जळगावराजकीय

शब्द नाही तर काम करणारे नेतृत्व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने पहान–लाख रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी

शब्द नाही तर काम करणारे नेतृत्व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने पहान–लाख रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी

पाचोरा ता. प्रतिनिधी:-

वर्षानुवर्षे रखडलेला आणि नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेला पहान–लाख रस्त्याचा प्रश्न आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेर मार्गी लागला आहे. प्रत्यक्ष स्थळी भेट देत, अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना कडक सूचना देत आणि तत्काळ भूमिपूजन करून कामास सुरुवात केल्याने पहान परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने मोठी वाहने जाऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, याला न जुमानता आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वतः मोटरसायकलवरून सुमारे चार किलोमीटरचा प्रवास करत धरणापर्यंत जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. या कृतीमुळे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची प्रचीती पुन्हा एकदा नागरिकांना आली.

ठाम आदेशामुळे अनिश्चिततेला पूर्णविराम

ठरलेल्या दिवशी प्रत्यक्ष पहान–लाख रस्त्यावर उपस्थित राहून आमदार साहेबांनी संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना कडक शब्दांत स्पष्ट आदेश दिले.

“रस्त्याचे काम आजपासून त्वरित सुरू करा. कोणीही अडथळा निर्माण केल्यास कोणतीही तडजोड न करता संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करा,” असे निर्देश त्यांनी दिले.

या ठाम भूमिकेमुळे रस्त्याच्या कामाबाबतची सर्व अनिश्चितता दूर झाली.

यानंतर विधीवत भूमिपूजन करून पहान–लाख रस्त्याच्या कामाला अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

सिंचनाच्या प्रश्नावरही तात्काळ कृती

रस्त्याच्या प्रश्नानंतर ग्रामस्थांनी सिंचनासाठी पाण्याच्या गंभीर समस्येकडे आमदार साहेबांचे लक्ष वेधले. धरणाकडे जाणारा मार्ग अत्यंत खराब असून मोठी वाहने जाऊ शकत नसल्याचे लक्षात येताच, कोणतीही औपचारिकता न करता आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वतः मोटरसायकलवर बसून शेतकरी बांधवांसोबत थेट धरणाची पाहणी केली.

वनक्षेत्रातील या धरणातून पहान गावासाठी सिंचनाचे पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, यावर जागेवरच चर्चा करून उपाययोजनांची दिशा ठरवण्यात आली.

यावेळी आमदार साहेबांनी, “हा प्रश्न मी वैयक्तिक लक्ष घालून सोडवणार असून पहानवासीयांना न्याय मिळवून देणार,” असा विश्वास ग्रामस्थांना दिला.

उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष विनोद तावडे, उपनगराध्यक्ष किशोर बावरकर (आप्पा), नगरसेवक तथा कृषी बाजार समितीचे सभापती गणेश बापू, ठेकेदार संजू नाना (एस.एस.पी. ग्रुप), प्रदीप आबा यांच्यासह आबाजी गोबा पाटील, विलास चुडामण पाटील, विलास सुभाष पाटील, एकनाथ अहिरे, विनोद सुरेश पाटील, अरुण आधार पाटील, भाऊसाहेब चुडामन पाटील, शालीक राजाराम पाटील, रविकांत (सोनू पाटील), सागर पाटील, मंगेश पाटील, प्रशांत पाटील, मनोहर पाटील, अखिल पटेल, ऋषिकेश महाजन, तुषार पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांकडून जाहीर सत्कार

रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करून तसेच सिंचनाच्या प्रश्नावर तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल पहानवासीयांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा जाहीर सत्कार करून आभार व्यक्त केले.

शब्दांपेक्षा कृतीला प्राधान्य देणाऱ्या आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या या भूमिकेमुळे पहान परिसरातील नागरिकांचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!