हॉटेलमध्ये.महिलेसोबत ९ जण, अचानक छापा मारताच.खोलीची अवस्था पाहून पोलीसही झाले थक्क.!!!
मुंबईत रविवारी सायंकाळी संपूर्ण शहर वीकेंडच्या मस्तीत गर्क असताना मुंबई पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कुलाबा
येथील एका हॉटेलवर पोलिसांनी छापेमारी करून एका विदेशी तरुणीसह तरुणाला अटक केली आहे
मात्र, हॉटेलच्या रुममधील नजारा पाहून पोलिस देखील हादरले.
नेमकं काय आहे हे प्रकरण.?
कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये एक विनावी फोन कॉल आला. फोनवरील माहिती ऐकताच पोलिस अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. पोलिसांचा फौजफाटा काही मिनिटांतच सायरन वाजवत थेट कुलाबा परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलकडे रवाना झाला. रिसेप्शनवर पोहोचताच पोलिसांनी थेट विचारलं, रूम नंबर… कुठे आहे? रिसेप्शनिस्टने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक तत्काळ त्या खोलीकडे धावत गेलं. रुमचा दरवाजा ठोठावण्यात आला. दरवाजा उघडताच एक विदेशी तरुणी भारतीय तरुणासोबत समोर आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
रुममधील नजारा पाहून पोलिसही हादरले
तरुण-तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी रूममध्ये प्रवेश केला. रुमची झाडाझडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. ते पाहून पोलिसही हादरले. रुममध्ये 9 माकडं आढळून आली. त्यापैकी 8 मृतावस्थेत होती. पोलिसांनी तातडीने वनविभाग आणि वाईल्ड लाईफ इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. त्यांना देखील रुममधील नजारा पाहून धक्का बसला.
आंतरराष्ट्रीय रॅकेटचा खुलासा
मुंबई पोलिसांनी विदेश तरुणीसह भारतीय तरुणाला अटक केली आहे. श्रीराम सुब्रमण्यम असे आरोपी तरुणाचं नाव असून तो चेन्नईचा रहिवासी आहे. तर अटकेतील तरुण मलेशियन नागरिक असून एस मथावी असे तिचं नाव आहे. आरोपी मलेशियातील दुर्मिळ माकडांची तस्करी करत असल्याची माहिती, मुंबईचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर राकेश भोईर यांनी दिली आहे. दोन्ही आरोपी 3 मे रोजी मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइटने मुंबईला पोहोचले. नंतर त्यांनी कुलाबा येथील हॉटेलमध्ये थांबले. आरोपींनी काही बॅगांमध्ये 9 माकडं कोंबून मुंबईत आणली गोती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 8 माकडांचा मृत्यू झाला. केवळ एकच माकड जिवंत आहे. सध्या त्या माकडाची वनविभागाकडून देखभाल केली जात आहे.
सियामंग गिबन प्रजातीची माकडं
पोलिसांच्या छापेमारी आढळून आलेले माकडं सियामंग गिबन प्रजातीची आहेत. इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलांमध्ये हे माकडं आढळतात. मात्र, सध्या ही माकडांची प्रजात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा प्रकार वन्यजीव तस्करीच्या कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जातो. दरम्यान, मुंबई पोलिस आणि वन विभाग यांची संयुक्त टीम या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तस्करीचं हे जाळं केवळ मुंबईपुरतंच मर्यादित नसून तर यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.