कापसाला १० हजारांचा भाव मिळावा. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दयावी. पिक विमा मिळावा. अवैध धंदे बंद करावेत.

भडगाव शेतकरी संघटनेचे मुख्यमंञ्यांसह तहसिलदारांना निवेदन.

576

कापसाला १० हजारांचा भाव मिळावा. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दयावी. पिक विमा मिळावा. अवैध धंदे बंद करावेत.

भडगाव शेतकरी संघटनेचे मुख्यमंञ्यांसह तहसिलदारांना निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कापसाला १० हजार रुपये भाव मिळावा. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा उतारा कोरा करावा. खरीप हंगाम सन २०२३ चा पिक विमा लाभ मिळावा. शेतकर्यांची मुले चुकीच्या मार्गाला लागुन दारु, सट्टा, मटका, जुगार यांच्या आहारी गेल्याने अवैध धंदे तात्काळ बंद करुन त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. आदि मागण्यांबाबतचे निवेदन महाराष्टृ शेतकरी संघटना भडगाव तालुका पदाधिकारी, महाराष्टृ जागृत जनमंचचे भडगाव तालुका पदाधिकारी, उत्तर महाराष्टृ जलपरीषद भडगाव तालुका पदाधिकारी व शेतकरी अशा तिन्ही संघटनांमार्फत राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी पाचोरा भुषण अहिरे, भडगाव तहसिलदार शितल सोलाट आदिंना देण्यात आलेले आहे.

भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, राज्यात शंभर टक्के दयनीय परीस्थिती आहे. शासनाने शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी दयावी. वरील सर्व मागण्या करण्यास व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच कापसाला १० हजारांचा भाव दयावा. शेतकर्यांनी बॅंकेंकडुन कर्ज घेतलेले आहे. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बॅंकेचा थकबाकीदार झाला आहे. सरकारने गेल्या १० वर्षापासुन शेतमालाला योग्य भाव दिला नाही. म्हणुन शेतकरी थकबाकीदार झाला आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप ,काही वेळा कोरडा दुष्काळ, काही वेळा ओला दुष्काळ अशी परीस्थितीतुन बाहेर निघणे कठीण आहे. तरी बॅंकांनी शेतकर्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे. त्याकरीता सरकारने कर्ज माफी त्वरीत करावी. आमच्या शेतकर्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, शेतकरी हितासाठी प्रयत्न करावा. असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनावर महाराष्टृ शेतकरी संघटना भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन राघो हाटकर, तालुका संपर्क प्रमुख भगवान नारायण चौधरी, तालुका उपाध्यक्ष तुकाराम तुळशिराम माळी, खजिनदार मनोज सुभाष परदेशी, कार्याध्यक्ष अनिल रामचंद्र पाटील, जेष्ट मार्गदर्शक शांताराम वना आचारी, सदस्य वाल्मिक जगन्नाथ वाघ, लक्ष्मण पाटील, महासचीव सुभाष दयाराम ठाकरे, अल्काबाई खैरनार आदि पदाधिकारी, शेतकर्यांच्या सहया आहेत.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा