
भडगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये आज झालेली (शिंदे)शिवसेना अल्पसंख्याक कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. ना. समीर गुलामनबी काझी यांची प्रचारसभा भव्य उत्साहात पार पडली. उपस्थितांच्या प्रचंड गर्दीने परिसर दणाणून गेला.
नगराध्यक्षपदाच्या उमदेवार रेखाताई प्रदीप मालचे, तसेच प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार मिर्झा अंजुम प्रवीण आणि इम्रान अली सैय्यद यांच्या समर्थनार्थ आयोजित या सभेला स्थानिक पातळीवरील नागरिक, कार्यकर्ते आणि युवा वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सभेत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह सय्यद अली, मुख्तार शेख, जाकीर मिर्झा, अनिस मिर्झा, नासिर मिर्झा, नाजीम खाटीक, मोहसीन खाटीक आदी मान्यवरांची उपस्थिती विशेष ठरली. नेत्यांच्या जाहीर भाषणांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
समीर काझी यांनी या निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक कामांची हमी देत उमेदवारांनाl मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक 3 मधील ही सभा निवडणूक वातावरण आणखी तापवणारी ठरली असून, राजकीय वर्तुळातील चर्चेतून दिसून येत आहे.
