भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शहरात शांतता,कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित ठेवण्यासाठी भडगाव पोलिसांनी शनिवारी दिमाखदार रूट मार्च काढला.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्विघ्न पार पडावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी,या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
रूट मार्चमध्ये भडगाव पोलिस ठाण्याचे ३ अधिकारी,३० पोलीस कर्मचारी,दंगानियंत्रण पथकाचे-१५ कर्मचारी, पुणे,दौड येथील-१६ एस. आर.पी.टिम,
८६ होमगार्ड कर्मचारी यांचा समावेश होता. सायंकाळी ६:०० वाजता भडगांव तहसिल कार्यालया समोरून पोलिस ठाण्यापासून मार्गक्रमणाला सुरुवात झाली.मेन रोड नगरदेवळा दरवाजा,रथ मार्ग नगरपालिके जवळुन मेढया मारुती पासुन टोणगांव,जयहिंद कॉलणी,महालक्ष्मी कॉलणी,दत्तनगर,बाळद रोड मार्ग महाराणा प्रताप चौक पारोळा चौफुली, पाचोरा चौफुली वरून, भडगांव पोलिस स्टेशन येथे समाप्त झाला तसेच ज्या ठिकाणी निवडणूक काळात अधिक गर्दी होते त्या सर्व संवेदनशील भागांतून पोलीस तुकड्यांनी पायी रूट मार्च करत.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. निवडणूक काळात शहरातील वातावरण शांत व सुरक्षित ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सर्वांसाठी आश्वासक असल्याचे नागरिकांनी सांगितले. बाजारपेठांमध्ये रूट मार्च पाहण्यासाठी लोकांनी उत्सुकता दाखवली. अनेक व्यापाऱ्यांनी पोलिसांना शुभेच्छा देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
पोलिसांनी या वेळी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, सोशल मीडियावर अपप्रचार टाळण्याचे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. कायदा मोडणाऱ्या किंवा गैरप्रकारात सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.
नगरपरिषद निवडणुका पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिस प्रशासन पुरेशा प्रमाणात सज्ज असल्याचे या रूट मार्चमधून स्पष्ट दिसले. पुढील काळातही शहरातील परिस्थितीवर पोलिस यंत्रणा सतत लक्ष ठेवणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
