त्या दोन आका संचालक मंडल व मुख्याध्यापकांवर प्रशासनाने सरळ हाताने कारवाई करावी. अश्या हुकूमशाही पद्धत व बेकायदेशीर कामांना आळा घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

अपघात झाल्यावर ‘एवढा’ खर्च सरकार करणार, नितीन गडकरींची घोषणा; फक्त एकच अट.?

0

अपघात झाल्यावर ‘एवढा’ खर्च सरकार करणार, नितीन गडकरींची घोषणा; फक्त एकच अट.?

दिल्ली : –

देशातील रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अपघातांत जखमी झालेल्यांना उपचारांसाठी केंद्र सरकार थेट मदत करणार आहे. अपघातग्रस्तांवर मोफत ( कॅशलेस ) आणि तातडीनं उपचार होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नवी योजना जाहीर केली आहे.

या योजनेअंतर्गत अपघात झाल्यावर 24 तासांच्या आत पोलिसांना माहिती द्यावी लागणार आहे. मगच पीडितांच्या उपाचाराचा 7 दिवस किंवा दीड लाखांपर्यंतचा खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाणार आहे, ही एकच अट या योजनेत असणार आहे.

तसेच, धनदांडग्यांच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणात एखाद्या निरपराधाचा मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबाला 2 लाख रूपये मिळतील, अशी घोषणाही गडकरी यांनी केली आहे. राज्यांच्या परिवहन मंत्र्यांसोबत प्रगती मैदानात ( भारत मंडपम ) झालेल्या बैठकीनंतर गडकरींनी रस्ता सुरक्षा, जुनी वाहने स्क्रॅप करणे आणि भारताच्या ऑटोमोबाइल उद्योगाच्या विकासाबाबत माहिती दिली.

नितीन गडकरी म्हणाले, “2024 मध्ये रस्ते अपघातात किमान 1 लाख 80 हजार लोकांनी आपला जीव गमावला. यापैकी 30 हजार लोकांनी मृत्यू हेल्मेट न घातल्यानं झाला आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे यातील 66 टक्के मृत हे 18 ते 34 वयोगटातील आहेत.”

 

“ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या लोकांमुळे झालेल्या अपघातांत जवळपास तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आमच्या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र होता. आपल्या देशात सध्याच्या घडीला तब्बल 22 लाख वाहन चालकांची कमतरता आहे. मात्र, आम्ही धोरण बनवले आहे,” अशी माहिती गडकरींनी दिली आहे.

“चार महिन्यांपूर्वी जपानला मागे टाकत भारत वाहन उद्योग क्षेत्रात जगातील तिसरा मोठा देश बनला आहे. देशाच्या वाहन उद्योग क्षेत्राची उलाढाल आता 22 लाख कोटींवर पोहोचली आहे,” असंही गडकरींनी म्हटलं.

केंद्र सरकारची कॅशलेस उपचार योजना काय आहे.?

१४ मार्च २०२४ रोजी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने चंदीगडमध्ये रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचार देण्यासाठी एक पायलट प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार होत्या. चंदीगडमध्ये हा प्रकल्प यशस्वी झाला. चंदीगडनंतर या योजनेचा आणखी ५ राज्यांमध्ये विस्तार करण्यात आला. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. ७ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात या योजनेच्या अधिकृत सुरुवातीची घोषणा केली.

अपघात झाल्यास या योजनेचा लाभ कसा मिळेल.?

कॅशलेस उपचार योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने ३ टप्पे सांगितले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात अपघातानंतर जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. केंद्र सरकार या सरकारी हॉस्पिटलची यादी जारी करेल. दुसऱ्या टप्प्यात अपघातानंतर २४ तासांत पोलिसांना कळवणे, अपघाताची संपूर्ण माहिती, जखमींची परिस्थिती पोलिसांना माहिती देणे. तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीचे दोन्ही टप्पे पार केल्यानंतर जखमींची फाईल तयार होईल त्यात पोलीस रिपोर्ट,जखमीचं ओळख पत्र जमा करावे लागेल.

१.५ लाख रुपये कसे मिळतील आणि त्यातून कोणते उपचार करता येतील.?

कॅशलेस ट्रिटमेंट योजनेच्या तिन्ही टप्प्याचे पालन केल्यानंतर जखमी व्यक्तीला १.५ लाख रुपये दिले जातील. ज्यामुळे अपघाताच्या दिवसापासून पुढील ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातील. जखमींना प्रवेशावेळी कुठलेही शुल्क नाही. प्राथमिक उपचार मोफत मिळतील. गंभीर रित्या जखमी झाल्यास सर्जरीची सुविधा मिळेल. एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या सुविधा मोफत मिळतील. उपचारावेळी दिली जाणारी औषधे मोफत असतील.

भडगाव तालुका भाजपा सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव तालुका भाजपा सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भारतीय जनता पक्ष भडगाव तालुक्याची सदस्य नोंदणी अभियान संदर्भात जिल्ह्याचे नेते ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशाने, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील महाराज जळकेकर व सदस्य नोंदणी अभियान जिल्हा संयोजक सचिन पानपाटील यांच्या सूचनेवरून पाचोरा विधानसभा मतदारसंघ प्रभारी के. बी. दादा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व पाचोरा विधानसभा निवडणुक प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

 

भडगाव तालुक्याची सदस्य नोंदणी अभियान संदर्भात कार्यशाळा आज भडगाव येथील सुशिल जिनींग येथे संपन्न झाली. यावेळी सदस्य नोंदणी करण्यासाठी बाजारात, यात्रेत, शाळा, काॅलेज, बस स्टॉप व गर्दिच्या ठिकाणी स्टाॅल लावून तसेच घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करायची आहे. तसेच जे शिर्डी येथील प्रदेश अधिवेशन साठी अपेक्षित आहेत. त्यांनी २५० सदस्य नोंदणी करूनच यायचे आहे. असे के बी दादा साळुंखे यांनी सांगितले. भडगाव तालुक्यासाठी २५ हजार सदस्य नोंदणीचे टार्गेट आम्ही पुर्ण करणार असे आश्वासन अमोल भाऊ शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने दिले.

 

यावेळी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्षा नुतनताई पाटील, जिल्हा चिटणीस प्रमोद पाटील, तालुका सरचिटणीस विनोद नेरकर, पर्यावरण आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, माजी सैनिक जिल्हाध्यक्ष देविदास पाटील, अंत्योदय जिल्हाध्यक्ष धनराज पाटील, शहराध्यक्ष धर्मेंद्र परदेशी, नरेंद्र पाटील, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ खैरनार, जिल्हा चिटणीस विकास महाजन, महिला आघाडी विधानसभा प्रमुख प्रतिभा साठे, तालुकाध्यक्ष सविता चौधरी, शहराध्यक्ष सरिता पाटील, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक शुभम सुराणा, भाजयुमो विधानसभा संयोजक किरण शिंपी, शहराध्यक्ष विशाल चौधरी, दगडू महाजन, जगन्नाथ महाजन, भगवान पाटील, रतिलाल पाटील, राजेंद्र शिंपी, अरुण पाटील, विशाल पाटील, शरद हिरे, गोरख महाजन सह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची भडगाव तालुका कार्यकारणी जाहीर.!!!

0

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची भडगाव तालुका कार्यकारणी जाहीर.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.

भास्कर पाटील लोकमत पत्रकार महिंदळे यांची अध्यक्षपदी आणि रतिलाल पाटील, गोंडगाव यांची कार्याध्यक्ष पदी, संजय पाटील भातखंडे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. तसेच, भडगाव शहर अध्यक्षपदी स्लाउद्दीन शेख यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.संघाची बैठक मोठ्या खेळी मेळीने.मोठ्या उत्साहात पार पडली

नवीन कार्यकारिणीला पत्रकारांच्या हितसंबंधांसाठी काम करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

 

ही निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री किशोर रायसाकडा, यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे यावेळी विभागीय कार्याध्यक्ष श्री अबरार मिर्झा, विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश रावळ, प्रल्हाद पवार, मनीष सोनवणे, गोपाल भोई, मुजम्मील शेख,चेतन महाजन,देवा महाजन, अलीम शाह,दिलीप पाटील,जाकीर शेख,आदी सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते

आधी डोक्याला खाज, नंतर तीन दिवसांनी टक्कल; विचित्र आजाराने महाराष्ट्र हादरला

0

आधी डोक्याला खाज, नंतर तीन दिवसांनी टक्कल; विचित्र आजाराने महाराष्ट्र हादरला.!!!

बुलढाणा प्रतिनिधी :-

बुलढाण्यातून एक अनोखी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोकांना अचानक जास्त केस गळण्याची समस्या उद्भवली आहे. ही समस्या इतकी वाढली आहे की, काही दिवसातच लोकांच्या डोक्यांवर टक्कल पडले आहे.

या विचित्र आजारामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आरोग्य पथक स्थानिक पाणीपुरवठ्याची तपासणी करत आहे.

 

बुलढाण्यात टक्कल व्हायरसने थैमान घातले आहे. काही दिवसांतच 40 ते 50 लोकांना टक्कल पडले आहे. लोकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. त्यानंतर काही दिवसांत टक्कल पडल्याचं समोर आलं आहे. शॅम्पू वापरणाऱ्यांना टक्कल पडल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे, पण ज्यांनी कधी शॅम्पू वापरला नाही त्यांनाही अचानक केस गळायला लागले आहेत.

 

या तीन गावांतील लोकांना करावा लागतोय सामना

बोंडगाव, हिंगणा, कालवड या तीन गावांमध्ये टक्कल पडत आहे. यामध्ये पुरुषांसोबतच महिलांचाही समावेश आहे. यामुळे नागरिक दहशतीत आहेत. आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने तात्काळ सर्वेक्षणाच्या आदेशांची घोषणा करण्यात आली आहे. नमुने घेऊन यावर खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अचानक होतेय केसगळती

शेगाव तालुक्यात तीन गावांमध्ये 50 हून अधिक लोकांना अचानक केसगळती होत आहे. काही दिवसातच त्यांचे डोकं टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

अज्ञात आजाराने घातलेय थैमान

 

तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांमध्ये अज्ञात आजाराने थैमान घातले आहे. कुटुंबाच्या कुटुंब या व्हायरसचे बळी ठरत आहेत. सुरुवातीला डोक्याला खाज सुटते, नंतर केस हातात येतात आणि तिसऱ्या दिवशी टक्कल पडते. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिन्ही गावांमधील अनेक लोकांची केस एकाएकी गळून जात आहेत, आणि यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. आरोग्य विभागाने यावर तपासणी सुरू केली आहे.

 

समस्येवर करण्यात आले सर्वेक्षण

 

केसगळतीच्या समस्येवर सर्वेक्षण करण्यात आले आहे आणि पाणी नमुने घेतले आहेत. साथ रोग अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही कळवण्यात आले आहे. नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत. शॅम्पूने असे होणं शक्य असं डॉक्टरांचे म्हणणं असले तरी, शॅम्पू न वापरणाऱ्यांचेही केस गळल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

 

मार्गदर्शन शिबिर राबवण्याची मागणी

 

जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन या गावांमध्ये उपचार व मार्गदर्शन शिबिर राबवण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या घटनेबाबत अवगत केले आहे.

 

प्रत्येक गावात 15 ते 20 रुग्ण प्रभावित

 

शेगाव तालुक्यातील गोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक गावात 15 ते 20 रुग्ण यामुळे प्रभावित झाले आहेत, आणि तिन्ही गावांमध्ये जवळपास 60 रुग्णांना या समस्येचा सामना करावा लागला आहे. एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्तींना केस गळून पडत आहेत, त्यामुळे टक्कल देखील होत आहे.

 

आरोग्य विभाग घेतोय शोध

 

तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण केले असून पाणी नमुने घेतले आहेत. अचानक उद्भवलेल्या या आजारामुळे आम्ही देखील आश्चर्यचकित आहोत. तालुका आरोग्य विभागाने जिल्हा साथ रोग अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या बाबत माहिती दिली आहे. आम्ही शोध घेत आहोत की हा आजार का आणि कसा घडत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली भायेकर यांनी दिली.

 

४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतुस सह मध्यप्रदेशच्या तरुणाच्या भडगांव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0

४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतुस सह मध्यप्रदेशच्या तरुणाच्या भडगांव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

मध्यरात्रीच्या कारवाईत आरोपी अटकेत

 

भडगांव प्रतिनिधी :-

तालुक्यातील पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास चार गावठी पिस्टल व विस जिवंत काडतूस विना परवाना घेऊन येताना मध्यप्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलीसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत एक लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई भडगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे,पो. कॉ. प्रविण परदेशी,पो. हे. कॉ. निलेश ब्राम्हणकार, पो. कॉ. महेंद्र चव्हान, पो. कॉ. संदीप सोनवणे आदींनी केली.

 

या बाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी -पो. कॉ. प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ८ रोजी रात्री तीन वाजे सुमारास भडगांव ते एरंडोल रोडवर पिंपरखेड गावाच्या अलीकडेस आरोपी – सुनिल बिलदार बारेला(वय ३५) रा. उमरटी. ता. बारला जि. बडवाणी मध्य प्रदेश हा ०४ गावठी बनावटीचे पिस्टल, २० जिवंस काडतुस यामध्ये १)२५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस काळयारंगाची प्लेट २) २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस काळया रंगाची प्लेट ३) २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस लाल रंगाची प्लेट तिवर गोलाकार स्टारची नक्षी असलेली ४) २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस लाल रंगाची प्लेट तिवर गोलाकार स्टारची नक्षी असलेली ५) २०,०००/- रु. कि. गावठी बनावटीची पिस्टलचे २० जिवंत काडतुस ६) ५०,०००/- रु. कि, बजाज प्लॅटीना कंपनीची मो. सा. क्रमांक एम पी ४६ झेड बी ४७६२ जु. वा. ७) ३००/- रु. कि. हिरवट रंगाची बंग तिवर इंग्रजीत बॅग गियर लिहलेले जु. वा. कि. अं. एकूण १,७०,३००/- रु. पये

 

विना परवाना कब्ज्यात बाळगतांना मिळून आला म्हणून भडगांव पोलीस स्टेशन गु. र. न. १०/२०२५ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के हे करीत आहे.

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्त.पाचोरा रोटरी क्लब तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.!!!

0

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्त.पाचोरा रोटरी क्लब तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव यांचे तर्फे पोलीस ठाणे पाचोरा येथे आज दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव शाखेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे स्वैच्छेने रक्तदान केले.

 

पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते प्रथम रक्तदात्याची नोंदणी करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. पाचोरा पोलीस ठाण्यातर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. गोरख महाजन, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, उपनिरीक्षक योगेश गणगे, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, सहाय्यक उपनिरीक्षक परशुराम दळवी तसेच होमगार्ड तालुका समादेशक चंद्रकांत महाजन, पलटण नायक लक्ष्मण पाटील, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव ठाकरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश टाक, वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे उपस्थित होते.

 

पिंकी जीनोदिया हिने रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले

येथील आदर्श मेडिकलचे संचालक कै. कन्हैय्यालाल प्रजापत यांचे आठ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. वडिलांच्या स्मृतीच्या एक महिना प्रत्ययर्थ श्रद्धांजली अर्पण करताना कन्हैयालाल प्रजापत यांची सुकन्या सौ. पिंकी जिनोदिया यांनी शिबिरात प्रथम रक्तदान करून महिलांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला.

 

प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांचे सह, पोलीस निरीक्षक अशोक पवार, पाचोरा पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी, रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉक्टर पवनसिंग पाटील, रोटरी क्लबचे अन्य वैद्यकीय क्षेत्रातील सदस्य यांनी स्वेच्छा रक्तदान केल्याने शिबिरात इतरांनीही उस्फूर्तपणे रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. या शिबिर प्रसंगी तालुक्यातील पोलीस पाटील, महिला व पुरुष होमगार्ड, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महसूल अधिकारी व कर्मचारी, महिला व स्त्री पोलीस पाटील यांचेसह नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

 

या शिबिराला रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत लोढाया, राजेश मोर, भरतकाका सिनकर, डॉ.

घनश्याम चौधरी, डॉ. मुकेश तेली, डॉ.अजयसिंग परदेशी, डॉ. तौसिफ खाटीक, डॉ. राहुल काटकर, इंजी. गिरीश दुसाने, निलेश कोटेचा, पिंकी जीनोदिया, प्रदीप पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अमोल जाधव, डॉ. बाळकृष्ण पाटील, चंद्रकांत पाटील सर, आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.

 

इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव शाखेच्या वतीने रक्त संकलक अधिकारी डॉक्टर प्रकाश जैन दिनेश कांबळे सीमा शिंदे किरण बाविस्कर व अन्वर खान यांनी सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पाचोरा पोलीस ठाण्याचे दीपक पाटील, योगेश पाटील, भोजराज धनगर, योगेश शिंपी, होमगार्ड कपिल पाटील आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!