जळगावविशेष

भडगावात मुद्रांक शुल्क चोरीचा मोठा घोटाळा उघड

दुय्यम निबंधक कार्यालय व मुद्रांक विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भडगावात मुद्रांक शुल्क चोरीचा मोठा घोटाळा उघड

दुय्यम निबंधक कार्यालय व मुद्रांक विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय, खरेदी-विक्री रजिस्टर व काही मुद्रांक विक्रेते यांनी संगनमताने बोगस दस्त नोंदणी व खोट्या कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर व्यवहार करून शासनाचा तब्बल ८० टक्क्यांपर्यंत महसूल बुडविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, रा. भडगाव यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक, भडगाव यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भडगगाव पोलिसांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी व जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तात्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, भडगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून बोगस दस्त नोंदणी, खोट्या कागदपत्रांवर खरेदी-विक्री व्यवहार, कमी मुद्रांक शुल्क दाखवून शासनाची फसवणूक, तसेच नियमबाह्य पद्धतीने रजिस्टर कामकाज करण्यात येत आहे. यामध्ये काही मुद्रांक विक्रेते व दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करीत असल्याचा आरोप आहे.

या गैरप्रकारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय, नियमबाह्यरित्या अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर तहसीलदार सौ. शितल सोलाट यांनी तात्काळ कारवाई करत अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

भडगाव दुय्यम निबंधक कार्यालयातील संशयास्पद कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, मुद्रांक शुल्क घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक नुकसानभरपाई संबंधितांकडून वसूल करावी, अशी ठाम मागणी पोलीस निरीक्षक व तक्रारदार विजय पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून तात्काळ ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव समोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही तक्रारदारांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असून, प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!