भडगाव प्रतिनिधी :—
तालुक्यातील भोरटेक बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यकारीणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि श्री. गोविंदा सखाराम महाजन, व्हाईस चेअरमन पदि रंजना शेषराव पाटील, संचालक श्री. नगराज दोधा पाटील, श्री. शिवराम गणपत पाटील,
श्री. मधुकर विनायक देशमुख, श्री. गुलाब रतन महाजन, श्री. साहेबराव पोपट शितोळे, श्री. संजय गोविंदा महाजन, श्री. पंडीत दौलत पाटील, श्री. बालु दौलत पाटील, श्री. रविंद्र रुपचंद धनगर, संगीता रविंद्र पाटील, वत्सलाबाई भास्कर निकसे आदि संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिवडीबद्दल पदाधिकार्यांचा पञकार अशोकबापु परदेशी यांनी रुमाल, टोपी, पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी उप सरपंच श्री.उमेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य श्री. नारायण महाजन, संस्थेचे सचिव श्री. अनिल माधवराव देशमुख, कर्मचारी श्री. संजय महाजन, कजगावचे श्री.आबा महाजन , श्री. सुकलाल महाजन, श्री. अरुण पाटील यांचेसह नागरीक उपस्थित होते.
