IMG 20260522 WA1066

भडगावात पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज सफाई मोहिमेला प्रारंभ २० मे ते ३ जूनदरम्यान शहरातील नाले, मोऱ्या आणि ड्रेनेजची होणार व्यापक सफाई

भडगावात पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज सफाई मोहिमेला प्रारंभ २० मे ते ३ जूनदरम्यान शहरातील नाले, मोऱ्या आणि ड्रेनेजची होणार व्यापक सफाईIMG 20260522 WA1065

भडगाव प्रतिनिधी :-

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या टाळण्यासाठी भडगाव नगरपरिषद प्रशासनाने व्यापक ड्रेनेज व नालेसफाई मोहिमेला सुरुवात केली आहे. दि. २० मेपासून बाळद रोड परिसरातून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून शहरातील प्रमुख ड्रेनेज, मोऱ्या व नाल्यांची टप्प्याटप्प्याने साफसफाई केली जाणार आहे.

नगरपरिषदेच्या वतीने बाळद रोडवरील ड्रेनेज साफसफाईसह रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे, गवत तसेच मातीचे ढिगारे हटविण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरू करण्यात आले आहे. मागील वर्षी पावसाळ्यात काही भागांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्याच पार्श्वभूमीवर यंदा आगाऊ नियोजन करत सर्व ड्रेनेज आणि नाले पूर्णपणे स्वच्छ करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे.

या मोहिमेत बाळद रोड दुतर्फा ड्रेनेज, तळणी ते बाळद रोड परिसर, जयकिसान कॉलनी-दत्तनगर, भगीरथ किराणा जवळील काँक्रीट मोरी, जयहिंद कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, पोलीस लाईन, एच कॉलनी, शिवनेरी गेट ते सिव्हील हॉस्पिटल परिसरातील ड्रेनेजची साफसफाई करण्यात येणार आहे. तसेच कोल्हा नाला, ग्रीनपार्क कॉलनी, आदर्श कन्या शाळा परिसर, न्यायालय परिसर, भागवत कॉलनी आणि मेन रोडवरील नाल्यांच्या सफाईचेही नियोजन करण्यात आले आहे.

नगरसेवक अमोल नाना पाटील यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकारातून प्रभाग ८, ९ आणि १० मधील ड्रेनेज सफाई आराखडा तयार करण्यात आला. या नियोजनासाठी विजयकुमार भोसले, सौरभ पाटील, जितेंद्र शांताराम पाटील यांच्यासह आरोग्य विभाग प्रमुख सत्यम पाटील, निशा लोट व छोटू वैद्य यांनी संयुक्त चर्चा करून तातडीने अंमलबजावणी सुरू केली.

दि. २० मे ते ३ जूनदरम्यान ही मोहीम अखंड सुरू राहणार असून उर्वरित प्रभागांतील सफाईचे नियोजनही स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत समन्वय साधून करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पावसाळ्यात शहर स्वच्छ व सुरक्षित राहण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top