थाई बॉक्सिंग: प्रेम संजय देवरे यांची सुवर्णमयी कामगिरी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
2nd साऊथ एशियन थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या प्रेम संजय देवरे यांनी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. भडगाव तालुक्यातील प्रेम संजय देवरे यांनी याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले असून त्यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके आहेत. ही पदके त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि कौशल्याची साक्ष देतात.
१७ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान भोपाल (मध्य प्रदेश) येथे झालेल्या या स्पर्धेत भारत, नेपाळ, भूतान आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. -५५ किग्रॅ वजनी गटात खेळत प्रेम संजय देवरे यांनी अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
या यशामागे स्थानिक प्रशिक्षक अबरार खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर राष्ट्रीय पंच शाहरुख मणियार यांनीही स्पर्धेत पंच म्हणून भूमिका बजावत महत्त्वाचा वाटा उचलला.
प्रेम संजय देवरे यांच्या या विजयामुळे महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्रात नाव उंचावले आहे. त्यांच्या जिद्दीने आजच्या तरुणांना प्रेरणा मिळाली असून थाई बॉक्सिंगसारख्या खेळाला एक नवी ओळख प्राप्त झाली आहे. महाराष्ट्राचा अभिमान ठरलेल्या प्रेम संजय देवरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा