Thursday, January 22, 2026
Google search engine
Home Blog Page 108

भडगाव अँग्लो उर्दू हायस्कुलचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव अँग्लो उर्दू हायस्कुलचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये नुकताच झालेला आनंद मेळावा विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांसाठी एक उत्सवाचा दिवस ठरला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग पाहून खूप आनंद झाला.

विविध प्रकारचे खाद्यपदार्थ:

मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. मुंग भजी, आलू पुरी, शेव पुरी, साबुदाणा खिचडी, शरबत, पाणी पुरी, वडा पाव,पाव वडा,पाव भाजी, इडली सांभार,रबडी हलवा, सेन्डविच असे अनेक चवदार पदार्थ या मेळाव्यात उपलब्ध होते. या सर्व पदार्थांना विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिक्षकांचे मार्गदर्शन:

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून नवीन पदार्थ तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले.

शालेय जीवनाची उजळणी

हा आनंद मेळावा केवळ एक खाद्यपदार्थांचा मेळावा नव्हता, तर तो शालेय जीवनाची उजळणी करणारा एक उत्सव होता. या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधण्याची, सहकार्य करण्याची आणि आपल्या कौशल्यांची प्रदर्शना करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष इरफान रजा, प्रमुख अतिथी  हाजी जमाल कासार, मुजम्मील शेख,पत्रकार अबरार मिर्झा, इकबाल मन्यार होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अँग्लो उर्दू हायस्कुल चे मुख्यध्यापक मिर्झा नाजीम,अजीम सर, दानिश सर,रहीम सर,रिजवान सर, अब्दुल कादिर,अशफाक सर,इसाहक दादा, अशफाक पिंजारी, नदीम दादा, खान शगुफ्ता मैडम, शेख शगुफ्ता मैडम ,यांनी परिश्रम  घेतले

चीनमध्ये उद्रेक झालेल्या व्हायरसची काय आहेत लक्षणे व कसा करायचा बचाव.?भारत सरकारही अलर्ट.!!!

0

चीनमध्ये उद्रेक झालेल्या व्हायरसची काय आहेत लक्षणे व कसा करायचा बचाव.?भारत सरकारही अलर्ट.!!!

 

चीनमध्ये सुमारे पाच वर्षांपूर्वी कोरोना व्हायरस नावाच्या आजाराने जगभरात हाहाकार माजवला होता. अनेक वर्षे सर्वच देशांना याचा त्रास सहन करावा लागला आणि लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाला महामारी घोषित केले होते. या महामारीची सुरुवात चीनमधून झाली आणि आता पुन्हा एकदा चीनमध्ये एक व्हायरस पसरू लागला आहे, ज्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले असून अनेक ठिकाणी आणीबाणी जाहीर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

काय आहे human metapneumovirus आणि किती प्रकरणे समोर आली?

 

मानवी मेटान्यूमोव्हायरस देखील काही प्रमाणात कोरोना व्हायरससारखा आहे. लहान मुले, वृद्ध तसेच सर्व वयोगटातील वृद्धांना याचे संक्रमण होत आहे. हा श्वसनाचा विषाणू आहे, जो २००१ मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला. मात्र, आता चीनमध्ये त्याचा झपाट्याने फैलाव होत आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांना हा विषाणू अधिक प्रभावित करतो. चीनमध्ये आतापर्यंत किती प्रकरणे समोर आली आहेत, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी जपानमध्येही मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. जपानमध्ये १५ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ९४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर जपानमध्ये एकूण रुग्णांची संख्या आता ७,१८,००० झाली आहे.

या आजाराची लक्षणे कोणती.?

एचएमपीव्हीची लक्षणे फ्लू आणि श्वसनाच्या इतर आजारांसारखीच असतात. सामान्य लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणे आणि धाप लागणे यांचा समावेश आहे. त्याच वेळी, जेव्हा स्थिती अधिक गंभीर होते, तेव्हा व्हायरस ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियामध्ये बदलतो. एकदा विषाणूची लागण झाली की, एखादी व्यक्ती तीन ते सहा दिवस आजारी राहू शकते. शिंकणे आणि खोकल्याने हा विषाणू इतर लोकांमध्येही पसरू शकतो. या विषाणूची लक्षणे प्रामुख्याने ताप आणि कोरोना विषाणू सारखीच आहेत.

व्हायरसबाबत भारत सरकारही अलर्ट –

चीनमध्ये पसरणाऱ्या या व्हायरसबाबत भारत सरकारही सतर्क झाले आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात असताना भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) देशातील श्वसन आणि हंगामी इन्फ्लूएंझा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवू, माहितीची पुष्टी करू आणि त्यानुसार अद्ययावत करू, असे सूत्रांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सहा क्षेत्रांपैकी एक असलेल्या डब्ल्यूपीआरओ (वेस्टर्न पॅसिफिक रिजन) च्या अपडेटनंतर सूत्रांनी सांगितले की, “१६ ते २२ डिसेंबर दरम्यानची आकडेवारी हंगामी इन्फ्लूएंझा, रायनोव्हायरस, रेस्पिरेटरी सिंकिटल व्हायरस (आरएसव्ही) आणि ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) यासह तीव्र श्वसन संक्रमणांमध्ये अलीकडील वाढ दर्शविते, तथापि, या वर्षी चीनमध्ये श्वसन संसर्गजन्य रोगांचे एकूण प्रमाण आणि तीव्रता मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. उत्तर गोलार्धात, विशेषत: हिवाळ्याच्या काळात श्वसन रोगजंतूंमध्ये हंगामी वाढ अपेक्षित आहे.

श्वसनाचे आजार,विशेषत: ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) वाढल्याने चीनमधील रुग्णालये आणि स्मशानभूमी या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धडपडत असल्याचे अनेक अहवालात म्हटले आहे.

विषाणूचा धोका कोणाला अधिक आहे. ?

सर्व वयोगटातील लोकांना या विषाणूचा धोका असला तरी लहान मुले, वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती फारशी चांगली नाही अशा लोकांना अधिक धोका आहे. अशा लोकांनी या विषाणूंपासून सावध राहण्याची गरज आहे.

व्हायरसपासून बचाव कसा करायचा.?

आतापर्यंत भारतात याची प्रकरणे समोर आलेली नाहीत, परंतु सरकार पूर्णपणे सतर्क आहे आणि बारकाईने लक्ष ठेवून आहे. या विषाणूपासून वाचण्याचा उपाय कोरोनाप्रमाणेच आहे. लोकांनी साबणाने हात धुवावेत. घाणेरड्या हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे. ज्याला या आजाराने ग्रासले आहे त्याच्यापासून योग्य अंतर ठेवा. जर कोणाला अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याने स्वत:ला विलगीकरण करावे. त्याचबरोबर या विषाणूने ग्रस्त व्यक्ती शिंकत असेल तर त्याच्यापासून अंतर ठेवा. आजारी असताना घरीच विश्रांती घ्या.

शिव उद्योग संघटनेचा स्थानिक उद्योजकांना सक्षम करण्यासाठी मदतीचा हात.!!!

0

शिव उद्योग संघटनेचा स्थानिक उद्योजकांना सक्षम करण्यासाठी मदतीचा हात.!!!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिव उद्योग संघटना, शिव सहकार चॅरिटेबल ट्रस्ट वेब बिझीनेसच्या सहकार्याने, “माझा महाराष्ट्र” नावाची महत्त्वाकांक्षी ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली आहे. या व्यासपीठाचे उद्दिष्ट छोटे उद्योजक, स्वयं-सहायता गट आणि महिला उद्योजकांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे त्यांची विक्री आणि महसूल वाढेल.

 

महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या मर्यादित मार्केटिंग आणि प्रमोशन बजेटच्या दीर्घकालीन समस्येचे निराकरण करणे ही “माझा महाराष्ट्र” ची संकल्पना आहे. उच्च-गुणवत्तेची उत्पादने तयार करूनही, यापैकी बरेच उद्योजक विपणन आणि जाहिरातीसाठी निधीच्या कमतरतेमुळे व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करतात. ही तफावत भरून काढण्यासाठी, “माझा महाराष्ट्र” या उद्योजकांना त्यांची उत्पादने नाममात्र दरात सूचीबद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ अल्प दरात उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे त्यांना जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.

 

ई-कॉमर्स वेबसाइट स्थानिक उद्योजकांना अनेक फायदे प्रदान करेल. ज्यात – जागतिक दृश्यमानता, अल्प दरांच्या उत्पादनांची सूची, विक्री आणि महसूल वाढ, विस्तृत ग्राहक संपर्क, व्यवसाय वाढ आणि विस्तारासाठी संधी उपलब्ध होणार आहेत.

 

शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद म्हणाले, “आम्ही ‘माझा महाराष्ट्र’ द्वारे स्थानिक उद्योजकांना त्यांची उत्पादने जागतिक ग्राहकांपुढे पोहोचण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत. छोट्या उद्योजकांना सक्षम करणे आणि व्यवसायात वाढ आणि यश मिळविण्यासाठी मदत करणे हे आमचे ध्येय आहे.”

 

उत्पादनांची नोंदणी करण्यासाठी आणि “माझा महाराष्ट्र” बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रकाश ओहळे यांच्याशी 9702058930 क्रमांकावर संपर्क साधू शकता. जागतिक व्याप्ती आणि प्रचंड लोकप्रियतेसह, “माझा महाराष्ट्र” महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांसाठी एक गेम चेंजर तसेच त्यांच्या व्यवसायांना पुढील स्तरावर नेण्यासाठी तयार आहे.

 

शिव उद्योग संघटनेबद्दल

शिव उद्योग संघटना ही महाराष्ट्रात रोजगार आणि व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे. शिव सहकार चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने, संस्थेने स्थानिक उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी “माझा महाराष्ट्र” ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली आहे.

भडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा.!!!

0

भडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा.!!!

 

भडगाव प्रतिनिधी :-

 

भडगाव शहरातील क्रांती सूर्य महात्मा फुले चौकात भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती जयंती साजरा करण्यात आली. यावेळी माळी पंच मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले बहुद्देशीय संस्था व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्त्री शिक्षण व समाजसुधारणेसाठी सावित्रीमाई फुले यांनी अनमोल दिलेलं योगदान आहे. त्यांच्या त्याग व कर्तृत्वाला वंदन करत आज महात्मा फुले चौकात सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जय ज्योती जय क्रांती च्या घोषणां देण्यात आल्या. यावेळी अर्जुन महाजन, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, भिकन महाजन, विजय महाजन, साहेबराव महाजन, मुकुंदा महाजन, पत्रकार सागर महाजन, पत्रकार नितीन महाजन, पत्रकार चेतन महाजन, पत्रकार शुभम सुराणा, रवींद्र अहिरे, विनोद महाजन, पिंटू महाजन,गोकुळ महाजन, बबलू महाजन, रितेश महाजन, शुभम महाजन, मयूर महाजन, रमेश महाजन, गोविंद महाजन, आप्पा महाजन, आनंदा महाजन, नाना महाजन, रवींद्र महाजन, प्रदीप महाजन, दिनेश पाटील, विजय महाजन, प्रविण महाजन सर, आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

१० जानेवारी २०२५ रोजी सुवर्ण नियंत्रण कायदा दिना निमित्त  ठिकठिकाणी चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे आवाहन.!!!

0

१० जानेवारी २०२५ रोजी सुवर्ण नियंत्रण कायदा दिना निमित्त 

ठिकठिकाणी चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे आवाहन.!!!

 

नाशिक रोड प्रतिनिधी :- 

येत्या १० जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रात तसेच भारतात जेथे जेथे सर्व शाखीय सोनार समाजाचा अधिवास आहे, तेथे तेथे स्थानिक सर्व शाखीय सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी सुवर्ण नियंत्रण कायदा दिनानिमित्त सुवर्ण नियंत्रण कायदा आणि सर्व शाखीय सोनार समाजावर झालेले व्यावसायिक परिणाम या विषयावर चर्चासत्र आयोजित करावे, असे आवाहन

सकल भारतीय सोनार समाज संघटन

चे संस्थापक श्री मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.

चर्चासत्रात सुवर्ण नियंत्रण कायदा अस्तित्वात आल्यानंतर सोनार व्यावसायिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले, सोनार सराफ आणि सुवर्ण कारागिरी करणाऱ्या सोनार समाज घटकांवर झालेले परिणाम यावर भर देण्यात यावा, असे आवाहन देखील मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.

६जानेवारी पत्रकार दिन,जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन.!!!

0

६जानेवारी पत्रकार दिन,जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन.!!!

 

लोकमत संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी :-

पत्रकार दिन निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक ६ जानेवारी रोजी ठीक 10:30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले असून यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.तरी जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवानी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघांचे इलेक्ट्रिनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी यांनी केले आहे.

 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत संपादक संजय आवटे असणार आहेत तर दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन,पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणारं असून प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजुमामा भोळे, आ. किशोरअप्पा पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रांतधिकारी विनय गोसावी,लोकमत जळगाव आवृत्ती संपादक, किरण अग्रवाल,पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख अनिल जोशी, श्री राष्ट्रीय करणीसेनेचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीणसिहं पाटील,सातपुडा ऑटोचे संचालक किरण बच्छाव,मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघांचे संचालक जेष्ठ पत्रकार कमलाकर वाणी,जेष्ठ पत्रकार विजय पाठक,दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र पाटील,पत्रकार संघांचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे,खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी मान्यवर उपस्थित राहतील.

 

जिल्ह्यातील १० जणांना दर्पणकार पुरस्कार

 

पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया व छायाचित्रकार अशा एकूण १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार जाहीर आले आहेत. यात –

 

प्रिंट मीडिया :

•चंद्रशेखर जोशी (तरुणभारत)

•सुनील पाटील (लोकमत),

•सुधाकर जाधव (दिव्यमराठी)

•चेतन साखरे (देशदूत)

 

इलेक्ट्रॉनिक मीडिया :

•किशोर पाटील (किशोर पाटील)

•संजय महाजन (साम TV )

•विजय वाघमारे (न्यूज 18 लोकमत),

 

डिजिटल मीडिया :

नरेंद्र पाटील, पुढारी (डिजिटल)

निलेश पाटील (महाराष्ट्र टाइम्स डिजिटल)

 

छायाचित्रकार – सचिन पाटील, लोकमत 

तरी जिल्ह्यातील पत्रकार बांधव व पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकारितेचे विद्यार्थी,नागरिक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी,

जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,ग्रामीण जिल्हाध्यक्ष,

नागराज पाटील,ग्रामीण जिल्हाध्यक्ष,

संतोष नवले,खान्देश विभाग उपाध्यक्ष भुवनेश दुसाने,खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे,पत्रकार हल्ला विरोधी समिती जिल्हाध्यक्ष भगवान मराठे,

डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रमोद रुले, महानगराध्यक्ष योगेश चौधरी यांनी केले आहे.

कापसाला १० हजारांचा भाव मिळावा. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दयावी. पिक विमा मिळावा. अवैध धंदे बंद करावेत.

0

कापसाला १० हजारांचा भाव मिळावा. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दयावी. पिक विमा मिळावा. अवैध धंदे बंद करावेत.

भडगाव शेतकरी संघटनेचे मुख्यमंञ्यांसह तहसिलदारांना निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कापसाला १० हजार रुपये भाव मिळावा. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा उतारा कोरा करावा. खरीप हंगाम सन २०२३ चा पिक विमा लाभ मिळावा. शेतकर्यांची मुले चुकीच्या मार्गाला लागुन दारु, सट्टा, मटका, जुगार यांच्या आहारी गेल्याने अवैध धंदे तात्काळ बंद करुन त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. आदि मागण्यांबाबतचे निवेदन महाराष्टृ शेतकरी संघटना भडगाव तालुका पदाधिकारी, महाराष्टृ जागृत जनमंचचे भडगाव तालुका पदाधिकारी, उत्तर महाराष्टृ जलपरीषद भडगाव तालुका पदाधिकारी व शेतकरी अशा तिन्ही संघटनांमार्फत राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी पाचोरा भुषण अहिरे, भडगाव तहसिलदार शितल सोलाट आदिंना देण्यात आलेले आहे.

भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, राज्यात शंभर टक्के दयनीय परीस्थिती आहे. शासनाने शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी दयावी. वरील सर्व मागण्या करण्यास व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच कापसाला १० हजारांचा भाव दयावा. शेतकर्यांनी बॅंकेंकडुन कर्ज घेतलेले आहे. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बॅंकेचा थकबाकीदार झाला आहे. सरकारने गेल्या १० वर्षापासुन शेतमालाला योग्य भाव दिला नाही. म्हणुन शेतकरी थकबाकीदार झाला आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप ,काही वेळा कोरडा दुष्काळ, काही वेळा ओला दुष्काळ अशी परीस्थितीतुन बाहेर निघणे कठीण आहे. तरी बॅंकांनी शेतकर्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे. त्याकरीता सरकारने कर्ज माफी त्वरीत करावी. आमच्या शेतकर्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, शेतकरी हितासाठी प्रयत्न करावा. असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनावर महाराष्टृ शेतकरी संघटना भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन राघो हाटकर, तालुका संपर्क प्रमुख भगवान नारायण चौधरी, तालुका उपाध्यक्ष तुकाराम तुळशिराम माळी, खजिनदार मनोज सुभाष परदेशी, कार्याध्यक्ष अनिल रामचंद्र पाटील, जेष्ट मार्गदर्शक शांताराम वना आचारी, सदस्य वाल्मिक जगन्नाथ वाघ, लक्ष्मण पाटील, महासचीव सुभाष दयाराम ठाकरे, अल्काबाई खैरनार आदि पदाधिकारी, शेतकर्यांच्या सहया आहेत.

 

गोंडगाव विदयालयाच्या मुख्याध्यापक पदि क. ज. वाघ रुजु. विदयालयामार्फत सत्कार.!!!

0

गोंडगाव विदयालयाच्या मुख्याध्यापक पदि क. ज. वाघ रुजु. विदयालयामार्फत सत्कार.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

चाळीसगाव रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत कळमडु माध्यमिक विदयालयाचे पर्यवेक्षक क. ज. वाघ यांची संस्थेने गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयाच्या मुख्याध्यापक पदि पदोन्नतीने नियुक्ती केली आहे. ते विदयालयात दि. १ रोजी रुजु झाले आहेत. यावेळी नवनिर्वाचीत मुख्याध्यापक क. ज. वाघ व सेवानिवृत्त मुख्याध्यापक ओ. पी. जाधव या दोघांचा गोंडगाव विदयालयामार्फत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुञसंचलन क्रिडा शिक्षक एस. डी. चौधरी यांनी केले. मुख्याध्यापक क. ज. वाघ यांची आतापर्यंत एकुण सेवा ३१ वर्ष झाली आहे. यापुर्वी त्यांनी पाटणा, तरवाडे, बहाळ, चाळीसगाव, गणेशपुर, हिरापुर, दहिवद, खेडगाव अशी सेवा बजावली आहे. या कार्यक्रमावेळी पी. व्हि. जाधव, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्हि. सोळंके, बी. डी. बोरसे, एस. एस, आम्ले, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, एन. ए. मोरे, आर. बी. महाले, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्हि. एम. जाधव आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी हजर होत्या.

 

लाडक्या बहिणी’च्या खात्यात नवीन वर्षात या तारखेला येणार 7 वा हफ्ता, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

0

­लाडक्या बहिणी’च्या खात्यात नवीन वर्षात या तारखेला येणार 7 वा हफ्ता, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

महाराष्ट्रात ‘माझी लाडकी बहिन योजने’ अंतर्गत 6 व्या हप्त्यानंतर, लाभार्थी आता नवीन वर्षात 7 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्यात नवीन वर्षात नवीन हप्ता कधी येणार आहे.?

या तारखेबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये येतात. आतापर्यंत सरकारने ९ हजार रुपयांचे ६ हप्ते जारी केले आहेत. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. लाभ घेण्यासाठी, महिलांना आवश्यक कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि बँक पासबुक सादर करावे लागतील.

 

मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात.?

 

“माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत, पात्र महिलांना मार्च महिन्यापासून त्यांच्या खात्यात 2100 रुपये मिळू शकतात. लाभार्थी महिलांना देण्यात येणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीने जनतेला दिले होते. हे आश्वासन सरकारसाठी फायदेशीर ठरले आणि महाराष्ट्रात महायुतीला दणदणीत विजय मिळाला, त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले.

 

योजनेचे उद्दिष्ट 

 

‘माझी लाडकी बहिन योजना’ ही महाराष्ट्र सरकारची एक प्रमुख योजना आहे, जी महिलांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत महिला लाभार्थ्यांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाची चांगली काळजी घेता येईल आणि त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावे, ही योजना महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.

गोंडगाव विदयालयात निरोप समारंभ. मुख्याध्यापक ओ. पी. जाधव सेवानिवृत्त.!!!

0

गोंडगाव विदयालयात निरोप समारंभ. मुख्याध्यापक ओ. पी. जाधव सेवानिवृत्त.!!!

 

भडगाव प्रतिनिधी :-

रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक ओ. पी. जाधव हे आपल्या ३४ वर्ष ६ महिन्याच्या प्रदिर्घ सेवेतुन दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्त समारंभ विदयालयामार्फत दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे कलाशिक्षक पी. व्हि. जाधव हे होते. यावेळी व्यासपिठावर मुख्याध्यापक ओ. पी. जाधव, वर्षा ओमप्रकाश जाधव, माधुरी भुषण बोरसे, संगीता प्रमोद जाधव, पी. व्हि. जाधव, एस. जी. भोपे आदि मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने हजर होत्या. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक ओ. पी. जाधव यांचेसह सपत्नीक सत्कार करण्यात आला. व महादेवाचा फोटो, ड्रेस, टोपी, टाॅवेल, साडी विदयालयामार्फत देऊन सत्कार व निरोप देण्यात आला. ओ. पी. जाधव यांची सेवा देवळी, हिंगोणे, गोंडगाव, वाघळी, पातोंडा, दहिवद, कनाशी, गोंडगाव अशी झाली आहे. या कार्यक्रमाचे सुञसंचालन क्रीडा शिक्षक एस. डी. चौधरी यांनी केले. तर प्रास्तविक एस. आर पाटील यांनी केले. यावेळी कोमल पाटील, जानवी पाटील आदि विदयार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर एस. एस. आम्ले, बी. डी. बोरसे, आर. बी. महाले, पी. जे. देशमुख, ए. एम. परदेशी आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कारार्थी ओ. पी. जाधव यांनी मनोगतातुन सांगीतले कि, विदयालयामार्फत माझ्या निरोप सत्कार समारंभाचा चांगला कार्यक्रम घडवुन आणला. यामुळे मी भारावलो आहे असे सांगीतले. तर अध्यक्षीय भाषण पी. व्हि. जाधव यांनी 

 केले. 

यावेळी सी. एस. सोन्नीस, पी. व्ही. जाधव, एस. डी. चौधरी, व्हि. ए. पाटील, एस आर पाटील, पी. व्ही. सोळंखे, बी. डी. बोरसे, एस एस आम्ले, आर एस सैंदाणे, एस आर पाटील, एन ए मोरे, आर बी महाले, पी जे देशमुख, एस जी भोपे, ए एम परदेशी, एस एल मोरे, व्हि एम जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. उपस्थितांचे आभार एस आर महाजन यांनी मानले.

 

error: Content is protected !!