पाचोरा प्रतिनिधी :-
शासनाच्या निर्देशानुसार अँग्लो उर्दू हायस्कूल पाचोरा येथे डॉ. इक्बाल डे (यौम-ए-इक़बाल) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी डॉ. मोहम्मद इक्बाल यांच्या देशभक्ती, राष्ट्रभक्ती तसेच मानवतेच्या सार्वत्रिक संदेशावर आधारित भाषणे सादर केली. तसेच इक्बाल यांची प्रसिद्ध कविता, शायरी आणि गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमाच्या तयारीसाठी शिक्षक वकार अजीम, सय्यद तौफिक आणि मॅडम काज़ी रेहाना कलीमुद्दीन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन मुजाहिद महेमूद खान यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्य आणि सादरीकरणाचे निरीक्षण खान रेहान अब्दुल रहीम, मोहम्मद अझहर खान, वसीम शेख हमीद, असलम खान, सय्यद शरीफ आणि मॅडम उज़मा शेख आरिफ यांनी केले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आकिब अहमद शेख युसुफ होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार आणि नियोजनकर्ते मुख्याध्यापक शोएब अहमद शेख नूरुद्दीन यांनी शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
