राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दरमहा 1,500 रुपयांचा लाभ देणाऱ्या या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नाही, यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
मात्र आता सरकारकडून महत्त्वाची स्पष्टता मिळाली आहे.
केवायसीला मिळाली मोठी मुदतवाढ
अनेक लाभार्थींची ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने राज्य शासनाने दिलासा देत केवायसीची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
याआधी ही अंतिम तारीख 18 नोव्हेंबर होती, परंतु मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अर्ज पाहता मुदतवाढ देण्यात आली.
ज्या महिलांनी अजून केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोव्हेंबरचा हप्ता केव्हा जमा होणार.?
ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा झाल्याने महिलांना नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळेल अशी अपेक्षा होती.
सध्या राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने हप्ता वितरण थांबवण्यात आले आहे.2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी झाल्यानंतरच पुढील निर्णय शक्य होईल.दरम्यान, नोव्हेंबरचा हप्ता 4 डिसेंबरनंतर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
